हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे फायदे
हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबलिटी म्हणजे काय?
तुमचा इन्शुरर बदलण्यासाठी आता तुम्हाला तुमची आधीची इन्शुरन्स पॉलिसी संपेपर्यंत थांबायची गरज नाही, आता ते दिवस गेले. हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबलिटी या सेवेमुळे आता तुम्ही कोणतेही फायदे न चुकवता तुमचा इन्शुरन्स प्रोव्हायडर कधी ही बदलू शकता. जितक्या सहज आज काल आपण आपला टेलिकम्युनिकेशन प्रोव्हायडर बदलतो अगदी तितक्याच सोप्या पद्धतीने तुम्ही आता तुमचा इन्शुरन्स प्रोव्हायडर बदलू शकता.
तुम्ही तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचा विचार करण्याची कारणे
तुम्ही तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचा विचार का करावा यासाठीची 9 कारणे खालील प्रमाणे आहेत:
1. एक चांगला इन्शुरन्स प्रोव्हायडर मिळवण्यासाठी
बऱ्याचदा इन्शुरन्स प्रोव्हायडर बदलण्याचं मुख्य कारण त्यांच्याकडून चांगली किंवा समाधानकारक सेवा न मिळणे असू शकते. पोर्टेबलिटी तुम्हाला एक चांगला इन्शुरर, जो चांगली सेवा देतो, निवडण्याची संधी देतो.
आता तुम्हाला समजले असते की तुम्ही अशामुळे असमाधानी आहात, असा इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडा जो इंडस्ट्री मध्ये त्याच्या सेवेसाठी ओळखला जातो. त्यांचे प्रोडक्ट्स पूर्णपणे समजून घ्या. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरच्या रटाळ क्लेम प्रोसेस मुळे त्याच्या बाबतीत असमाधानी असू शकता. त्यामुळे, क्लेम सेटलमेंट प्रोसेस तपासून घ्या.
2. आणखीन तुलनात्मक इन्शुरन्स प्रीमियम मिळवण्यासाठी
कोविड नंतर अनेक इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांचे प्रीमियमचे दर वाढवले आहेत. त्यामुळे, तुम्ही जरी गेल्या वर्षभरात कोणताही क्लेम केला नसेल तरी रिन्युअलच्या वेळेस तुमचे प्रीमियम वाढल्याचे तुम्हाला लक्षात येते. पोर्टेबलिटी सेवेच्या मदतीने आता तुम्ही हा वाढलेला प्रीमियम भरण्यासाठी बांधील नाही.
इन्शुरन्स प्रोव्हायडर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे आणि वाढत्या स्पर्धेमुळे सगळेच इन्शुरर्स एक चांगला कस्टमर बेस तयार करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे, ते वेगवेगळे डिस्काऊंट्स आणि इतर अनेक फायदे ऑफर करत असतात.
जेव्हां तुम्ही तुमचा इन्शुरन्स प्लॅन बदलता, तेव्ह तुम्हाला तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स प्रोव्हायडर पेक्षा कमी प्रीमियम दरात तुम्हाला हवे असलेले फायदे मिळण्याची शक्यता बळावते.
3. विस्तृत असा हॉस्पिटल नेटवर्क असलेला इन्शुरर निवडा
पॅनल वरती असलेल्या हॉस्पिटल्सचे एक विस्तृत नेटवर्क म्हणजे जेव्हां कधी तुम्ही एखाद्या हेल्थ इमर्जन्सीसाठी अशा लिस्टेड हॉस्पिटल मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कॅशलेस सर्व्हिस मिळेल.
रीएम्बर्समेंट क्लेम्स मध्ये आवश्यक असल्याप्रमाणे प्रत्येक वेळी मेडिकल इमर्जन्सीला सामोरे जाताना एखाद्या व्यक्तीकडे पैसे उपलब्ध असतीलच आणि ते नंतर क्लेम करता येतील असे नाही. अशा परिस्थितीत, कॅशलेस क्लेम याची हमी देते की तात्पुरत्या काळासाठी सुद्धा मेडिकल इमर्जन्सीसाठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागू नयेत. आणि यामुळे आपण अशावेळी पैशाची जमवाजमव करत बसण्याऐवजी तब्येतीची काळजी घेण्यावर भर देऊ शकतो.
4. चांगला क्लेम सेटलमेंट रेशिओ असलेला इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडण्याचा पर्याय
आता जर तुम्ही तुमची पॉलिसी एका चांगल्या इन्शुरन्स प्रोव्हायडर कडे पोर्ट करून घेत आहात, तर त्यांचा क्लेम रेशिओ तपासून घेताय ना याची खात्री करून घ्या.
एका ठराविक काळामध्ये कंपनीकडे आलेल्या क्लेम रिक्वेस्ट्सच्या अगेन्स्ट कंपनी किती क्लेम्स सेटल करते याची टक्केवारी म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशिओ होय. ज्या कंपनीचा क्लेम रेशिओ जास्त असेल ती कंपनी क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत विश्वास ठेवण्यायोग्य आहे, असे समजले जाते. यामुळे इन्शुररची विश्वासार्हता देखील लक्षात येते आणि कंपनीचा कस्टमर सेन्ट्रिक अप्रोच देखील दिसून येतो.
एक चांगला क्लेम सेटलमेंट रेशिओ असलेला इन्शुरर निवडला की तुम्हाला गरजेच्या वेळी सुरळीतपणे पार पडणाऱ्या क्लेम प्रोसेसची हमी मिळते.
5. तुमचा साठलेला बोनस पुढे चालू ठेवण्यासाठी
तुमचा साठलेला बोनस हा तुम्ही निरोगी राहिल्याबद्दल तुम्हाला मिळालेले जणु बक्षीसंच, आणि पोर्ट करताना तुम्हाला हे बक्षीस गमावण्याची गरज नाही. हे वैशिष्ट्य पोर्टिन्गचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तुमचा साठलेला बोनस तुमचा नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये एड होतो.
6. तुमच्या वेटिंग पिरिअडवरचा फायदा पुढे चालू ठेवा
काही ठराविक आजार आणि जुने आजार असलेल्या व्यक्तीला त्याच्या हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज मधील फायदे मिळविण्यासाठी एक ठराविक काळ किंवा वेटिंग पिरिअड पूर्ण करावा लागतो. पोर्टिन्गचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही एक चांगली पॉलिसी घेऊ शकता आणि ते ही तुमचा वेटिंग पिरिअड नव्याने सुरु न होता. उदाहरणार्थ, तुमच्या सध्याच्या पॉलिसीप्रमाणे ठराविक एका आजारासाठीचा वेटिंग पिरीआड 4 वर्षे आहे, आणि तुम्ही त्या पॉलिसीची 3 वर्षे पूर्ण केलिया आहेत. आता जेव्हां तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट कराल तेव्हा पॉलिसीचे फायदे सुरु होण्यासाठी तुम्हाल तुमच्या नवीन इन्शुरन्स प्रोव्हायडर सोबत वेटिंग पिरिअडचे केवळ एकंच वर्ष पूर्ण करावे लागेल.
7. तुमची पॉलिसी तुम्ही कस्टमाईज करू शकता
पोर्टेबलिटीमुळे तुम्हाला तुमची नवीन पॉलिसी तुमच्या गरजांप्रमाणे कस्टमाईज करता येते. तर आता तुम्ही तुमचा नॉमिनी बदलू शकता, इन्शुर्ड केलेली रक्कम वाढवू शकता आणी गरज असल्यास तुमचा प्लॅन काही विशिष्ट आजारासाठी उपयुक्त ठरेल अशाप्रकारे बदलू देखील शकता. यातील कोणतेही बदल तुम्हाला तुम्ही तुमची पॉलिसी एका इन्शुरर कडून दुसऱ्या इन्शुरर कडे पोर्ट होताना करता येतील. तरी, हे वैशिष्ट्य जास्त करून तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडर वर अवलंबून असते.
8. तुमच्या गरजांना पूरक अशि वैशिष्ट्ये मिळवा
एकंच प्लॅन वेगवेगळ्या इन्शुरन्स प्रोव्हायडर प्रमाणे आणि त्यांच्या ऑफर्स प्रमाणे बदलू शकतो. काही प्रोव्हायडर्स रूम रेंट कॅपिंग, रोड एम्ब्युलन्स कव्हर अशी वैशिष्ट्ये देऊ शकतात तर इतर काही एअर एम्ब्युलन्स कव्हर किंवा रिस्टोरेशन बेनिफिट देऊ शकतात. पोर्टेबलिटीमुळे तुम्हाला तुमचे पर्याय सावधतेने निवडून मग तुमच्या गरजांना पूरक अशी योग्य ती पॉलिसी घेण्याची संधी मिळते.
9. अजून जास्त पारदर्शक सर्व्हिस प्रोव्हायडर मिळविण्याची संधी
सामान्यतः आढळणारा मुद्दा ज्यावरून इन्शुरन्स घेणाऱ्यांमध्ये असमाधानता दिसून येते तो म्हणजे त्यांना वाटते की त्यांचा इन्शुरर क्लेम मागायला गेल्यावर त्याचे एक एक नवीन नवीन अटी आणि नियम पुढे आणतो. आता जसे की तुम्ही पोर्ट करत आहात, तुम्हाला एक पारदर्शक नियम आणि अटी ठेवणारा प्रोव्हायडर शोधण्याची आणि निवडण्याची संधी मिळते. असा प्रोव्हायडर निवडा ज्यांचा डिजिटल अप्रोच आहे. यामुळे तुम्हाला उत्तम पारदर्शकता आणि सुरळीत सर्व्हिसची हमी मिळते
त्यामुळे, पोर्टेबलिटीमुळे तुम्हाला एक असा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडण्याची संधी मिळते जो तुमचे हेल्थ कव्हरेज जसेच्या तसे ठेवून तुमच्या हेल्थ रिक़्वायरमेंट्स पूर्ण करेल.
मी माझे हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्याची प्रक्रिया कधी सुरु करावी?
जरी तुम्ही तुमच्यासाठी एक नवीन इन्शुरन्स प्रोव्हायडर वर्षात कधी ही शोधायला सुरु करू शकता, पण तुमची पॉलिसी केवळ रिन्युअलच्याच वेळी पोर्ट होऊ शकते. जर तुमच्या पॉलिसीची अवधी संपली नसेल तर तुम्ही ती पोर्ट नाही करू शकत.
तुमच्या पॉलिसीची अवधी संपण्याच्या 45 आधी, ही तुमची पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी अगदी योग्य वेळ आहे, ती नवीन इन्शुरर कडे योग्य वेळेत पोर्ट होईल.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचे फायदे यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वर्षात कधी ही पोर्ट करू शकतो का?
नाही, तुम्ही तुमच्या जुन्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या रिन्युअलच्या वेळेसच ती पोर्ट करू शकता.
मी माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्यासाठी कधी अर्ज करू शकतो?
तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची अवधी संपायच्या 45 दिवस आधी तुम्ही अर्ज करायला हवा, जेणेकरून ती वेळेत आणि कोणत्याही अडचणीशिवाय सहज पोर्ट होईल.
पोर्टिन्गच्या वेळेस मला पुन्हा मेडिकल एक्झामिनेशन द्यावे लागेल का?
हे संपूर्णपणे तुमच्या नवीन इन्शुरन्स प्रोव्हायडर आणि त्याच्या अंडररायटिंग प्रोसेस वर अवलंबून असते.
मी माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन पोर्ट करू शकतो का?
नक्कीच!! अधिकांश इन्शुरन्स प्रोव्हायडर्स त्यांच्या वेबसाईट वर त्यांच्या कंपनी मध्ये तुमची इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचा पर्याय देतात.
पोर्टिन्गसाठी कोणकोणत्या पॉलिसीज पात्र आहेत?
पोर्टेबलिटी सर्वच प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजवर लागू होते: इंडीव्हिजुअल, फॅमिली फ्लोटर आणि ग्रूप इन्शुरन्स पॉलिसीज देखील. तरी, तुम्ही आणखीन सविस्तर माहितीसाठी तुम्ही तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडर कडे विचारणा करायला हवी.