हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा

डिजिट इन्शुरन्सवर स्विच करा

कोपे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल मधील फरक

को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल म्हणजे काय?

हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही काही गोष्टी समजून घायला हव्या ज्या बऱ्याच वेळा कन्फ्युजिंग असतात.

विशेषतः को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल या शब्दांच्या बबतीत कोणीही लगेच गडबडून जाऊ शकतं.

काळजी नका करू, आम्ही आहोत ना!

या सदरात आम्ही को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल याबद्दल सविस्तर माहिती देऊ आणि हेल्थ इन्शुरन्स त्यांचा काय परिणाम होतो हे ही सांगू..

चला तर पाहूया!

हेल्थ इन्शुरन्स मध्ये को पे म्हणजे काय?

को पे या प्रकारामध्ये पॉलिसीहोल्डर्सना त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटच्या खर्चामधला काही ठराविक भाग पे करावा लागतो आणि उरलेला भाग इन्शुरर पे करतो. हा भाग ट्रीटमेंटच्य खर्चातील काही ठराविक रक्कम असू शकते किंवा त्यातील काही टक्के असू शकतात.

उदाहरणार्थ, जर तुमची पॉलिसी तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चाच्या Rs. 2000च्या को पे क्लॉजची असेल आणि तुमच्या ट्रीटमेंटचा खर्च Rs. 10,000 असेल तर तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटसाठी Rs. 2000 भरायचे आहेत आणि उरलेले Rs. 8000 इन्शुरर द्वारा भरले जातील.

तसेच, जर तुमच्या पॉलिसीच्या को पे क्लॉज प्रमाणे तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चातील 10% भरायचे असतील तर तुम्हाला Rs. 1000 भरावे लागतील आणि उरलेले 90% इन्शुरर भरेल.

इन्शुरन्स पॉलिसी मध्ये को पेमेंटचे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:

  • को पे क्लॉजमध्ये इन्शुरन्स पॉलिसी होल्डर्सना क्लेमचा सर्वाधिक भाग पे करावा लागतो त्याउलट पॉलिसी होल्डर्सना क्लेमचा ठराविक भागच भरावा लागतो.
  • तुम्ही घेलेल्या मेडिकल सर्व्हिसवर को पेची रक्कम ठरते.
  • जितकी जास्त तुमची को पेमेंटची रक्कम असेल तितके तुमचे प्रीमियम जास्त असेल.
  • असे क्लॉजेस बहुतांशवेळा सिनिअर सिटीझन्सच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्येच लागू होतात.
  • हे क्लॉजेस मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये जास्त लोकप्रिय आहेत कारण तिथे ट्रीटमेंटचा खर्च महाग असतो.

पॉलिसी मध्ये को पे क्लेम नसेल तर त्याचा अर्थ होतो की ट्रीटमेंट साठी लागणारा सर्व खर्च इन्शुरन्स प्रोव्हायडरच करेल.

डिजिट इन्शुरन्स 0% को पेमेंट वर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज देतो आणि तुमच्या ट्रीटमेंटचा सगळं खर्च कव्हर करतो.

आणखीन जाणून घ्या:

डिडक्टिबल्स म्हणजे काय?

डिडक्टिबल्स म्हणजे एक ठराविक रक्कम जी पॉलिसीहोल्डरला त्यांच्या ट्रीटमेंटच्या खर्चासाठी त्यांची इन्शुरन्स पॉलिसी योगदान देणे सुरु करण्याआधी पे करावी लागते. डिडक्टिबल्स पे करण्यासाठीची अट इन्शुरन्स प्रोव्हायडर द्वारा ठरवली जाते की ती वार्षिक असेल की प्रत्येक ट्रीटमेंट प्रमाणे असेल.

उदाहरणार्थ, जर तुमच्या पॉलिसीमध्ये Rs. 5000चे डिडक्टिबल्स अनिवार्य असतील तर तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चासाठी Rs. 5000 भरावे लागतील आणि त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी आपले योगदान सुरु करू शकेल.

 डिडक्टिबल्सचे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:

  • यामुळे इन्शुरन्स कंपन्यांना सततचे आणि अनावश्यक क्लेम्स पासून सुरक्षा मिळते.
  • यामुळे इन्शुरन्स पॉलिसीसाठीचे प्रीमियम पेमेंट देखील कमी होते.
  • तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट साठीचा खर्च यामुळे कदाचित वाढू शकतो.

हेल्थ इन्शुरन्स डिडक्टिबल्स बद्दल आणखीन जाणून घ्या.

कोइन्शुरन्स म्हणजे काय?

कोइन्शुरन्स म्हणजे डिडक्टिबल्स पे केल्यानंतरची उरेला भाग होय. ही रक्कम सामान्यतः % मध्ये ठरवली जाते. ही सुविधा हेल्थ इन्शुरन्स मधील को पेमेंट सुविधेसारखीच आहे.

उदाहरणार्थ, जर तुमचा कोइन्शुरन्स 20% असेल तर तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चाच्या 20% रक्कम भरावी लागेल उरलेले 80% इन्शुरन्स प्रोव्हायडर भरतो.

म्हणजेच, एखादा आजार बरा करण्यासाठीचा खर्च Rs. 10,000असेल, तर तुम्हाला Rs. 2000 भरावे लागतील आणि उरलेले Rs. 8000 इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करेल.ही रक्कम सामान्यतः तुम्ही डिडक्टिबल्स पे केल्यानंतर काढली जाते.

कोइन्शुरन्स प्लॅनचे काही फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:

  • मोठ्या क्लेम्सच्या बाबतीत यामुळे इन्शुरर्सना सुरक्षा मिळते.
  • पॉलिसी होल्डर्सने त्यांची डिडक्टिबल्सची रक्कम त्यांचा कोइन्शुरन्स प्लॅन सुरु होण्यापूर्वी भरावी लागते.
  • कोइन्शुरन्सचे % ठराविकच असतात.
  • हे % तुमची इन्शुरन्स पॉलिसी उरलेली रक्कम पे करणे सुरु करायच्या आत तुम्ही तुमच्या खिशातून जास्तीत जास्त किती रक्कम भरू शकता यावर अवलंबून असते.

आता जसे की तुम्हाला माहित झाले आहे की तुमच्या हेल्थ इन्शुरन्स साठीच्या या तीनही टर्म्सचा अर्थ काय आहे, तर चला आता आपण या तीनही टर्म्स मधील फरक समजून घेऊ.

आता को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल्स ना उदाहरणाद्वारे समजून घेऊ

तीनही कॉस्ट शेअरिंग पर्याय खाली दिलेल्या टेबल मध्ये दिलेली आहे:

समजा एका माणसाकडे Rs. 5 लाख रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी आहे ज्यावर 10% इतके को पे आणि Rs. 5000 इतके डिडक्टिबल्स आहेत.

डिडक्टिबल्स सोबतच त्याच्या पॉलिसी मध्ये आणखीन 10% कोइन्शुरन्स क्लॉज देखील आहे. एखाद्या आजाराच्या उपचाराचा खर्च समजा Rs. 10,000 असेल तर या क्लॉज मुळे त्याची लायबिलिटीज खालील प्रकारे असतील:

को पे डिडक्टिबल्स कोइन्शुरन्स
ट्रीटमेंटच्या खर्चाच्या 10%. समजा ट्रीटमेंटचा खर्च Rs. 10,000 इतका आहे. अशाप्रकारे, ट्रीटमेंट दरम्यान पॉलिसी होल्डरला ट्रीटमेंटच्या खर्चातील Rs. 1000 भरावे लागतील आणि उरलेले Rs. 9000 इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करेल. याठिकाणी डिडक्टिबल्स Rs. 5000 इतके आहेत, जे पहिले पॉलिसी होल्डर ट्रीटमेंट साठी पे करेल. पॉलिसी होल्डरने त्याचा Rs. 5000 इतका शेअर पे केल्यानंतरच पॉलिसी सुरु होईल. डिडक्टिबल्स पे क्लेयानंतरच कोइन्शुरन्स लागू होतो. जर ट्रीटमेंटचा खर्च Rs. 10,000 इतका असेल आणि Rs. 5000चे डिडक्टिबल्स पे केले असतील, तर पॉलिसीमध्ये बाकीचे Rs. 5000 कव्हर केले जटील. या उरलेल्या Rs. 5000 मधील 10% म्हणजेच Rs. 500 पॉलिसी होल्डरला कोइन्शुरन्स या क्लॉज अंतर्गत पे करावे लागतील. आणि उरलेले Rs. 4500 इन्शुरन्स पॉलिसी द्वारा कव्हर केले जातील.

को पे आणि डिडक्टिबल्स मध्ये काय फरक आहे?

खालील टेबल मध्ये को पे आणि डिडक्टिबल्स क्लॉजेस मधला फरक दाखविण्यात आला आहे:

मुद्दे को पे डिडक्टिबल्स
लागू असणे को पे हा पॉलिसी होल्डरच्या ट्रीटमेंटच्या खर्चातील एक ठराविक भाग आहे जो त्याला पे करावा लागतो आणि उरलेला भाग इन्शुरन्स प्रोव्हायडर पे करतो. ट्रीटमेंटच्या खर्चातील हा भाग ठराविक रक्कम असते किंवा काही % असतात. डिडक्टिबल्स म्हणजे पॉलिसी होल्डरला त्याची इन्शुरन्स पॉलिसी सुरु होऊन मेडिकल बिलामधील सर्वाधिक भाग कव्हर करण्याआधी भरलेली ठराविक रक्कम होय.
प्रीमियम वरील परिणाम को पेची रक्कम जास्त असली तरी पॉलिसी होल्डर्सना कमी प्रीमियम भरावा लागतो. डिडक्टिबल्स सुविधेमध्ये सुद्धा पॉलिसी होल्डर्सना कमी प्रीमियम भरावा लागतो.
कोइन्शुरन्स क्लॉज को पे ची बऱ्याचदा कोइन्शुरन्स सोबत परस्पर अदलाबदल करता येऊ शकते. पॉलिसी होल्डर्सना बऱ्याचदा त्यांच्या पॉलिसी मधील डिडक्टिबल्सचा भाग पे केल्यानंतर कोइन्शुरन्स पे करावा लागतो.
अंमलबजावणी काही ठराविक हेल्थ केअर सर्व्हिसेस वरतीच को पे लागू होतो. तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चातील भाग इन्शुरन्स पॉलिसीद्वारा पे करणे सुरु करण्याच्या आधीच डिडक्टिबल्स हे लागू होतात.

को पे आणि कोइन्शुरन्स मध्ये काय फरक आहे?

जरी बऱ्याचदा हे एकमेकाला पर्याय म्हणून वापरले जात असले तरी, को पे आणि कोइन्शुरन्स मध्ये काही क्षुल्लक फरक आहेत. ते फरक कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील टेबल बघूया:

मुद्दे को पे कोइन्शुरन्स
लागू असणे तुमची मेडिकल ट्रीटमेंट सुरु असताना तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चातील, तुम्हाला भरायला लागणारा हा ठराविक असा काही भाग असतो. ही काही ठराविक रक्कम असते किंवा ट्रीटमेंटच्या खर्चाचा काही ठराविक % असतात. कोइन्शुरन्सची रक्कम वेगवेगळी असू शकते. परंतु, कोइन्शुरन्स क्लॉज प्रामाणे तुमच्या ट्रीटमेंटसाठीच्या खर्चातील काही % जें तुम्हाला भरायचे आहेत ठराविक % असतात.
पेमेंट प्रोसेस को पे क्लॉज अंतर्गत तुम्ही जेव्हां जेव्हां मेडिकल सर्व्हिस घेता तेव्हा तेव्हा पेमेंटचा ठरलेला भाग तुम्हाला पे करावा लागतो. जेव्हां तुम्ही तुमच्या डिडक्टिबल्स कव्हर केल्यानंतरच तुम्हाला मेडिकल सर्व्हिसेस साठी कोइन्शुरन्स भरावा लागतो.
पेमेंटची वेळ को पे क्लॉज अंतर्गत तुम्ही सर्व्हिस घेताना तुम्हाला ठरलेला काही भाग भरावा लागतो. तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चासाठी जी रक्कम भराल ती इन्शुरन्स प्रोव्हायडर द्वारा बिल केली जाते आणि तुम्हाला ती रक्कम त्यांना थेट पे करावी लागते.
डिडक्टिबल्स वर परिणाम को पे काही ठराविक परिस्थितीतच डिडक्टिबल्सवर अवलंबून असतो. डिडक्टिबल्स पे केल्यानंतरच कोइन्शुरन्स पे केला जातो.

कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल्स मधील फरक

आता तुम्हाला को पे आणि डिडक्टिबल्स मधला फरक आणि को पे आणि कोइन्शुरन्स मधील फरक माहित झाला आहे, तर आता कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल्स मधला फरक समजणे सोपे जाईल. त्यातील काही फरक खालील प्रमाणे आहेत:

मुद्दे कोइन्शुरन्स डिडक्टिबल्स
लागू असणे एखादा आजार बरा करण्यासाठीच्या उपचाराच्या खर्चातील काही ठराविक % पॉललिसी होल्डरला भरावे लागतात, त्यालाच कोइन्शुरन्स म्हणतात. त्या खर्चातील उरलेला भाग इन्शुरन्स प्रोव्हायडर कव्हर करतो. डिडक्टिबल्स म्हणजे ती ठराविक रक्कम जी इन्शुरन्स होल्डरना त्यांची इन्शुरन्स पॉलिसीत्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटच्या खर्चासाठी तिचे योगदान देणे सुरु करण्याआधी भरावी लागते.
पेमेंटसंबंधी मर्यादा जेव्हां जेव्हां तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या अगेन्स्ट क्लेम मागता तेव्हा तेव्हा कोइन्शुरन्स पे केला जातो. एक वर्षासाठीच्या डिडक्टिबल्सची निर्धारित रक्कम भरल्यानंतर डिडक्टिबल्स साठीचे पेमेंट संपते.आता तुम्हाला पुढच्या वर्षीच डिडक्टिबल भरावे लागेल.
पेमेंटच्या रकमेची नश्वरता ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चावर कोइन्शुरन्स डिडक्टिबल्सची रक्कम बदलत नाही. ची रक्कम अवलंबून असते.
रिस्क फॅक्टर लायबिलिटी विचारात घेता, कोइन्शुरन्स मध्ये जास्त रिस्क आहे कारण तुम्हाला ट्रीटमेंटच्या खर्चातील ठराविक % भरावा लागतो. ट्रीटमेंटचा रक्कम जास्त असू शकते. डिडक्टिबल्स ही लायबिलिटी ठरत नाही कारण खर्च कितीही जास्त असला तरी भरावी लागणारी रक्कम ठरलेलीच असते. ही रक्कम खर्चाप्रमाणे कमी किंवा जास्त होत नाही.

आता जसे की आपल्याला को पे, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल्स याचा अर्थ आणि त्यातील फरक, दोन्हीही सविस्तर समजले आहे, जास्तीत जास्त फायद्यांसह उपलब्ध असलेली इन्शुरन्स पॉलिसी निवडणे आता सोपे होईल.

 

आणखीन जाणून घ्या:

को पे विथ डिडक्टिबल्स म्हणजे काय?

जरी को पे, डिडक्टिबल्स आणि कोइन्शुरन्स या तीनही कॉस्ट शेअरिंग टर्म्स असल्या तरी त्या लागू होणे तुमच्या संपूर्ण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन वर परिणाम करू शकते.

डिडक्टिबल्स आणि कोइन्शुरन्स असे क्लॉजेस आहेत जे एकाच इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत लागू केले जाऊ शकतात. परंतु, काही इन्शुरन्स प्लॅन्स कोपेमेंट आणि डिडक्टिबल क्लॉज एकत्र लागू करतात.

तुमच्या इन्शुरन्स प्लॅन मध्ये ही असेच काही होत असेल, तर त्याचा तुमच्यासाठी त्याचा अर्थ असेल-

  • तुम्हाला तुमच्या ट्रीटमेंट प्लॅन्ससाठी ठराविक रक्कम भरावी लागेल. तुम्ही भरलेली डिडक्टिबल्सची रक्कम संपल्यावरच तुमचा इन्शुरन्स प्लॅन तुमच्या ट्रीटमेंटच्या खर्चातील योगदान देणे सुरु करेल.
  • इन्शुरन्स प्लॅनने त्याचे योगदान धने सुरु केल्यानंतर तुम्हाला दर वेळेस पॉलिसीच्या अगेन्स्ट क्लेम केल्यावर ठरलेली रक्कम भरावी लागेल. तुम्ही तुमची कोपेमेंटची रक्कम भरल्यानंतर इन्शुरन्स प्लॅन तुमची थकबाकी भरेल.
  • तुम्हाला पॉलिसी साठी कमी प्रीमियम भरावे लागेल, जेणेकरून त्याचा लाभ घेणे स्वस्त होईल(ते स्वस्त होईल).

तुम्ही कोपेमेंट, कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल क्लॉजेस असलेला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडायला हवा का?

तर, जरी तुम्ही अशा कॉस्ट शेअरिंग टर्म्स असलेली पॉलिसी निवडली असताना तुमचे प्रीमियम कमी दिसत असले तरी पॉलिसी साठीची तुमची लायबिलिटी वाढलेलीच असते. जेव्हां कधी कोणतीही मेडिकल इमर्जन्सी येईल तेव्हा तुम्हाला त्या इमर्जन्सी साठी लागणाऱ्या खर्चातील भराव्या लागणाऱ्या एका ठराविक भागाची आधी सोय करावी लागेल. अशा वेळेस जर तुमच्याकडे कॅश उपलब्ध नसेल तर अडचणी येऊ शकतात.

त्यामुळे, अशा कॉस्ट शेअरिंग टर्म्स लागू नसलेलेच हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स निवडणे फायद्याचे ठरेल. भारतातील इन्शुरन्स कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेल्या असंख्य पॉलिसीज मधून तुमच्या गरजा पूर्ण करणारी पॉलिसी तुम्हाला सहज सापडेल.

तुमच्या गरजा पूर्ण करणारी सर्वोत्तम अशी पॉलिसी निवडताना त्यातील नियम आणि अटी व्यवस्थित तपासून घ्या!

कोइन्शुरन्स, को पे आणि डिडक्टिबल मधील फरक याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

बाजारात कोपेमेंट क्लॉज नसलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहेत का?

होय, डिजिटचे हेल्थ इन्शुरन्स मध्ये 0% कोपेमेंट असते. तसेच तुम्ही पॉलिसी सोबत झिरो अपग्रेड कव्हर देखील घेऊ शकता.

कोइन्शुरन्स आणि डिडक्टिबल्स एकत्र लागू केले जाऊ शकतात का?

होय, बऱ्याचदा डिडक्टिबल्स असलेल्या पॉलिसीज सोबत कोइन्शुरन्स क्लॉज देखील जोडला जातो.

वेगवेगळ्या हेल्थकेअर सर्व्हिसेसची को पेची रक्कम वेगळी असते का?

होय, को पेची रक्कम वेगवेगळ्या सर्व्हिसेस साठी वेगळी असू शकते परंतु सर्व्हिसेससाठीची एकूण रक्कम एकसारखीच असते.

को पे क्लॉज मुळे प्रीमियमची रक्कम कमी होते का?

होय, को पे क्लॉज असलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज, हा क्लॉज नसलेल्या पॉलिसीज पेक्षा स्वस्त असतात.