सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
हेल्थ इन्शुरन्स बद्दल बोलायचा झालं तर, इनपेशन्ट आणि आउटपेशन्ट हॉस्पिटलायझेशन मधील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्थ इन्शुरन्स मध्येच कव्हर केले जाणारे हे दोन्ही प्रकार मेडिकल केअर आणि सेवांचे आहेत.
जर तुम्ही एखादी पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे आधी घेतलेली एक पॉलिसी असेल, तर इनपेशन्ट आणि आउटपेशन्ट हॉस्पिटलायझेशन मधील फरक जाणून घेतल्यावर तुम्हला तुमच्या हेल्थकेअर कव्हरेज बद्दल विचारपूर्वक निर्णय घेणे सोपे जाईल.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणत्याही आजारावर उपचार घेण्यासाठी ठराविक काळासाठी कोणत्याही हॉस्पिटल किंवा हेल्थ केअर सेंटर मध्ये एडमिट झाल्यावर दिली जाणारी ट्रीटमेंट होय. या काळात पेशन्टला कॉम्प्रीहेन्सिव्ह मेडिकल सर्व्हिस मिळते आणि त्याच्या आजाराच्या गंभीरते आणि स्वरूपाप्रमाणे जशी गरज असेल तसे एका रात्रीसाठी किंवा जास्त काळासाठी हॉस्पिटल मध्ये राहता देखील येते.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशनची उदाहरणे म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट, जॉईन्ट रिप्लेसमेंट, यासाठीच्या सर्जरीज कार्डियाक सर्जरीज, गंभीर आजार जसे कॅन्सर, स्ट्रोक, हार्टअटॅक, चाईल्ड बर्थ आणि मॅटर्निटी केअर, मेंटल हेल्थ ट्रीटमेंट ई.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशनचे मुख्य दोन प्रकार आहेत:
आउटपेशन्ट ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये एक किंवा जास्त रात्रींसाठी न राहता केवळ ट्रीटमेंटसाठी जाता. हा पर्याय साधारणपणे, जेव्हा जास्त काळजी करण्यासारखा किंवा घेण्यासारखा आजार नसेल आणि कमी गंभीर मेडिकल कंडीशन्स असतील अशा आजारांच्या बाबतीत निवडला जातो. उदाहरणार्थ, कन्सल्टेशन चार्जेस, डायग्नोस्टिक टेस्ट, मायनर प्रोसिजर्स, थेरेपि सेशन्स, आणि फॉलो-अप अपॉइंटमेंट्स.
खाली काही आउटपेशन्ट सर्व्हिसेसचे सामान्य प्रकार दिलेले आहेत:
इनपेशन्ट आणि आउटपेशन्ट हॉस्पिटलायझेशन यामध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत, जे खालील तक्त्यात दिलेले आहेत:
मुद्दे | इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन | आउटपेशन्ट हॉस्पिटलायझेशन |
कालावधी | एक किंवा एक पेक्षा जास्त दिवसाचे हॉस्पिटलायझेशन अनिवार्य आहे. | एक रात्र किंवा एकापेक्षा जास्त रात्री राहण्याची गरज नाही. |
ट्रीटमेंटची तीव्रता | गंभीर आजार, मोठ्या सर्जरीज, किंवा क्लिष्ट मेडिकल कंडीशन्स मध्ये उपयुक्त | कमी त्रासदायक प्रोसिजर्स, रुटीन चेक-अप्स, डायग्नोस्टिक टेस्ट्स, आणि मायनर सर्जरीज |
मेडिकल केअरची व्याप्ती | कॉम्प्रीहेन्सिव्ह मेडिकल केअर, मॉनीटरिंग, आणि 24 तास नर्सिंग सपोर्ट | कमी संवेदनशील मेडिकल केअर; पेशन्ट्सना ट्रीटमेंट मिळते आणि ते विश्रांतीसाठी लगेच घरी जाऊ शकतात. |
खर्च | जर हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी वाढला तर रूम चार्जेस आणि इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिसेस सगळ्याचाच खर्च वाढतो. | सामान्यतः इनपेशन्ट केअर पेक्षा जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह |
स्पेश्लाइजेशनची लेव्हल | स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस जसे इंटेन्सिव्ह केअर, स्पेशलाइज्ड सर्जरीज, किंवा अशा ट्रीटमेंट्स जिथे सतत मॉनीटरिंगची गरज असते. | कोणत्याही स्पेशलाइज्ड सर्व्हिसेसचा समावेश नाही; आउटपेशन्ट ट्रीटमेंट आणि डायग्नोस्टिक सर्व्हिसेस वर जास्त भर असतो. |
विशेषतः हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज घेताना आउटपेशन्ट केअर आणि इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन मधला विचार समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक श्रेणीसाठी पॉलिसीचे वेगवेगळे कव्हरेज लिमिट्स आणि बेनिफिट्स असू शकतात.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन साठी योग्य हेल्थ इन्शुरन्स असणे खूप महत्त्वाचे आहे कारण हे तुम्हाला आर्थिक मदत करते आणि हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च, मेडिकल प्रोसिजर्स, आणि स्पेशलाइज्ड केअर्स मुले वाढणारे आर्थिक ओझे कमी करण्यातही हातभार लावते.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन साठी योग्य हेल्थ इन्शुरन्सचा विचार करताना पॉलिसी कडून मिळणारे कव्हरेज ऑप्शन्स आणि बेनिफिट्स लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
चला तर इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन साठी हेल्थ इन्शुरन्स कव्हरेजचे महत्त्व आणि बेनिफिट्स समजून घेऊया:
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये बऱ्यापैकी मेडिकल एक्स्पेन्सेस उद्भवू शकतात.हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे हे एक्स्पेन्सेस कव्हर करून आर्थिक सुरक्षा प्रदान करते. यामुळे तुम्हाला मोठी मोठी मेडिकल बिले भरण्याच्या ओझ्यापासून सुटका मिळते आणि आर्थिक ताण न घेता तुम्हाला आवश्यक ती ट्रीटमेंट आणि काळजी घेतली जावी याची हमी देखील देते.
हेल्थ इन्शुरन्समुळे तुम्हाला उत्तम दर्जाच्या हेल्थ केअरचा लाभ घेता येतो. त्यांना त्यांच्या प्राधान्याच्या हॉस्पिटल्स आणि हेल्थ केअर प्रोव्हायडर्स च्या नेटवर्क मधून योग्य तो पर्याय निवडण्याची संधी मिळते. यामुळे पेशन्टला प्रतिष्ठित संस्थेकडून सेवा आणि स्किल्ड मेडिकल प्रोफेशनल्स, मिळावी याची खात्री केली जाते, जेणेकरून आरोग्याच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन तुम्हाला 24/7 मॉनीटरिंग, स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट, सर्जरीज, आणि अनेक हेल्थ केअर प्रोफेशनल्स पर्यंत पोहोचण्याच्या संधी सह कॉम्प्रीहेन्सिव्ह मेडिकल केअर देते. तुम्हाला खर्चाची काळजी न करता कॉम्प्रीहेन्सिव्ह सर्व्हिस मिळावी याची हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज खातरजमा करतो.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन इमर्जन्सी सिचुएशन्स मध्ये जास्त उपयुक्त ठरते, जसे की एक्सिडेंट, गंभीर आजार, किंवा जीवाला धोका निर्माण करणारी परिस्थिती. लोकांना तात्कालिक मेडिकल अटेन्शन आणि केअर मिळावी आणि त्यांना वेळेत हॉस्पिटल मध्ये एडमिट केल जावे याची हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज हमी देतो. कठीण काळात हे जेव्हा तुम्हाला कळते की इमर्जन्सी मेडिकल केअर आणि हॉस्पिटलायझेशन कव्हर्ड आहेत, तुम्हाला थोडी मनःशांती मिळते.
इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये बऱ्याच वेळा काही काळ हॉस्पिटलायझेशन पूर्ण झाल्यानंतरची काळजीचा देखील समावेश असतो. जसे फॉलो-अप व्हिजीट्स, मेडिकेशन मॅनेजमेंत, रीहॅबीलिटेशन,किंवा होम हेल्थ केअर सर्व्हिसेस. हेल्थ इन्शुरन्स हे सर्व कव्हर करतो आणि हॉस्पिटल मधून घरी, हे ट्रांझीशन सुकर करते.
हेल्थ इन्शुरन्स सामान्यतः इनपेशन्ट हॉस्पिटलायझेशन्स आणि मोठ्या मेडिकल प्रोसिजर्स कव्हर करण्यासाठी उपयुक्त आहे असे समजले जाते, परंतु आउटपेशन्ट हॉस्पिटलायझेशन साठी देखील हेल्थ इन्शुरन्स कशा प्रकारे आपले कव्हरेज देतो हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
आउटपेशन्ट ट्रीटमेंट संबंधी हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे बेनिफिट्स जाणून घेऊया
संपूर्ण खर्च स्वतःच्या खिशातून न करता तुम्हाला आवश्यक त्या आउटपेशन्ट सर्व्हिसेस मिळाव्यात याची हमी हेल्थ इन्शुरन्स देतो. खर्चातील बराचसा भाग कव्हर करून हेल्थ इन्शुरन्स आउटपेशन्ट ट्रीटमेंट तुम्हा पॉलिसीहोल्डर्स साठी आणखीनच किफायतशीर आणि सुलभ करून देतो.
हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स मध्ये बऱ्याचदा प्राधान्यदेण्याजोग्या हेल्थ केअर प्रोव्हायडर्सचे नेटवर्क असते ज्यामध्ये डॉक्टर्स, क्लिनिक्स, डायग्नोस्टिक्स सेंटर्स आणि स्पेशालिस्ट्स यांचा समावेश असतो. हेल्थ इन्शुरन्स असलेली आउटपेशन्ट ट्रीटमेंट घेतल्याने तुम्हाला या प्रोफेशनल्स पर्यंत कॅशलेस पद्धतीसह पोहोचण्याची संधी देतो. त्याचसोबत विश्वस्त प्रोफेशनल्स कडून खात्रीशीर ट्रीटमेंटची हमी आणि आर्थिक मदत देखील पुरवतो.
आउटपेशन्ट ट्रीटमेंट साठी हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज मध्ये प्रिव्हेंटिव्ह केअर आणि वेलनेस प्रोग्राम्सचा समावेश असणे हे आणखीन एक महत्त्वाचा पैलू आहे.
प्रिव्हेंटिव्ह केअर मुळे आजाराचे वेळेत निदान होण्यात आणि आजारामुळे उद्भवणारे हेल्थ इशूज टाळले जाऊ शकतात.
त्याचबरोबर, वेलनेस प्रोग्राम्स आणि इनिशिएटिव्हज तुम्हाला एक आरोग्यपूर्ण जीवनशैली आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि एकूणच वेलनेस संबंधी एक्टीव्हिटीज मध्ये सहभागी होण्यासाठी देखील प्रोत्साहित करते.
हेल्थ इन्शुसर असल्यामुळे तुम्ही भरमसाठ खर्चाची काळजी न करता आउटपेशन्ट ट्रीटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या एकूणच तब्येतीत आणि राहणीमानात सुधारणा अणु शकता. तरी, एका हेल्थ केअर इन्शुरन्स प्लॅन्सचे बेनिफिट्स आणि कव्हरेज डीटेल्स एखाद्या व्यक्तीच्या हेल्थ केअरच्या गरजा आणि प्रधान्यतेशी जुळत आहेत की नाही हे काळजीपूर्वक तपासून बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे.