डिजिट इन्शुरन्ससह भारतात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करा
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?
हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स हा जनरल इन्शुरन्सचा प्रकार आहे. जो तुम्हाला आरोग्य स्थिती किंवा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत म्हणजेच एखाद्या आजारामुळे किंवा अगदी अपघातामुळे उपचार घ्यायची वेळ आल्यास आर्थिक नुकसानीपासून तुमचे संरक्षण करतो.
यामध्ये तुमच्या कस्टमाइझ हेल्थ इन्शुरन्स प्लॅननुसार रूग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि दाखल झाल्यानंतरचे खर्च, वार्षिक आरोग्य तपासणी, मानसोपचार सहाय्य, गंभीर आजार आणि मातृत्वाशी संबंधित खर्च यांचा समावेश होतो.
तुम्हाला माहित असलेल्या एका मित्रासारखा विचार करा, तुम्ही आजारी असल्यावर किंवा अगदी वाईट परिस्थितीत तुमच्यासाठी हा मित्र नेहमी मदत करायला उपस्थित असेल.
"मला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाही"
तुम्हाला ही पटतय काय, पटत असेल तर वाचा.
वेक्टर-बोर्न रोग मृत्यू ही अनेक क्षेत्रांमध्ये समस्या आहे. 2020 मध्ये, आख्या आशिया पॅसिफिक प्रदेशात आपल्या देशात सर्वात जास्त मलेरियाचे केसेस प्रकरणे निघाली.[1]
आहार आणि बैठी जीवनशैली मुळे जवळपास 61 टक्के भारतीय महिला आणि जवळपास 47 टक्के भारतीय पुरुष रोगट आयुष जगतात. [2]
भारतात, नऊपैकी एकाला त्यांच्या आयुष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. पुढे, 2020 च्या तुलनेत 2025 मध्ये कर्करोगाच्या केसमध्ये 12.8 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. [3]
भारताचा सध्याचा मेडिकल इनफ्लेशन रेट 14% आहे आणि हा 2021 प्रमाणे आशियाई देशांमध्ये सर्वाधिक आहे. 2023 मध्ये, आणखी 10% वाढ अपेक्षित आहे. [4]
खरं तर, प्रौढांमधील एकूण आजारांपैकी मानसिक आरोग्य विकारांचा वाटा सुमारे 14.3 टक्के होता. [5]
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हृदयविकार हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आता त्यात कर्करोग आणि मधुमेहाच्या वाढत्या प्रवृत्तीची भर पडली आहे.
डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय चांगले आहे?
सोपी ऑनलाइन प्रक्रिया – हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापासून क्लेम करण्यापर्यंतची प्रक्रिया पेपरलेस, सोपी, जलद आणि त्रासमुक्त! हार्ड कॉपी नाही, अगदी क्लेम्ससाठीही!
वय-आधारित किंवा झोन-आधारित को-पेमेंट नाही- आमचा हेल्थ इन्शुरन्स वय-आधारित किंवा झोन-आधारित सहपेमेंटसह येतो. याचा अर्थ असा की, हेल्थ इन्शुरन्सच्या क्लेम्सदरम्यान, आपल्याला आपल्या खिशातून काहीही देण्याची आवश्यकता नाही.
खोली भाड्याचे बंधन नाही - आम्ही समजतो की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे आमच्याकडे खोली भाड्याचे कोणतेही निर्बंध नाहीत. आपल्याला आवडणारी कोणतीही रुग्णालयाची खोली निवडा.
एस.आय वॉलेट बेनिफिट - जर आपण पॉलिसी च्या कालावधीत आपली सम इन्शुअर्ड रक्कम संपवली तर आम्ही ती तुमच्यासाठी रिफिल करतो.
कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्या - कॅशलेस उपचारांसाठी भारतातील आमच्या नेटवर्क रुग्णालयांपैकी 10500+ निवडा किंवा रिमएमबर्समेंट निवडा.
वेलनेस बेनिफिट्स - टॉप रेटेड हेल्थ आणि वेलनेस पार्टनर्सच्या सहकार्याने डिजिट अॅपवर एक्सक्लुझिव्ह वेलनेस बेनिफिट्स मिळवा.
INFINITEEEEE हेल्थ इन्शुरन्स डिजिट इन्फिनिटी वॉलेट प्लॅनसह
प्रत्येकाला अनुकूल असे हेल्थ इन्शुरन्सचे पर्याय
आमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे?
कव्हरेजेस
डबल वॉलेट प्लान
इनफिनिटी वॉलेट प्लान
वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅन
महत्वाची वैशिष्ट्ये
सर्व हॉस्पिटलायझेशन - अपघात, आजारपण, गंभीर आजार किंवा कोविडमुळे
यामध्ये आजारपण, अपघात, गंभीर आजार किंवा कोविड 19 सारख्या साथीच्या आजारासह हॉस्पिटलायझेशनच्या सर्व खर्चाचा समावेश आहे. जोपर्यंत एकूण खर्च आपल्या विम्याच्या रकमेपर्यंत आहे तोपर्यंत याचा वापर एकाधिक हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हर करण्यासाठी केला जाऊ शकतो.
प्रारंभिक प्रतीक्षा अवधि
कोणत्याही नॉन-एक्सीडेंटल आजाराशी संबंधित उपचारांसाठी कव्हर होण्यासाठी आपल्याला आपल्या पॉलिसीच्या पहिल्या दिवसापासून ठराविक कालावधीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. हा प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी आहे.
वेलनेस प्रोग्राम
होम हेल्थकेअर, टेलि कन्सल्टेशन, योगा आणि माइंडफुलनेस सारखे एक्सक्लुझिव्ह वेलनेस बेनिफिट्स आमच्या अॅपवर उपलब्ध आहेत.
सम इन्शुअर्ड बॅकअप
आम्ही एक बॅक-अप इन्शुरन्स प्रदान करतो जी आपल्या सम इन्शुअर्डच्या 100% आहे. विमा बॅक अप कसे कार्य करते? समजा आपल्या पॉलिसीची इन्शुरन्सची रक्कम 5 लाख रुपये आहे. आपण 50,000 रुपयांचा क्लेम करता. डिजिट आपोआप वॉलेट बेनिफिट ट्रिगर करतो. तर आता आपल्याकडे वर्षासाठी 4.5 लाख + 5 लाख विम्याची रक्कम उपलब्ध आहे. तथापि, एक क्लेम, वरील प्रकरणात, 5 लाखांप्रमाणे बेस सम इन्शुअर्ड पेक्षा जास्त असू शकत नाही.
कयूम्युलेटीव्ह बोनस
Digit Special
पॉलिसी वर्षात कोणतेही क्लेम्स नाहीत? निरोगी राहण्यासाठी आणि क्लेम फ्री राहण्यासाठी आपल्याला बोनस - आपल्या एकूण सम इन्शुअर्ड मध्ये एक अतिरिक्त रक्कम मिळते!
खोली भाडे मर्यादा नाही
वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्यांचे भाडे वेगवेगळे असते. जसे हॉटेलच्या खोल्यांमध्ये टॅरिफ असतात. डिजिट प्लॅन आपल्याला खोली भाड्याची मर्यादा नसल्याचा फायदा देतात, जोपर्यंत ते आपल्या विम्याच्या रकमेपेक्षा कमी आहे.
डे केअर प्रक्रिया
हेल्थ इन्शुरन्स केवळ 24 तासांपेक्षा जास्त रुग्णालयात दाखल होण्यासाठी वैद्यकीय खर्च कव्हर करतो. डे केअर प्रक्रिया म्हणजे रुग्णालयात केले जाणारे वैद्यकीय उपचार, मोतीबिंदू, डायलिसिस यासारख्या तांत्रिक प्रगतीमुळे 24 तासांपेक्षा कमी आवश्यक असतात.
वर्ल्डवाइड कव्हरेज
Digit Special
वर्ल्डवाइड कव्हरेजसह जागतिक दर्जाचे उपचार मिळवा! जर आपल्या डॉक्टरांना भारतात आपल्या आरोग्य तपासणीदरम्यान एखादा आजार आढळला आणि आपण परदेशात उपचार घेऊ इच्छित असाल तर आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत. आपण कव्हर्ड आहात!
आरोग्य तपासणी
वर्ल्डवाइड कव्हरेजसह जागतिक दर्जाचे उपचार मिळवा! जर आपल्या डॉक्टरांना भारतात आपल्या आरोग्य तपासणीदरम्यान एखादा आजार आढळला आणि आपण परदेशात उपचार घेऊ इच्छित असाल तर आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत. आपण कव्हर्ड आहात!
आपत्कालीन एअर अॅम्ब्युलन्स खर्च
आपत्कालीन जीवघेणा आरोग्याची स्थिती असू शकते ज्यास त्वरित रुग्णालयात नेण्याची आवश्यकता असू शकते. आम्ही हे पूर्णपणे समजून घेतो आणि विमान किंवा हेलिकॉप्टरने आपल्या रुग्णालयात नेण्यासाठी झालेल्या खर्चाचे रीएमबर्समेंट करतो.
वय / झोन आधारित को-पेमेंट
Digit Special
को-पेमेंट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत किंमत शेअरिंगची आवश्यकता ज्यामध्ये अशी तरतूद आहे की पॉलिसीधारक / विमाधारक स्वीकार्य क्लेम्सच्या रकमेची विशिष्ट टक्केवारी सहन करेल. यामुळे विम्याची रक्कम कमी होत नाही. ही टक्केवारी वय यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते किंवा कधीकधी झोन आधारित कोपेमेंट नावाच्या आपल्या उपचार करत असलेल्या शहरावर देखील अवलंबून असते. आमच्या प्लॅन्समध्ये, वय आधारित किंवा झोन आधारित को पेमेंट नसते.
रोड रुग्णवाहिकेचा खर्च
आपण रुग्णालयात दाखल असल्यास रोड अॅम्ब्युलन्सच्या खर्चाची रीएमबर्समेंट मिळवा.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी / नंतर
हे कव्हर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतर च्या सर्व खर्चांसाठी आहे जसे की निदान, चाचण्या आणि पुनर्प्राप्तीसाठी.
इतर वैशिष्ट्ये
पूर्व-विद्यमान रोग किंवा प्रे-एक्सीझटिंग डिसीझ (पी.ई.डी) प्रतीक्षा कालावधी
ज्या आजाराने किंवा स्थितीने आपण आधीच ग्रस्त आहात आणि पॉलिसी घेण्यापूर्वी आम्हाला जाहीर केले आहे आणि आम्ही स्वीकारले आहे, आपल्या पॉलिसी शेड्यूलमध्ये निवडलेल्या आणि नमूद केलेल्या प्लॅननुसार प्रतीक्षा कालावधी आहे.
विशिष्ट आजार प्रतीक्षा कालावधी
आपण एखाद्या विशिष्ट आजारासाठी क्लेम करू शकण्याचा आधीचा हा कालावधी असतो. डिजिटवर हे 2 वर्षे आहे आणि पॉलिसी सक्रियतेच्या दिवसापासून सुरू होते. एक्सक्लूजन्सच्या संपूर्ण यादीसाठी, आपल्या पॉलिसी शब्दांचे स्टँडर्ड एक्सक्लूजन्स (एक्ससीएल02) वाचा.
इनबिल्ट वयक्तिक अॅक्सीडेंट कव्हर
अपघाताच्या तारखेपासून बारा (12) महिन्यांच्या आत आपल्या मृत्यूचे एकमेव आणि थेट कारण असलेल्या पॉलिसी कालावधीत आपल्याला अपघाती शारीरिक इजा झाल्यास, आम्ही पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या विम्याच्या रकमेच्या 100% रक्कम या कव्हरवर आणि निवडलेल्या प्लॅननुसार देऊ.
ऑर्गन डोनर खर्च
Digit Special
आपला अवयवदाता आपल्या पॉलिसीमध्ये समाविष्ट होतो. आम्ही डोनरच्या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चाची देखील काळजी घेतो. अवयवदान हे आजवरचे सर्वात दयाळू कर्म आहे आणि आम्ही असा विचार केला की, त्यात भाग का घेऊ नये!
डोममिसलरी हॉस्पिटलायझेशन
हॉस्पिटल मध्ये बेडस उपलब्ध नसू शकतात किंवा रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाची स्थिती ठीक नसू शकते. घाबरू नका! आपण घरी उपचार घेतले तरीही आम्ही आपल्याला वैद्यकीय खर्च कव्हर करतो.
बॅरिएट्रिक सर्जरी
लठ्ठपणा हे आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ असू शकते. आम्ही हे पूर्णपणे समजून आहोत आणि जेव्हा वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक असेल आणि आपल्या डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तेव्हा बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेसाठी कव्हर करतो. तथापि, या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणे कॉस्मेटिक कारणास्तव असल्यास आम्ही कव्हर करत नाही.
मानसिक आजार
एखाद्या आघातामुळे एखाद्या सदस्याला मानसोपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्याला 1,00,000 रुपयांपर्यंतच्या या लाभात समाविष्ट केले जाईल. मात्र, ओ.पी.डी कन्सल्टन्सी यात समाविष्ट नसेल. मनोविकार कव्हरसाठी प्रतीक्षा कालावधी विशिष्ट आजार प्रतीक्षा कालावधी सारखाच आहे.
कंझ्यूमेबल कव्हर
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर, चालण्यास मदत करणारे उपकरण, क्रेप पट्टी, बेल्ट इत्यादी इतर अनेक वैद्यकीय उपकरणे आणि खर्च आहेत, ज्याचा बोजा आपल्या खिश्या वर पडतो. अन्यथा पॉलिसीमधून वगळलेल्या या खर्चांची काळजी हे कव्हर घेते.
काय कव्हर केलेले नाही?
प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च, जोपर्यंत रुग्णालयात दाखल होत नाही.
आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराच्या बाबतीत, प्रतीक्षा कालावधी संपल्याशिवाय, त्या रोगाचा किंवा आजाराचा क्लेम करता येणार नाही.
डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय कोणतीही स्थिती, ज्यासाठी तुम्ही रुग्णालयात दाखल होता, ते समाविष्ट केले जात नाही.
डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्सचे प्रमुख फायदे
को-पेमेंट | नाही |
---|---|
खोली भाडे मर्यादा नाही | नाही |
कॅशलेस रुग्णालये | भारतभरात 10500+ नेटवर्क रुग्णालये |
इनबिल्ट वयक्तिक अॅक्सीडेंट कवर | हो |
वेलनेस फायदे | 10+ वेलनेस पार्टनर्सकडून उपलब्ध |
शहर आधारित सवलत | 10% पर्यन्त सवलत |
वर्ल्डवाइड कव्हरेज | हो* |
गुड हेल्थ सवलत | 5% पर्यन्त सवलत |
कंझ्यूमेबल कव्हर | अॅड-ऑन म्हणून उपलब्ध |
* केवळ वर्ल्डवाइड ट्रीटमेंट प्लॅनवर उपलब्ध
ऑल इज वेल- सर्व हेल्थ ग्राहकांसाठी वेलनेस फायदे
आमचा वेलनेस कार्यक्रम हा तुम्हाला तुमचे निरोगी जीवनाचे ध्येय गाठण्यात मदत करेल. त्यांचा उद्देश हेल्थ आणि फिटनेस सेवांवरील सूट आणि फायद्यांच्या श्रेणीद्वारे तुम्हाला निरोगी जीवनशैली साध्य करण्यात मदत करणे आहे.
याव्यतिरिक्त, आमच्या कार्यक्रमामध्ये माहितीपूर्ण सत्रे आणि कार्यक्रम समाविष्ट आहेत जे तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी अधिक जागरूक होण्यास मदत करू शकतात आणि तुम्हाला स्वतःची चांगली काळजी घेण्यास सक्षम बनवू शकतात. आमच्या वेलनेस कार्यक्रमासह, आम्ही तुम्हाला सुद्रुड राहण्यासाठी आवश्यक जागरूकता आणि संसाधने पुरविण्याचा प्रयत्न करतो.!
आमचे काही वेलनेस फायदे आहेत:
- जनरल चिकित्सकांशी फोनद्वारे सल्ला
- डेन्टल सल्लामसलत वर ऑफर आणि सूट
- हेल्थ तपासणी आणि निदानांवर सूट
- ऑनलाइन औषधांच्या ऑर्डरवर कॅशबॅक
- व्यावसायिकांद्वारे घेतलेल्या योग सत्रांमध्ये अॅक्सेस आणि अनेक ऑफर्स.
डिजीट कडून हेल्थ इन्शुरन्स कसा खरेदी करावा?
डिजिट मध्ये असलेल्या डिजिटल फ्रेंडली आणि त्रास-मुक्त प्रोसेसमुळे, डिजिट कडून इन्शुरन्स खरेदी करणे म्हणजे A.B.C. म्हणण्या इतके सोपे आहे ते पण फक्त काही साध्या स्टेप्ससह:
- स्टेप 1: आमच्या हेल्थ इन्शुरन्स पृष्ठावरील नियुक्त जागेवर, तुमचा पिन कोड आणि मोबाइल क्रमांक एंटर करा.
- स्टेप 2: पुढील पृष्ठावर, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे डिटेल्स एंटर करा ज्यांच्या वयाच्या ज्येष्ठ सदस्यसाठी तुम्हाला इन्शुरन्स हवा आहे तो प्लॅन तुम्ही नंतर कस्टमाइज करू शकता.
- स्टेप 3: तुमची सम इनशूअर्ड, तुमचा प्लॅन आणि कंझ्युमेबल कव्हरसारखे कोणतेही अतिरिक्त फायदे निवडा. आम्ही ज्या सूट देतो त्या इथे सूचीबद्ध केलेल्या आहेत.
- स्टेप 4: तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण डिटेल्स एंटर करा.
- स्टेप 5: आपण निवडलेल्या पर्यायांवर आधारित; तुम्हाला तुमची वार्षिक प्रीमियम पेमेंट रक्कम दिली जाईल जी तुम्ही पे करू शकता, तुमचे केवायसी सबमिट करू शकता आणि तुमची पॉलिसी त्वरित जारी करू शकता.
होय, हे इतके सोपे आहे!
कोणतीही अडचण नाही – तुम्ही तुमचं थोडा वेळ खर्ची करून तुमची हेल्थ कव्हर कराल!
तुमच्याकडे असलेला डिजिटचा हेल्थ इन्शुरन्स कसा रिन्यू करायचा?
हेल्थ इन्शुरन्सचे महत्त्व सगळ्यांना पटले आहे, आपली हेल्थकेअर पॉलिसी नेहमीच सक्रिय किंवा चालू असणे गरजेचे आहे कारण आम्हाला तिची कधीही गरज भासू शकते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वेळेवर भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डिजिटवर असलेल्या साध्या आणि डिजिटल फ्रेंडली प्रोसेसमुळे, तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्सचे फक्त काही साध्या स्टेप्समध्ये रिनिव करू शकता:
स्टेप 1: आमच्या वेबसाइट किंवा अॅपवर असलेल्या रिनिवल्स टॅबवर जा.
स्टेप 2: तुमचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा तुमच्या पॉलिसी डिटेल्स वापरुन लॉग इन करा.
स्टेप 3: पॉलिसीची टेन्यूअर संपण्याच्या 45 दिवस आधी पॉलिसी डिटेल्ससह तुम्हाला रिनिवल टॅब स्क्रीन वर दिसेल. स्टेप 4: पेमेंट करा आणि आपली पॉलिसी रिन्यू झाली!
किंवा
रिनिवलच्या काही दिवस अगोदर तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करण्यासाठी तुम्हाला डिजिट कडून नियमित माहिती मिळेल. ही माहिती रिनिवल लिंकसह येते जी तुम्ही थेट पेमेंट करण्यासाठी आणि तुमच्या पॉलिसीचे रिनिवल करण्यासाठी वापरू शकता.
क्लेम कसा दाखल करायचा?
रिएम्बर्समेंट क्लेम्स -आम्हाला रुग्णालयात दाखल झाल्याच्या दोन दिवसांच्या आत 1800-258-4242 वर कळवा किंवा आम्हाला healthclaims@godigit.com वर ईमेल करा आणि आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवू जिथे तुम्ही तुमची रुग्णालयाची बिले आणि सर्व रिएम्बर्समेंट प्रक्रिया करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करू शकता.
कॅशलेस क्लेम्स - नेटवर्क हॉस्पिटल निवडा. तुम्हाला नेटवर्क रुग्णालयांची संपूर्ण यादी येथे मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कवर ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागवा. सर्व काही व्यवस्थित असल्यास, तुमच्या क्लेमवर तेथे आणि तेथे प्रक्रिया केली जाईल.
जर तुम्ही कोरोनाव्हायरससाठी क्लेम केला असेल, तर आयसीएमआरच्या अधिकृत केंद्राकडून – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्याकडून तुमचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची खात्री करा
डिजिटची कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल्स
List of 16400+ Network Hospitals >डिजिटल हेल्थ इन्शुरन्स बद्दलच्या बातम्या
Health Insurance: All you need to know to avoid rejection of claims
- 02 Jan 2023
- B. KRISHNA MOHAN
How To Claim Health Insurance From Multiple Policies: All You Need To Know
- 07 Dec 2022
- Neelanjit Das
Maternity health insurance - what is covered, waiting period, tax benefits
- 02 Jan 2023
- Anshul
हेल्थ इन्शुरन्स क्लेम कसे कार्य करतो?
हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत नवखे असल्याने संभ्रमात आहात का की हेल्थ इन्शुरन्स क्लेम कसे कार्य करतो, विशेषत: डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात? आम्ही खाली तुमच्यासाठी हे सोपे करतो.
क्लेम म्हणजे काय?
तर तुम्ही हा शब्द सर्वत्र पाहिला असेल पण त्याचा नेमका अर्थ काय हे माहीत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या उपचाराच्या बाबतीत तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीने तुमच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च भरावा असे तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्हाला जे करावे लागेल ते म्हणजे क्लेम करणे.
नियोजित उपचार आणि हॉस्पिटलायझेशनसाठी क्लेम्सची माहिती सामान्यत: आधीच दिली जाते, तर वैद्यकीय परिस्थितीत , तुम्ही कोणत्या प्रकारच्या क्लेम्ससाठी जात आहात यावर आधारित भरपाई वेगळी असेल. डिजिटमध्ये, प्रामुख्याने दोन प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स क्लेम्स आहेत ज्यांची तुम्ही निवड करू शकता.
कॅशलेस क्लेम्स
नावाप्रमाणेच, कॅशलेस क्लेम्स म्हणजे जिथे तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या वेळी तुमच्या खिशातून पैसे देण्याची गरज नसते. "पण माझ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीने तरीही पैसे देणे अपेक्षित नाही का?" तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याचे उत्तर होय, नक्कीच असे आहे.
तथापि, रिएम्बर्समेंट क्लेम्ससाठी जाण्याचा एक पर्याय देखील आहे ज्यामध्ये तुम्ही हॉस्पिटलायझेशनच्या वेळी तुमच्या उपचारांच्या खर्चाची भरपाई कराल आणि नंतर - 20 ते 30 दिवसांच्या आत तुमच्या इन्शुरन्स कंपनीकडून बिलाची रक्कम परत मिळवा.
तथापि, जेव्हा तुम्ही कॅशलेस क्लेम्सची निवड करता तेव्हा तुम्हाला ते करण्याची आवश्यकता नाही कारण हॉस्पिटल थेट तुमच्या इन्शुरन्स कंपनीसोबत बिलांची काळजी घेईल. तुम्ही याबद्दल अधिक माहिती येथे वाचू शकता.
कॅशलेस क्लेम्स बद्दल अधिक जाणून घ्या.
रिएम्बर्समेंट क्लेम्स
वर नमूद केल्याप्रमाणे, रिएम्बर्समेंट क्लेम्स हा एक प्रकारचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम आहे ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशन दरम्यान, तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या बिलांसाठी पैसे भरता आणि नंतर डिस्चार्ज झाल्यानंतर तुमच्या हॉस्पिटलच्या बिलांची परतफेड करण्यासाठी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधता.तुमच्या इन्शुरन्स कंपनीनुसार या प्रक्रियेस 2 आठवडे ते 4 आठवडे या दरम्यान कितीही कालावधी लागेल. डिजिटमध्ये, सर्व प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे (कागदपत्राच्या उद्देशानेही!) क्लेम निकाली काढण्यासाठी लागणारा वेळ प्रत्यक्षात खूप जलद आहे!
भारतातील हेल्थ इन्शुरन्स पर्यायांचे प्रकार
फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स हा संपूर्ण कुटुंबासाठी असलेला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे!
एक स्वतंत्र, इन्डिव्ह्युजअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी फक्त तुमच्यासाठी कस्टमाइझ केली आहे!
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तयार केलेली कस्टमाइझ्ड सिनिअर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी.
तुम्ही तुमची कॉर्पोरेट योजना संपवली असेल किंवा तुमच्या खिशातून पैसे देऊ शकत नसाल तेव्हा एक सुपर टॉप-अप योजना तुमच्या बचावासाठी येते.
ग्रुप मेडिकल इन्शुरन्स अनेक लोकांसाठी खरेदी केला जाऊ शकतो जसे की कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी.
तुमचा आनंद मार्गावर असताना हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स समर्पित आहे!
रस्त्यावरील अनपेक्षित परिस्थितीत झालेल्या दुखापतींसाठी आणि पडण्याच्या घटनांसाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर!
एक स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स जो कमी किमतीत जास्त फायदे शोधणाऱ्यांसाठी चांगले काम करतो. आरोग्य संजीवनी पॉलिसी नेमके हेच आहे!
कोरोनाव्हायरसमुळे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी एक वेळची ढाल.
एक प्रकारचा कोरोनाव्हायरस हेल्थ इन्शुरन्स जो एकरकमी रक्कम ऑफर करून कोविडमुळे झालेल्या खर्चासाठी कव्हर करण्यात मदत करतो.
भारतातील हेल्थ इन्शुरन्स घेण्याची वाढती अॅक्सेसीबिलिटी आणि जागरूकता
2021 मध्ये, जेव्हा भारताची लोकसंख्या 1.39 अब्ज होती तेव्हा संपूर्ण भारतात 514 दशलक्षलोकांनी स्वताला हेल्थ इन्शुरन्स स्कीम्सनी कव्हर केले होते. यापैकी 342.91 दशलक्ष (24.67%) सरकारी प्रायोजित स्कीम्स अंतर्गत कव्हर केले होते, 118.7 दशलक्ष (8.53%) कर्मचारी हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत (राज्य ओन्ड वगळून) आणि फक्त 53.14 दशलक्ष (3.82%) पर्सनल हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत कव्हर केले गेले. [1]
तथापि, सरकार आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या विविध उपक्रमांमुळे अलिकडच्या वर्षांत परिस्थिती सुधारत आहे.
भारतातील हेल्थ इन्शुरन्ससाठी कोविड-19 साथीच्या रोगामुळे जागरूकता आणि मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. इन्शुरन्स नसलेल्या अनेक लोकांना हेल्थवर आलेल्या संकटाच्या वेळी हेल्थ इन्शुरन्स असण्याचे महत्त्व कळले आहे, ज्यामुळे पॉलिसीहोल्डर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.
भारतात कार्यरत सरकारी सेक्टर मधील इनशूरर्स कंपन्या, खाजगी इनशूरर्स आणि स्वतंत्र हेल्थ इनशूरर यांना धरून, 32 हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आहेत.
भारतातील हेल्थ इन्शुरन्सची व्याप्ती वाढवण्यासाठी, सरकार आणि भारतीय इन्शुरन्स नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने हेल्थ इन्शुरन्स ग्राहकांना अधिक अॅक्सेसेबल आणि समजण्यायोग्य बनवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
आपण हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा?
भारतात अधिकाधिक लोक हेल्थ इन्शुरन्स का निवडत आहेत ते येथे आहे.
1. कारण ते वैद्यकीय खर्चासाठी मदत करते!
हेल्थ इन्शुरन्सचा प्राथमिक फायदा असा आहे की तो दुर्दैवी अपघात किंवा आजारपणात तुमच्या हॉस्पिटलायझेशनपूर्व आणि नंतरच्या खर्चासाठी कव्हर करतो, यामध्ये कोरोनाव्हायरसच्या उपचारांच्या खर्चाचाही समावेश आहे, जी भारतातील परिस्थिती पाहता महत्वाची गरज आहे.
2. कारण ते तुमची कर बचत वाढवण्यास मदत करू शकते!
अतिरिक्त कर बचत कोणाला नको आहे, बरोबर? प्राप्तिकराच्या कलम 80 डी नुसार, जो कोणी स्वत:साठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करतो किंवा त्यांचे पालक वार्षिक प्रीमियमवर कर लाभांचा दावा करू शकतात!
3. कारण ते गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण करू शकते
लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, कर्करोग आणि हृदयविकारांसारखे अनेक गंभीर आजार आज तरुण लोकांमध्ये निदान केले जातात. हेल्थ इन्शुरन्स हे सुनिश्चित करतो की तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळेल.
4. कारण ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते!
इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा, हेल्थ इन्शुरन्स ही एक स्मार्ट गुंतवणूक आहे जी तुमच्या आरोग्यासाठी नेहमीच आर्थिकदृष्ट्या राहून तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यात मदत करत नाही तर तुम्हाला कोणतेही क्लेम बोनस यांसारख्या फायद्यांमध्ये देखील मदत करते जे दीर्घकाळासाठी फायद्याची आहे!
5. कारण ते तुम्हाला योग्य वेळी योग्य उपचार मिळण्याची खात्री देते!
कल्पना करा की काही कारणास्तव, तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्याला उपचारांची गरज आहे पण त्यासाठी पुरेसा अकाउंट बॅलन्स नाही म्हणून तुम्ही ते काही काळ थांबवले आहे अशा वेळी हेल्थ इन्शुरन्स आपले रक्षण करतो. हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे कारण ते असे होण्यापासून प्रतिबंधित करते आणि तुम्हाला तुमचे आवश्यक उपचार वेळेवर मिळतील याची खात्री देते. याव्यतिरिक्त, आरोग्य विमा योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या वार्षिक आरोग्य तपासणीसह, आपण नेहमी आपल्या आरोग्याविषयी जागरुक असाल जे अन्यथा अनेकदा दुर्लक्षित होऊ शकते.
6. कारण ते तुम्हाला मन:शांती देते!
दुर्दैवी परिस्थितीत कोणीतरी नेहमी तुमच्या पाठीशी असेल हे तुम्हाला माहीत असताना तुम्हाला कसे वाटते? तुमच्या आरोग्याच्या संदर्भातही- गरजेच्या वेळी तुमची पाठ थोपटण्यासाठी तुम्ही हेल्थ इन्शुरन्सवर विश्वास ठेवू शकता.
तुमच्या हेल्थमध्ये इन्वेस्ट करा: हेल्थ कव्हरेजचे महत्त्व दर्शविणाऱ्या विविध गोष्टी
हेल्थ इन्शुरन्स ही एक महत्त्वाची इन्वेस्टमेंट आहे जी मेडिकल आपत्कालीन केस मध्ये आर्थिक सेक्युरिटी देते. खालील गोष्टींचा विचार करा जिथे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नसते तर याबद्दल पुनर्विचार करू शकता:
1. माझा एम्प्लॉयर माझ्या हेल्थ इन्शुरन्सची काळजी घेत आहे; मला अजून एका इन्शुरन्सची गरज नाही
तुमचा एम्प्लॉयर हेल्थ इन्शुरन्स देतो हे उत्तम असले तरी ते पुरेसे नसू शकते. कर्मचार्यांच्या हेल्थ इन्शुरन्सला लिमिटेशन्स असू शकतात जसे की कमी सम इनशूअर्ड किंवा कव्हरेज जे तुमच्या गरजांसाठी पुरेसे नसू शकते.
तसेच, एम्प्लॉयरचा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या नोकरीच्या टेन्यूअरमध्येच कव्हर करतो. एकदा तुम्ही नोकऱ्या बदलल्या आणि पुढील एम्प्लॉयर कव्हरेजमध्ये ब्रेक आल्यास, त्या कालखंडात तुम्हाला कोणत्याही इन्शुरन्स कव्हरेज शिवाय राहावे लागेल.
काही कंपन्या प्रोबेशन कालखंडात हेल्थ कव्हर देत नाहीत. या कारणांमुळे, तुमच्या एम्प्लॉयरच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे पुनरावलोकन करणे आणि त्यास पूरक म्हणून इंडिवीज्वल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्ट करण्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
2. मला वाटते की वाईट दिवस आले तरी माझी 5 लाख सम इनशूअर्ड गंभीर आजारांनाही कव्हर करण्यासाठी पुरेशी आहे.
तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असू शकतो परंतु सम इनशूअर्ड कमी आहे. गंभीर आजारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत मेडिकल खर्च भागवण्यासाठी कमी सम इनशूअर्ड पुरेशी असू शकत नाही. तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे पुनरावलोकन करणे आणि तुमच्या गरजेनुसार सम इनशूअर्ड वाढविण्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
3. मी एक सरकारी कर्मचारी आहे, माझ्याकडे सरकारी स्कीम अंतर्गत संपूर्ण कव्हरेज आहे, मला अतिरिक्त पर्सनल हेल्थ कव्हरची गरज नाही
एक सरकारी कर्मचारी म्हणून, तुम्हाला काही विशिष्ट हेल्थ स्कीम अंतर्गत हेल्थ कव्हरेज मिळू शकते, तथापि, कृपया नोट करा की अशा सुविधा फक्त काही निवडक मेडिकल केंद्रांवर उपलब्ध आहेत, सामान्यत: मोठ्या मेट्रो शहरांमध्ये केंद्रित आहेत. त्यामुळे, सरकारी सुविधा अॅक्सेसेबल नसताना आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी अतिरिक्त पर्सनल हेल्थ कव्हर घेण्याची सूचना केली जाते.
4. मला फक्त बेसिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची गरज होती, म्हणून मी कमी प्रीमियम आणि लिमिटेड कव्हरेजसह एक खरेदी केली. मला वाटते की ते ठीक आहे.
तुम्ही लिमिटेड कव्हरेजसह कमी प्रीमियम हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडू शकता. हे अल्प मुदतीत पैसे वाचवू शकते, परंतु आवश्यकतेनुसार ते पुरेसे कव्हरेज देत नाही. प्रीमियम आणि कव्हरेजमध्ये संतुलन राखणे आणि तुमच्या गरजांसाठी पुरेसे कव्हरेज देणारी पॉलिसी निवडणे महत्त्वाचे आहे.
5. मी आयटी(IT ) च्या डिफ्रंट सेक्शन्स अंतर्गत पुरेसा टॅक्स वाचवला आहे आणि त्यामुळे टॅक्स वाचवण्यासाठी मला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाही.
हेल्थ इन्शुरन्स इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80D अंतर्गत अतिरिक्त टॅक्स वाचवू शकतो, परंतु ते केवळ टॅक्स-सेविंगचे साधन म्हणून पाहिले जाऊ नये. हेल्थ इन्शुरन्सचे प्राथमिक कार्य म्हणजे मेडिकल आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सेक्युरिटी आणि मानसिक शांती प्रदान करणे.
6. मी तरुण, तंदुरुस्त आणि उत्तम आहे. मला हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची गरज नाही
तुम्ही आता तरुण आणि निरोगी असाल तरीही, मेडिकल आपत्कालीन परिस्थिती अनपेक्षितपणे येऊ शकते. हेल्थ इन्शुरन्स असल्याने आर्थिक सेक्युरिटी मिळू शकते आणि तुम्हाला मेडिकल उपचार आणि हॉस्पिटलायझेशनचे कॉस्ट कव्हर करण्यास मदत होते. तसेच, तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्वेस्ट केल्याने तुम्हाला कमी प्रीमियम सेक्युअर करण्यात आणि काही वेळेनंतर क्युम्युलेटीव्ह बोनस जमा करण्यात मदत होऊ शकते.
हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी योग्य वय
हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी योग्य वय आणि वेळ आता आहे!
मुळात, तुम्ही कमाई सुरू करताच तुम्ही स्वत:चा हेल्थ इन्शुरन्स घ्यावा.
लहान वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणे ही एक स्मार्ट आर्थिक कार्य आहे. आपण लहान वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्ट करण्याचा विचार का करावा अशी काही कारणे येथे आहेत:
1. कमी प्रीमियम
लहान वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा एक मुख्य फायदा म्हणजे प्रीमियम लक्षणीयरीत्या कमी असतो. कारण तरुण व्यक्तींना कमी जोखमीचे मानले जाते आणि त्यांची क्लेम्स करण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे, 1 कोटी हेल्थ कव्हरचा माझा प्रीमियम कदाचित जास्त वाटेल पण तरीही उच्च वयोगटांच्या तुलनेत तो खूपच कमी असेल.
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लवकर इन्वेस्ट करून, तुम्ही कमी प्रीमियम मिळवू शकता आणि दीर्घकाळासाठी पैसे वाचवू शकता.
2. प्रतीक्षा कालखंड नाही
बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रतीक्षा कालखंडासह येतात, ज्या दरम्यान तुम्ही कोणतेही क्लेम्स करू शकत नाही. लहान वयातच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्टमेंट करून, तुम्ही तुमच्या सुदृड तब्येतीच्या दिवसांमध्ये प्रतीक्षा कालखंड पूर्ण करू शकता आणि जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा कव्हर मिळू शकते.
3. प्री-मेडिकल चाचण्या नाहीत
लहान वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्ट करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला प्री-मेडिकल चाचण्यांची रीक्वायरमेंट कमी असते. बर्याच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींना विशिष्ट वयापेक्षा जास्त व्यक्तींसाठी किंवा पूर्व-विद्यमान मेडिकल परिस्थिती असलेल्या पूर्व-मेडिकल चाचण्या आवश्यक असतात. लहान वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्टमेंट करून, तुम्ही मेडिकल पूर्व चाचण्या वगळू शकता आणि कोणतीही गुंतागुंत टाळू शकता.
4. क्युम्युलेटीव्ह बोनस जमा होण्याची अधिक शक्यता
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी क्युम्युलेटीव्ह बोनससह येतात, जी प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी तुमच्या सम इनशूअर्ड मध्ये जोडलेली रक्कम असते. तुम्ही लहान असताना, तुमची आजारी पडण्याची शक्यता कमी असते आणि त्याच प्रमाणे क्लेम फारसे नसतात किंवा बिलकुल नसतात. त्यामुळे, क्युम्युलेटीव्ह बोनस जमा होण्याची संभावना जास्त असते.
मी ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स का खरेदी करावा?
हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे ही एक जलद प्रोसेस आहे आणि ती काही मिनिटांत पूर्ण करता येते.
डिजिटल फ्रेंडली प्रोसेसमुळे, हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे म्हणजे फॉर्म भरणे किंवा एजंटला भेट देणे या तुलनेत ते शून्य स्पर्श आणि संपर्करहित आहे.
सगळी माहिती तुम्हाला चटकन मिळते आणि आरामात तुमच्या होम मधून हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचे सहज मूल्यांकन करू शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता.
हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी केल्याने तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमवर पैसे वाचू शकतात कारण त्यात कोणतेही मध्यस्थ सहभागी नसतात.
बर्याच इनशूरर्स वेलनेस सेवा देखील प्रदान करतात ज्यात तुम्ही त्यांच्या मोबाईल अॅपवर अॅक्सेस करू शकता. यामध्ये होम हेल्थकेअर, दूरध्वनीवरून सल्लामसलत, योग आणि माइंडफुलनेस आणि अनेक सूट, सेवा आणि ऑफर यासारखे विशेष फायदे.
इन्कम टॅक्सच्या 80D अंतर्गत हेल्थ इन्शुरन्सद्वारे टॅक्स वाचवा
हेल्थ इन्शुरन्स खरेदी केल्याने तुम्हाला फक्त वाढत्या मेडिकल कॉस्ट्सपासून सुटका होत नाही तर टॅक्स फायदे देखील ऑफर करतो. हेल्थ इन्शुरन्सद्वारे तुम्ही टॅक्स वाचवू शकता असे काही मार्ग येथे आहेत:
इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 80D अंतर्गत, तुम्ही तुमच्या तत्काळ अवलंबितांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर ₹25,000 पर्यंतच्या टॅक्स डीडक्शन्सचा फायदा घेऊ शकता आणि त्यांना कव्हर करते. तुम्ही सीनियर सिटीजन असल्यास, ही मर्यादा ₹50,000 पर्यंत जाते. चांगल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्वेस्टमेंट करून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता.
तुम्ही तुमच्या पालकांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम देखील करू शकता. तुमचे पालक सीनियर सिटीजन असल्यास, तुम्ही ₹50,000 पर्यंतच्या टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता आणि त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास, तुम्ही त्यांच्या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर ₹25000/- पर्यंतच्या डीडक्शनचा क्लेम करू शकता. हे तुम्हाला टॅक्स डीडक्शन्समध्ये लक्षणीय पैसे वाचविण्यात मदत करू शकते.
सेक्शन 80D अंतर्गत, तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी आणि आश्रित पालकांसाठी प्रतिबंधात्मक हेल्थ तपासणीच्या खर्चासाठी ₹ 5,000 पर्यंतच्या टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही केवळ नियमित तपासणी करून निरोगी राहत नाही तर त्याच वेळी टॅक्स पण वाचवू शकता.
हेल्थ इन्शुरन्स संदर्भात कायम वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ
तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे कोणतेही फायदे वापरणे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल.
कोपेमेंट म्हणजे तुम्ही आणि तुमची इन्शुरन्स कंपनी बिले विभाजित करणार आहात, म्हणजे तुमचा विमाकर्ता बिलाचा मोठा वाटा भरेल, परंतु त्यातील काही भाग तुम्हाला भरावा लागेल.
तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मिळवण्याआधी तुम्हाला ज्या आजाराची किंवा आरोग्य स्थितीची लक्षणे आधीपासून आढळून आली आहेत किंवा त्यावर उपचार केले गेले आहेत, तो पूर्व अस्तित्वात असलेला आजार मानला जातो.
जेव्हा एखाद्याला उपचार किंवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते, परंतु केवळ 24-तासांपेक्षा कमी. या उपचारांना डेकेअर प्रक्रिया म्हणून संबोधले जाते.
वैद्यकीय बिले तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या वेळी तुमच्या मुक्कामासाठी भरावे लागतील त्यापलीकडे जातात. हॉस्पिटलायझेशनपूर्वी झालेल्या वैद्यकीय खर्चाला हॉस्पिटलायझेशनपूर्व खर्च म्हणतात. उदाहरणार्थ - निदान चाचण्यांमुळे होणारा खर्च.
जेव्हा तुम्ही वर्षभरात हेल्थ इन्शुरन्सचे कोणतेही क्लेम करत नाही, तेव्हा तुमची विमा कंपनी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त प्रीमियम न आकारता तुमची विम्याची रक्कम वाढवेल. तुमच्या विम्याच्या रकमेतील या वाढीला संचयी बोनस म्हणतात.
काही हेल्थ इन्शुरन्स प्लॅन तुमच्यासाठी कव्हर करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. या रकमेला डिडक्टिबल्स म्हणतात. तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना ही रक्कम सहसा तुम्ही ठरवलेली असते.
तुमची हेल्थ इन्शुरन्स कंपनी एका वर्षात तुमच्यासाठी कव्हर करू शकणारी ही कमाल रक्कम आहे.
जेव्हा तुम्ही तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीबद्दल खूप खूश नसाल आणि प्रतीक्षा कालावधी गमावल्याशिवाय स्विच करू इच्छित असाल. या प्रक्रियेला हेल्थ इन्शुरन्समध्ये पोर्टेबिलिटी म्हणतात.
हेल्थ इन्शुरन्सशी संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ
हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
- तुमच्या प्रीमियमवर बचत करण्यासाठी कमी विमा रक्कम निवडू नका. तुमचे वय, तुमच्या आरोग्यसेवा गरजा आणि तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुम्ही कव्हर करत असलेल्या लोकांच्या संख्येनुसार नेहमी योग्य विम्याची रक्कम निवडा.
- तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय समाविष्ट आहे आणि काय समाविष्ट नाही हे नेहमी तपासा आणि अटी व नियम वाचा जेणेकरून तुम्हाला नंतर धक्का बसणार नाही! आम्ही समजतो की हे सर्व वाचणे कंटाळवाणे वाटू शकते, म्हणूनच डिजिटवर आम्ही लहान सारांश आणि सोपे धोरण दस्तऐवज तयार केले आहेत जेणेकरून ही प्रक्रिया तुमच्यासाठी सोपी होईल!
- तुमच्याकडे तुमचा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कस्टमाइझ करण्याचा पर्याय असल्यास, नेहमी ते करा. उदाहरणार्थ: चांगल्या कव्हरेजसाठी तुम्ही तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वेगवेगळ्या ॲड-ऑनसह कस्टमाइझ करू शकता.
- हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी जास्त वेळ थांबू नका. आयुष्याच्या सुरुवातीस हेल्थ इन्शुरन्स खरेदी करा, अशा प्रकारे तुमच्याकडे अधिक वाजवी प्रीमियम असेल आणि तुम्ही प्रतीक्षा कालावधी जलद गतीने पार करत आहात हे देखील सुनिश्चित करा!
- हेल्थ इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा आर्थिक निर्णय आहे त्यामुळे तुम्ही पाहत असलेल्या पहिल्या पर्यायावर जाण्यापूर्वी नेहमी तुमच्या सर्व पर्यायांचे ऑनलाइन मूल्यमापन करा!
हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी टिप्स
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्याचा एक फायदा म्हणजे, तुम्हाला तुमचे संशोधन करण्याची आणि हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सची ऑनलाइन तुलना करण्याची संधी मिळते. तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुलना करावी अशा घटकांची यादी येथे आहे:
कव्हरेज तपशील: हेल्थ इन्शुरन्सचा मुळ मुद्दा म्हणजे आरोग्यसेवा खर्चावर जास्तीत जास्त कव्हरेज मिळवणे. म्हणून, नेहमी तुम्हाला मिळणार्या कव्हरेजची तुलना करा आणि विम्याच्या रकमेची तुलना करा. शेवटी, तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला किती कव्हर करेल यावर ते अवलंबून असेल.
सेवा लाभ : वेगवेगळे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स मूलभूत कव्हरेज ऑफर करत असताना, काही प्लॅन्स अतिरिक्त लाभांद्वारे तुमची अधिक चांगली काळजी घेण्याचा मार्ग निवडतील. म्हणून, विविध हेल्थ इन्शुरन्स कंपनीद्वारे ऑफर केलेल्या सेवा लाभांची तुलना करा आणि तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे ते पाहा.
हॉस्पिटल्सचे नेटवर्क: प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे हॉस्पिटलचे नेटवर्क असते ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता आणि गरजेच्या वेळी कॅशलेस क्लेम मिळवू शकता. तथापि, या लाभाचा लाभ घेण्यासाठी - हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या विमा प्रदात्याशी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांच्या श्रेणीची तुलना करा आणि तुमच्यासाठी सर्वात योग्य असलेल्या हॉस्पिटलमध्ये जा.
क्लेम्सचा प्रकार: हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये सामान्यतः दोन प्रकारचे क्लेम्स असतात; कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट. गरजेच्या वेळी, कॅशलेस क्लेम्स खूप सोपे आणि फायदेशीर ठरतात. म्हणून, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला कॅशलेस क्लेमचा लाभ देतात की नाही आणि किती प्रमाणात देतात ते पाहण्यासाठी त्यांची तुलना करा.
हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम: हे साहजिक आहे नाही का? हे असे काहीतरी आहे जे तुम्ही कदाचित कराल. तथापि, तुमचा प्रीमियम तुम्ही निवडलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनशी संबंधित असल्याची खात्री करा. स्वस्त प्रीमियम्सचे आमिष पाहून भूलू नका, परंतु प्रीमियमशी कव्हरेज तपशीलांची नेहमी तुलना करा आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्या.
तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक
हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम वेगळे का आहे याबद्दल आश्चर्य वाटत आहे ? विविध घटकांवर आधारित, तुमचा आरोग्य विमा प्रीमियम खालीलप्रमाणे परिभाषित केला जातो:
वय - तरुण आणि वृद्ध दोघांसाठी आरोग्य स्थिती वाढत असताना, मजबूत रोगप्रतिकारक प्रणालीमुळे तरुण लोक अजूनही खूप निरोगी आहेत. याव्यतिरिक्त, तुम्ही जितके लहान असाल, विशिष्ट आजार आणि कव्हरसाठी तुमचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल. म्हणून, तुम्ही जितके लहान आहात तितका तुमचा प्रीमियम कमी आहे!
जीवनशैली - भारतातील 61% पेक्षा जास्त मृत्यू हे प्रदूषण पातळीसह जीवनशैलीतील आजारांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे होतात! त्यामुळे, तुमच्या जीवनशैलीच्या सवयी जसे की तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा नसाल तर तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर परिणाम होईल.
आधीपासून अस्तित्वात असलेले रोग किंवा परिस्थिती - जर तुम्हाला आधीच काही प्रकारच्या लक्षणांचा सामना करावा लागत असेल, किंवा एखाद्या विशिष्ट आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल, तर तुमच्या आरोग्य विम्याचा प्रीमियम कदाचित जास्त असू शकतो.
स्थान - तुम्ही राहता त्या शहरावर तुमचा प्रीमियम प्रभावित होईल कारण प्रत्येक शहर जोखीम आणि वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत वेगळे आहे. उदाहरणार्थ, प्रदूषणाच्या उच्च टक्केवारीमुळे उत्तर भारतात राहणार्या लोकांना फुफ्फुसाचे आजार होण्याची अधिक शक्यता असते.
अतिरिक्त कव्हर्स - कोणीही त्यांच्या वैयक्तिक गरजा आणि आरोग्य परिस्थितीच्या आधारावर त्यांची हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कस्टमाइझ करू शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही मॅटर्निटी बेनिफिट किंवा आयुष लाभासारख्या अतिरिक्त कव्हरची निवड करता, तेव्हा तुमचा प्रीमियम देखील थोड्या फरकाने वाढतो.
योग्य सम इन्शुअर्ड ( विम्याची रक्कम) कशी निवडावी?
- जीवनाचा टप्पा: जेव्हा जीवनाचा टप्पा बदलतो, तेव्हा तुम्हाला जास्त विम्याची आवश्यकता असू शकते. तुम्ही लग्न करणार असाल किंवा बाळाचा प्लॅन करत असाल तेव्हा हेल्थ इन्शुरन्स फायद्याचा ठरतो.
- अवलंबितांची संख्या: हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांचा इन्शुरन्स काढणे हा उच्च वैद्यकीय खर्चाशी संबंधित भविष्यातील आर्थिक जोखमींपासून तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याचा एक सूज्ञपणाचा मार्ग आहे.
- आरोग्य परिस्थिती: कुटुंबात आनुवंशिक आजार असल्यास किंवा शहरात राहणाऱ्या व्यक्तीची सामान्य आरोग्य स्थिती वाढत असल्यास, तुम्ही जास्त विम्याचा विचार केला पाहिजे.
- जीवनशैली: जर तुम्ही प्रदूषित शहरांमध्ये राहत असाल, ट्रॅफिकमध्ये कष्ट करत असाल आणि दररोज ऑफिसचा ताण सहन करत असाल तर तुम्हाला आजारी पडण्याचा धोका जास्त असू शकतो. ज्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला स्वतःला चांगले कव्हर करणे आवश्यक आहे.
हेल्थ इन्शुरन्स खरेदीसाठी टिप्स
तरुणांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदीसाठी टिप्स
- आयुष्यात लवकर इन्शुरन्स घ्या.
- जास्त विम्याच्या (5-10 लाख) रकमेची निवड करा. कारण ते अपघाती हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत तुमच्याकडे असलेली रक्कम वाढवते.
- तुमच्याकडे क्रिटिकल इलनेस कव्हर समाविष्ट असल्याची खात्री करा.
- जर तुम्ही भविष्यात कुटुंब प्लॅन करणार असाल, तर मॅटर्निटी बेनिफिट निवडा जेणेकरून तुमचा प्रतीक्षा कालावधी वेळेत संपेल.
कुटुंबांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदीच्या टिप्स
कुटुंबातील सर्व सदस्यांचा इन्शुरन्स काढा.
जास्त विम्याच्या रकमेसाठी जा कारण ते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वितरीत केले जाते, तुम्ही प्रति व्यक्ती 10 लाख ठेवू शकता आणि विम्याची रक्कम मोजू शकता.
तुमच्याकडे फ्लोटर प्लॅन असल्यास, रिस्टोरेशन बेनिफिटसह योजनेसाठी जा
ऑफर केल्या जात असलेल्या सर्व फायद्यांसाठी प्रतीक्षा कालावधी तपासा.
तुम्ही तुमच्या पालकांचा विमा उतरवण्याची योजना करत असल्यास, त्यात गुडघा बदलणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासारखे सामान्य उपचार आहेत का ते तपासा.
ज्येष्ठांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदीच्या टिप्स
वयानुसार इन्शुरन्सचा हप्ता वाढत जातो. त्यामुळे, तुमच्याकडे आधीच योजना असल्यास, तुम्ही टॉप-अप प्लॅनसह त्याची इन्शरन्सची रक्कम वाढवू शकता.
तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कोणत्या प्रकारचे हॉस्पिटल टाय-अप आणि सेवा टाय-अप देत आहे ते तुम्ही तपासत असल्याची खात्री करा.
तुम्हाला मिळत असलेल्या योजनेत गुडघा बदलणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासारखे सामान्य उपचार आहेत का ते तपासा.
ऑफर केल्या जात असलेल्या फायद्यांच्या उप-मर्यादा तपासा.
आधीपासून अस्तित्वात असलेल्या विविध रोगांसाठी नमूद केलेला प्रतीक्षा कालावधी तपासा.
कोणता मेडिकल इन्शुरन्स प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे
तुम्ही तुमच्या विशी तिशीतील, निरोगी तरुण आहात, कमावता आहात आणि तुमच्यावर थोड्याबहुत आर्थिक रेसपॉन्सीबिलिटीझ आहेत
या परिस्थितीत, तुम्ही कमी प्रीमियमसह बेसिक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा विचार केला पाहिजे. या टप्प्यावर तुम्हाला विस्तृत कव्हरेज किंवा उच्च सम इनशूअर्डची गरज नसू शकते, परंतु कोणत्याही अनपेक्षित मेडिकल आणीबाणीच्या केस मध्ये आपण सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही उच्च डीडक्टीबल असलेल्या प्लॅनची देखील निवड करू शकता, ज्यामुळे तुमचा प्रीमियम आणखी कमी होईल.
तुमच्याकडे आधीच कॉर्पोरेट हेल्थ कव्हर आहे आणि तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सवर जास्त खर्च करण्याची इच्छा नाही
तुमच्याकडे आधीच कॉर्पोरेट हेल्थ कव्हर असल्यास, तुम्हाला व्यापक इंडिवीज्वल हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची गरज भासणार नाही. समजा तुम्ही तुमची नोकरी गमावली किंवा नोकरी चेंज केली तर आशा केसमध्ये बॅकअप प्लॅन असणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये नसलेल्या बेसिक तसेच इतर चांगल्या फायद्यांसह तुम्ही हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची निवड करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ते कव्हरेज मिळवून देते.
तुमचे कुटुंब आहे आणि तुम्हाला जोडीदार + लहान मुले कव्हर करायची आहेत
या परिस्थितीत, तुम्ही फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा विचार केला पाहिजे ज्यामध्ये तुमचा जोडीदार आणि मुलांचा समावेश आहे. फॅमिली फ्लोटर प्लॅन्स किफायतशीर आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज देतात. तुम्ही येणाऱ्या काही दिवसात बाळासाठी प्रयत्न करणार असाल तर तुम्ही मॅटरनिटी फायद्यांसाह प्लॅन देखील निवडू शकता.
तुम्ही तुमच्या पालकांना सुरक्षित करण्याचा विचार करत आहात
तुम्ही तुमच्या पालकांची हेल्थ सेक्युअर करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सीनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्सचा विचार करावा. सीनियर सिटीजन प्लॅन वृद्ध लोकसंख्येसाठी विशिष्ट असलेल्या मेडिकल एक्सपेन्ससेससाठी कव्हरेज प्रदान करतात, जसे की वय वाढल्यामुळे झालेले आजार आणि काही जुनाट तब्येतीची स्थिति. काही सीनियर सिटीजन प्लॅन देखील डोमीसीलरी उपचार, आयुष फायदा इत्यादी फायदे देतात.
माझ्या कुटुंबाला क्रिटीकल इलनेसचा इतिहास आहे, मला कोणतेही अतिरिक्त हेल्थ कव्हर खरेदी करण्याची आवश्यकता आहे का?
तुमच्या कुटुंबाला क्रिटीकल इलनेसचा इतिहास असल्यास, तुम्ही क्रिटीकल इलनेस हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा विचार करावा. क्रिटीकल इलनेस प्लॅन कर्करोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांसाठी संरक्षण प्रदान करतात.
हेल्थ इन्शुरन्सबद्दल लोकप्रिय समज/गैरसमज
फक्त गंभीर आजारसाठी हेल्थ इन्शुरन्स कव्हर करते: अनेक लोकांच्या समजुतीत आहे की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी केवळ गंभीर आजारांसाठी कव्हर करतात. तथापि, ते खरे नाही! हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीत नियमित आजार, अपघात, मानसोपचार सहाय्य, प्रसूती आणि मूलभूत वार्षिक आरोग्य तपासणी यांचा समावेश होतो!
"मला हेल्थ इन्शुरन्सची गरज नाही, कारण मी तरुण असल्यामुळे मला जास्त आजारपण नाही": लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, तुमचे वय कितीही असले तरीही- तुम्हाला लहान आणि मोठे दोन्ही आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः, आज आपण ज्या काळात राहतो त्या काळात- आपल्या हवामानातील बदलामुळे प्रेरित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अधिकाधिक तरुणांना पीसीओएस, कर्करोग आणि फुफ्फुसाचे आजार यांसारख्या आरोग्यविषयक परिस्थितींचे निदान होत आहे.
हेल्थ इन्शुरन्स प्रोसेस वेळखाऊ आहे: हे प्रामाणिकपणे तुमच्याकडे असलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रकारावर आणि तुमच्या विमा प्रदात्यावर अवलंबून असते! तंत्रज्ञानामुळे, सर्वोत्कृष्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आता खूप जलद आणि त्रासमुक्त आहेत!
तुमच्याकडे बचत असल्यास, हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा नाही: आपण कधीकधी खूप आशावादी असतो, नाही का? आपली बचत गरजेच्या वेळी आपल्याला मदत करू शकते, परंतु त्याची मर्यादा कधीच सांगता येत नाही. दुसरीकडे सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा ही एक समर्पित गुंतवणूक आहे जी तुम्ही पूर्णपणे तुमच्या आरोग्यासाठी करता त्यामुळे तुम्हाला तुमची बचत खर्च करण्याची किंवा भविष्यात कोणत्याही आर्थिक दबावाचा सामना करण्याची गरज नाही!
भारतात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
डिजिटच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये काय युनिक आहे?
ऑनलाइन आणि डिजिटल फ्रेंडली असण्याव्यतिरिक्त; डिजिटची हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कस्टमायझेशन, रूम भाड्यावर कोणतेही बंधन नाही, एसआय वॉलेट फायदे, झोनवर आधारित को पे नाही, अंगभूत वैयक्तिक अपघात कव्हर, मानसोपचार सहाय्य समाविष्ट आणि बरेच काही यांसारखे युनिक फायदे देते जे दोन्ही इन्शुअर्ड आणि त्याच्या कुटुंबाला दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित मिळवून देते.
लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यात काय डीफ्रंस आहे?
लाईफ इन्शुरन्स ही एक दीर्घ मुदतीची पॉलिसी आहे जी मृत्यूनंतर इनशूअर्ड व्यक्तीच्या कुटुंबाला हक्काची रक्कम देण्यास मदत करते. तर हेल्थ इन्शुरन्स हा इनशूअर्डच्या आरोग्यसेवा आणि मेडिकल एक्सपेन्ससेससाठी पे करण्यासाठी असतो, जो आजार, रोग आणि अपघातांमुळे होऊ शकतो.
माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पॅन भारतात वैध असेल का?
होय, डिजिटची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पॅन भारतासाठी वैध आहे.
डोनर एक्सपेनसेस म्हणजे काय?
अवयव प्रत्यारोपणादरम्यान डोनरकडून हॉस्पिटलायझेशनचे सर्व एक्सपेन्ससेस डोनरच्या एक्सपेन्स अंतर्गत समाविष्ट केला जातो.
माझ्या एम्प्लॉयरने कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स घेतला असला तरीही मी वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स खरेदी करावा का?
होय. तुमच्या एम्प्लॉयरने ऑफर केलेल्या नियमित कॉर्पोरेट प्लॅनच्या व्यतिरिक्त वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेणे नेहमीच उचित आहे जेणेकरून नोकरी बदलणे किंवा नोकरी गमावणे यासारख्या परिस्थितीत तुम्ही तुमचे हेल्थ कव्हर गमावत नाही.
इन्शुरन्स पॉलिसीचे घटक कोणते आहेत?
प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीचे पाच भाग असतात: घोषणा, इनशूरिंग करार, व्याख्या, एक्सक्लूजन्स आणि स्थिति. अनेक पॉलिसीझमध्ये सहावा भाग असतो: एंडॉर्समेंट. हे सेक्शन्स पॉलिसीझचे पुनरावलोकन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून वापरले जाऊ शकतात. मुख्य तरतुदी आणि रीक्वायरमेंट्स ओळखण्यासाठी प्रत्येक भागाचे परीक्षण करा.
झोन आधारित सूटचा फायदा घेण्यासाठी मला कोणत्याही क्षणी माझे निवासी झोन सिद्ध करावे लागेल का?
नाही, तुमच्या प्रीमियममध्ये झोन आधारित सूट मिळवण्यासाठी तुम्हाला कोणताही पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही. तथापि, क्लेम्सच्या वेळी, तुम्ही आम्हाला झोन B मध्ये असल्याची पुष्टी करणारा पत्ता पुरावा द्यावा लागेल आणि त्यानंतर कोणतेही कोपेमेंट आकारले जाणार नाही. तथापि, आपण आवश्यक पुरावा सादर करण्यात अयशस्वी झाल्यास, आशा केस मध्ये आपल्याला 10% को-पेमेंट पे करावे लागेल.
भारतात हेल्थ इन्शुरन्सवर टॅक्स मध्ये काय फायदे मिळतात?
तुमच्यासाठी आणि तुमच्या आश्रित कुटुंबासाठी, तुम्ही भरलेल्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर ₹25000/- पर्यंत टॅक्स डीडक्शन्सचा क्लेम करू शकता. कुटुंबातील कोणताही सदस्य 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, डीडक्शनची हे लिमिट ₹50000/- पर्यंत आहे.
तसेच, तुमच्या पालकांसाठी, तुम्ही 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यास किंवा ते सीनियर सिटीजन असल्यास ₹50000/- अतिरिक्त ₹25000/- डीडक्शन घेऊ शकता.
क्लेम करताना मला कोणते दस्तऐवज रिक्वायर आहेत?
हे प्रामुख्याने तुम्ही कुठल्या प्रकारचा क्लेम करता त्यावर अवलंबून असेल. कॅशलेस क्लेमच्या केस मध्ये, तुम्हाला फक्त हॉस्पिटलमध्ये टीपी ने दिलेला रिक्वायर्ड फॉर्म भरणे आवश्यक आहे; तर रिएमबर्समेंटच्या केस मध्ये- तुम्हाला तुमचे इंव्हॉईस अपलोड/सबमिट करणे रीक्वायर्ड असेल उदा. बिले, उपचार दस्तऐवज इ.
मी नेटवर्क नसलेल्या हॉस्पिटल मध्ये दाखल होऊ शकतो का?
होय, आपण हे करू शकता. तथापि, या केस मध्ये- तुम्हाला रिएमबर्समेंटसाठी क्लेम करावा लागेल कारण कॅशलेस क्लेम्स फक्त आमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
आणीबाणीच्या वेळी हॉस्पिटलायझेशनसाठी मी कोणाला कॉल करावा?
दिवस असो की रात्र कुठलीही वेळ असो आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत. आम्हाला फक्त 1800-258-4242 वर एक रिंग द्या आणि आम्ही बाकीचे सगळे व्यवस्थित करू.
कोणताही हेल्थ इन्शुरन्स क्लेम फेटाळला किंवा नाकारला जाऊ शकतो का?
होय, हेल्थ इन्शुरन्स क्लेम तुमच्या पॉलिसीच्या अटी व शर्तींचे पालन करत नसल्यास तो फेटाळला जाऊ शकतो. उदाहरणार्थ: प्रतीक्षा कालखंड पूर्ण करण्यापूर्वी तुम्ही आधीच अस्तित्वात असलेल्या रोगा-संबंधित उपचारांसाठी क्लेम केल्यास, तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
मी डे वन पासून माझी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वापरण्यास सुरुवात करू शकतो का?
नाही, 30 दिवसांचा प्रारंभिक प्रतीक्षा कालखंड आहे. तथापि, कोणत्याही अपघाती हॉस्पिटलायझेशन संबंधित क्लेम्सच्या केस मध्ये, प्रारंभिक प्रतीक्षा कालखंड नाहीये आणि तुमची पॉलिसी खरेदी केल्यानंतर कुठल्याही वेळी वापरली जाऊ शकते.
हॉस्पिटलायझेशन 24 तासांपेक्षा कमी असल्यास मी क्लेम करू शकतो का?
होय, जर ही डे-केअर प्रक्रिया किंवा ओपीडी असेल तर तुम्ही करू शकता - जर तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये ओपीडी कव्हरची निवड केली असेल.
इन्शुरन्स कंपनीने क्लेमच्या पूर्ततेसाठी आयआरडीएआय(IRDAI) ने निर्दिष्ट केलेली वेळेच्या लिमिट काय आहे?
आयआरडीएआय नियमन नुसार, . कोणतीही कंपनी शेवटचा आवश्यक दस्तऐवज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत क्लेम सेटल करेल काढेल किंवा नाकारेल.
- क्लेमच्या पेमेंटच्या केस मध्ये विलंब झाल्यास, कंपनी पॉलिसीहोल्डरला अंतिम आवश्यक दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून क्लेमच्या पेमेंटच्या तारखेपर्यंत बँक रेटपेक्षा 2% जास्त रेटने इंटरेस्ट पे करण्यास जबाबदार असेल.
- तथापि, जेथे क्लेमची परिस्थिती कंपनीच्या मतानुसार तपासणीची किंवा सखोल चौकशीची गरज असेल, तेथे ती अशा प्रकारची चौकशी लवकरात लवकर सुरू करेल आणि पूर्ण करेल, पण हे कोणत्याही परिस्थितीत शेवटचे आवश्यक दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त उशिरा नसेल. अशा केसेस मध्ये, कंपनी शेवटचा आवश्यक दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत क्लेम सेटल करेल किंवा नाकारेल.
- निर्धारित 45 दिवसांपेक्षा जास्त विलंब झालेल्या केस मध्ये, अंतिम आवश्यक दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून क्लेम पेमेंटच्या तारखेपर्यंत पॉलिसीहोल्डरला बँक रेटपेक्षा 2% जास्त रेटने इंटरेस्ट पे करण्यास जबाबदार असेल.
'बँक रेट' चे मीनिंग आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निश्चित केलेला रेट आर्थिक वर्षाच्या सुरवातीला ज्या वर्षात क्लेम डयू होतो.
हेल्थ इन्शुरन्सचे क्लेम्स फाइलिंगच्या वेळेचे लिमिट किती आहे?
हे लिमिट डिफ्रंट इन्शुरन्स प्रदात्यांसाठी वेगळे असते. डिजिटवर, डिस्चार्ज झाल्यापासून 7 दिवसांच्या आत आम्हाला सूचित केले जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर डिस्चार्ज झाल्यापासून 30 दिवसांच्या आत क्लेम्स फाइल करणे आवश्यक आहे.
मी हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम वर्षातून अनेक वेळा करू शकतो का?
तुमच्या हेल्थ इन्शुरन्सवर तुम्ही किती क्लेम्स करू शकता यावर कोणतेही लिमिट नाही. तथापि, एकूण क्लेम्सचे मूल्य तुमच्या एकूण सम इनशूअर्ड मध्ये बसले पाहिजे.
जर आम्ही क्लेम केला नाही तर आम्हाला हेल्थ इन्शुरन्स मधील पैसे परत मिळतात का?
नाही. हेल्थ इन्शुरन्ससाठी भरलेला प्रीमियम तुमच्या मान्य मुदतीसाठी तुमच्या मेडिकल जोखीम कव्हर करतो. म्हणून, ते रिफंड केले जात नाही.
जेव्हा मी हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम करतो तेव्हा माझ्या सम इनशूअर्डचे काय होते?
जेव्हा तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम करता, तेव्हा सम इनशूअर्ड क्लेमच्या रकमे इतका कमी होते. तसेच, तुमचा क्युम्युलेटीव्ह बोनस रद्द होतो.
कोणत्या वयात हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणे सर्वोत्तम आहे?
उत्तर साधे आहे. तुम्ही जितके लहान आहात, तितका तुमचा प्रारंभिक आणि त्यानंतरचा प्रीमियम कमी असेल. तसेच, तुम्ही लहान असल्यास, तुम्ही विविध कव्हर वैध होण्यासाठी प्रतीक्षा कालखंड सहज पार कराल. तरुण आर्थिकदृष्ट्या सेक्युअर नसतात आणि हॉस्पिटलायझेशन आणि इतर मेडिकल एक्सपेन्ससेस भागवणे कठीण होऊ शकते.
म्हणून, आयुष्यात हेल्थ इन्शुरन्स लवकर घेणे फायदेशीर आहे. म्हणजेच तुम्ही कमावणे सुरू केले की लागलीच हेल्थ इन्शुरन्स घ्या.
मी एकापेक्षा जास्त हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतो का?
होय, तुम्ही एकापेक्षा जास्त हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता!
एनआरआय(NRI) भारतात हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतो का?
होय, एनआरआय भारतात हेल्थ इन्शुरन्स खरेदी करू शकतो. कव्हरेजचा उपयोग भारतातील उपचारांसाठी केला जाऊ शकतो. तथापि, अटी आणि शर्ती तुमच्या इन्शुरन्स प्रदात्यावर अवलंबून असतात.
माझ्याकडे सध्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असेल आणि मला त्याची कव्हरेज वाढवायचे असेल तर?
आपण कव्हरेज निश्चितपणे वाढवू शकता, परंतु ते वर्षाच्या आधेमध्ये केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते फक्त रिनिव करताना करू शकता, जे तुमच्या इन्शुरन्स प्रदात्यावर देखील अवलंबून असते.
मला नुकतेच मधुमेह झाल्याचे निदान झाले आहे. मी गेल्या महिन्यात हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला होता. मला यासाठी मेडिकल कव्हरेजची परवानगी दिली जाईल का?.
आयआरडीएआय अनुसार, एखादा जुना आजार म्हणजेच ठराविक शारीरिक स्थिती, आजार, दुखापत किंवा रोग, ज्याचे निदान तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या 48 महीने आधीच झालेले असते. अशा परिस्थितीमध्ये डायबेटीस सारखे रोग जुन्या आजारांमध्येच गणला जातो आणि त्यामुळे हा रोग जुन्या आजारांसंबंधी तुमच्या इन्शुरन्स प्रोव्हायडरच्या नियमांप्रमाणे कव्हर केला जाईल.
हेल्थ इन्शुरन्स खरेदी केल्याच्या पहिल्या दिवसापासून माझे हेल्थ कव्हरेज सुरू होईल का?
नाही. बहुतेक हेल्थ इन्शुरन्स पॉलिस्या तुमची पॉलिसी तुम्हाला कव्हर करण्यास सुरुवात करण्यापूर्वी प्रारंभिक प्रतीक्षा कालखंडासह येतात. जो सहसा 30 दिवसांचे असतो. पुढे, आधीपासून अस्तित्वात असलेल्या आणि विशिष्ट आजारांसाठी प्रतीक्षा कालखंड आहे जो तुमचे कव्हरेज सुरू होण्यापूर्वी पूर्ण केला पाहिजे.
मी रिनिवल प्रीमियम वेळेवर भरणे चुकल्यास काय होईल?
अरेरे! तुमचा रिनिवल प्रीमियम वेळेवर पे करण्यास चुकल्यास, ग्रेस कालखंड संपल्यानंतरही, तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एक्सपायर होईल आणि तुम्हाला पुन्हा नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याची प्रोसेस सुरू करावी लागेल! याचे मीनिंग असे आहे की तुम्ही तुमचे सर्व जमा केलेले फायदे जसे की प्रतीक्षा कालखंड, क्युम्युलेटीव्ह बोनस इ. गमावाल आणि पुन्हा सर्व काही पुन्हा सुरू करणे आवश्यक होईल.
हेल्थ इन्शुरन्समध्ये ग्रेस कालखंडचे टेन्यूअर किती असतो?
ग्रेस कळखंडासाठी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रदात्यावर अवलंबून असतो आणि 1-30 दिवसांमध्ये काहीही असू शकतो.
डिजीट हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटीचा पर्याय देतो का?
होय, डिजिट हेल्थ इन्शुरन्स तुमची पॉलिसी पोर्ट करण्याचा पर्याय प्रदान करतो.
मी पोर्टेबिलिटीसाठी कधी अर्ज करू शकतो?
सध्याच्या पॉलिसीच्या रिनिवलच्या तारखेच्या किमान 45 दिवस आधी तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स पोर्ट करण्यासाठी अर्ज करू शकता.
जेव्हा मी पोर्ट करतो तेव्हा क्युम्युलेटीव्ह बोनस किंवा प्रतीक्षा कालखंड यांसारखे माझे फायदे प्रभावित होतील का?
नाही, पोर्टिंगचा फायदा असा आहे की तुम्ही नवीन हेल्थ इन्शुरन्सकडे शिफ्ट झालात तरीही तुमचा प्रतीक्षा कालखंड रद्द केला जात नाही, म्हणजे, तुम्हाला तुमचा प्रतीक्षा कालखंड अगदी सुरुवातीपासून परत सुरू करण्याची गरज नाही. तसेच, एनसीबी सारखे फायदे नवीन विमा कंपनीमध्ये कॅरि फॉरवर्ड होतात.
पोर्टिंग ऐवजी, मी माझ्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स प्रदात्यासोबत माझा प्लॅन बदलू शकतो का?
होय, आपण हे करू शकता. साधारणपणे, तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिनिवलच्या वेळी तुमच्या विद्यमान हेल्थ इन्शुरन्स प्रदात्यासोबत प्लॅन आणि कव्हरेज मध्ये चेंजेस केले जाऊ शकतात. तथापि, तुमच्या पॉलिसीमध्ये कोणते चेंज केले जाऊ शकतात हे तुमच्या इन्शुरन्स प्रदात्यावर अवलंबून असते.