तुमच्या पेरेंट्स साठी वेगळा हेल्थ इन्शुरन्स असावा यासाठीची 5 कारणे
भारतामध्ये हेल्थ केअरच्या किमती वाढतंच चालल्या आहेत, त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल एक्स्पेन्सेस पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाकडे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असणे अनिवार्य झाले आहे.
जसे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असणे अनिवार्य झाले आहे तसेच सिनिअर सिटीझन्स साठी तर हे आणखीनच महत्त्वाचे ठरते. जसं जसं वय वाढत जातं, त्यांच्या हेल्थ केअरच्या गरजा देखील वाढत जातात, आणि ते आजारी पडण्याची शक्यता देखील बळावते.
तुमच्या पेरेंट्स साठी तुम्ही वेगळा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यावा यासाठीची 5 कारणे
तुमच्या पेरेंट्स साठी हेल्थ कव्हरेज असणे देखील तितकेच महत्त्वाचे आणि सर्वतोपरी आहे, त्यामुळे तुमच्या पॉलिसी मध्ये त्यांची पॉलिसी एकत्र करण्यापेक्षा त्यांच्यासाठी वेगळी पॉलिसी घेणे कधी ही श्रेयस्कर ठरेल.
तुमच्या पेरेंट्स साठी तुम्ही वेगळा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यावा यासाठीची 5 कारणे खालीलप्रमाणे आहेत.
1. अधिक कव्हरेज मिळतो तर फॅमिली इन्शुरन्स मध्ये कव्हरेज शेअर होतो
जेव्हां तुम्ही तुमच्या पेरेंट्सना तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये समाविष्ट करून घेता, एकूण कव्हरेज पॉलिसी मधील सर्व मेम्बर्स मध्ये शेअर होतो. म्हणजेच जर एखाद्या मेंबर ने क्लेम केला तर इतर मेम्बर्ससाठीचा कव्हरेज कमी होतो.
त्याउलट, जेव्हां तुम्ही तुमच्या पेरेंट्स साठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेता, संपूर्ण कव्हरेज त्यांनाच मिळतो, जेणेकरून कोणतीही काळजी न करता त्यांना आवश्यक असलेली मेडिकल केअर अगदी सुरळीतपणे मिळेल.
2. प्रीमियमचे दर परवडणारे असतात
सिनिअर सिटीझन्ससाठी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम्स तरुण व्यक्तींच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम्स पेक्षा जास्तं असतात. जेव्हां तुम्ही तुमच्या पॉलिसी मध्ये तुमच्या पेरेंट्सची पॉलिसी एकत्र करता, अशा संपूर्ण पॉलिसीचे प्रीमियम त्यातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. म्हणजेच, जर तुमच्या पेरेंट्सपैकी एक जण सिनिअर सिटीझन असेल तर संपूर्ण पॉलिसीचे प्रीमियम जास्त असेल.
त्याउलट, जेव्हां तुम्ही वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेता, त्याच्या प्रीमियमचे, तुम्हाला सर्वोत्तम दर मिळावेत याची खात्री करून, त्यांच्या वयावर, त्यांच्या तब्येतीवर अवलंबून असतात.
3. तुमच्या आरोग्याच्या गरजांप्रमाणे तुमची पॉलिसी कस्टमाइज करा
प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्या वयाप्रमाणे आणखीन बदलत जातात. जेव्ह तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेता, तुम्ही त्यांच्या गरजांप्रमाणे ती पॉलिसी कस्टमाइज करून घेऊ शकता. यामुळे त्यांना मेडिकल एक्स्पेन्सेस, हॉस्पिटलायझेशन, डॉक्टरची फी, डायग्नोस्टिक टेस्ट्स, आणि मेडिकेशन यासगळ्यासाठी आवश्यक ते कव्हरेज मिळते.
4. नो क्लेम बोनसचा इष्टतम उपयोग
जेव्हां तुम्ही तुमच्या पॉलिसी मध्ये तुमच्या पेरेंट्सची पॉलिसी एकत्र करता, नो क्लेम बोनस पॉलिसीच्या इतर मेम्बर्स बरोबर शेअर होतो. त्याउलट जेव्ह तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेता, त्यांनी जर पॉलिसी पिरिअड मध्ये कोणताही क्लेम केला नसेल तर त्यांच्या संपूर्ण नो क्लेम बोनसचा लाभ ते घेऊ शकतात. या बोनसमुळे त्यांच्या हेल्थ इन्शुरन्सचा खर्चही कमी होतो आणि इतर अनेक बेनिफिट्स देखील मिळतात.
तसेही जसं जसं वय वाढतं आजारी पडायची शक्यता देखील वाढते. त्यामुळे, पेरेंट्सना फॅमिली पॉलिसी मध्ये समाविष्ट केल्यामुळे एनसीबी म्हणजेच नो क्लेम बोनस मिळण्याची शक्यता देखील कमी होत जाते.
त्यामुळे, पेरेंट्स साठी वेगळा हेल्थ इन्शुरन्स विकत घेणेच श्रेयस्कर ठरेल.
5. सिनिअर सिटीझन्ससाठीचे अतिरिक्त बेनिफिट्स
जेव्ह तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेता, तेव्हा तुम्ही इन्कमटॅक्स एक्ट मधील सेक्शन 80डी अंतर्गत असलेले टॅक्स बेनिफिट्स क्लेम करू शकता. यामुळे तुम्हाला त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स साठी भरलेल्या प्रीमियम वर अतिरिक्त टॅक्स बेनिफिट्स मिळण्याची देखील हमी मिळते.
तर सर्व गोष्टी लक्षात घेता आता तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या पेरेंट्सना तुमच्या स्वतःच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याऐवजी त्यांच्यासाठी वेगळी इन्शुरन्स पॉलिसी घेणेच योग्य आहे. यामुळे तुम्हाला जास्त कव्हरेज, कमी प्रीमियम्स, कस्टमायझेशन, नो क्लेम बोनस आणि टॅक्स बेनिफिट्स तर मिळतातच त्याचबरोबर तुमच्या पेरेंट्सना खर्चाची काळजी न करता आवश्यक ती मेडिकल केअर मिळण्याची हमी देखील मिळते.
त्यामुळे, अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल एक्पेन्सेस पासून तुमच्या पेरेंट्सना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणे योग्य ठरेल.
तुमच्या पेरेंट्ससाठी हेल्थ इन्शुरन्स याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी माझ्या दोन्ही पेरेंट्स म्हणजेच आई वडिलांसाठी दोन वेगवेगळ्या पॉलिसी घेऊ शकतो की दोघांसाठी एकंच पॉलिसी घ्यावी?
तुमच्याकडे तुमच्या दोन्ही पेरेंट्स म्हणजेच आई वडिलांसाठी दोन वेगवेगळ्या पॉलिसी घेण्याचा पर्याय आहे. यामुळे तुम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या हेल्थकेअर गरजांप्रमाणे त्यांची पॉलिसी कस्टमाइज करून घेऊ शकता. तरी, तुम्हाला सोयीचे वाटत असल्यास दोघांसाठी एकंच पॉलिसी घेणे देखील शक्य आहे.
वेगळ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये मी माझ्या सासू-सासऱ्यांचा समावेश करून घेऊ शकतो का?
होय, अनेक इन्शुरन्स प्रोव्हायडर वेगळ्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये तुमच्या माझ्या सासू-सासऱ्यांचा समावेश करून घेण्याचा पर्याय देतात. तरी, पॉलिसीच्या अटी आणि नियम जाणून घेणे आवश्यक आहे कारण प्रत्येक इन्शुररचे यासंबंधी पात्रतेचे नियम वेगळे असू शकतात.
मी माझ्या फॅमिली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये बदल करून माझ्या पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ पॉलिसी घेऊ शकतो का?
होय, तुम्ही तुमच्या फॅमिली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये बदल करून तुमच्या पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ पॉलिसी घेऊ शकता. असे करण्यासाठीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र आणि अंडररायटिंग हवे असल्याय तुम्ही तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरकडे याबद्दल चौकशी करू शकता.
पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेताना जुन्या आजारांबद्दल माहिती देणे आवश्यक आहे का?
होय, पेरेंट्ससाठी वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेताना जुन्या आजारांबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. इन्शुरन्स कंपन्यांना कव्हरेज आणि प्रीमियमचे रेट्स ठरविण्यासाठी जुन्या आजारांबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. जुन्या आजारांबद्दल माहिती न दिल्यामुळे क्लेम रिजेक्ट होऊ शकतो किंवा पॉलिसी देखील रद्द होऊ शकते.
एक कव्हरेज असताना देखील मी माझ्या पेरेंट्ससाठी आणखीन एक वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेऊ शकतो का?
होय, एक कव्हरेज असताना देखील तुम्ही तुमच्या पेरेंट्ससाठी आणखीन एक वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकत घेऊ शकता. तरी, सर्वाधिक लाभ मिळविण्यासाठी दोन्ही पॉलिसींचे नियम आणि अटी जाणून घेणे आवश्यक आहे.