गृहिणींना घरबसल्या पैसे कसे कमावता येतील?
आपल्या सर्वांना माहित आहे की, गृहिणी दरदिवशी घरातील सर्वात महत्वाची कामे करतात. घराचे व्यवस्थापक म्हणून घराची आणि कुटुंबाची काळजी घेतात. या आव्हानात्मक कामात एकही दिवस सुट्टी नाही.
जर तुम्ही गृहिणी असाल, वर्क फ्रॉम होम करत असाल, तर तुम्हाला आणखी काही करून थोडे पैसे कमवण्याची संधी हवी आहे, असे वाटू शकते.
सुदैवाने, अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्या गृहिणी घरबसल्या करू शकतात, ज्याचा तुमच्या दैनंदिन कामांवर परिणाम होणार नाही. कारण हे सर्व पर्याय सोपे , सोयीस्कर आहेत. ज्यात अत्यंत कमी किंवा नगण्य गुंतवणूक गरजेची असते.
गृहिणीसाठी घरबसल्या पैसे कमवण्याचे टॉप मार्ग येथे आहेत
1. विमा POSP व्हा
POSP (किंवा पॉइंट ऑफ सेल्सपर्सन) ही अशी व्यक्ती आहे, जी विमा उत्पादने विकते. हे असे विमा एजंट आहेत, जे विमा कंपन्यांसोबत काम करून \ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार पॉलिसी विकण्याचे काम करतात
काही गुंतवणूक आवश्यक आहे का?- विमा एजंट होण्यासाठी,तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे, आणि इयत्ता 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तुम्ही ही पात्रता पूर्ण केल्यास, तुम्हाला तुमचा परवाना मिळविण्यासाठी IRDAI द्वारेऑफर केलेले 15 तासांचे अनिवार्य प्रशिक्षण देखील पूर्ण करावे लागेल.
आपण किती कमवू शकता?- तुमचे उत्पन्न कमिशनवर आधारित असेल. तुम्ही किती कमावता, हे तुम्ही किती पॉलिसी विकता, यावर अवलंबून असेल. तुम्ही जितक्या जास्त पॉलिसी विकाल तितके तुमचे उत्पन्न जास्त असेल.
- तुमच्याकडे स्मार्टफोन आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असेल तर कोणीही POSP एजंट बनू शकते.
2. घरगुती वस्तू विकणे
घरबसल्या सहज पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे घरगुती उत्पादने ऑनलाइन विकणे. यामध्ये बेक केलेले पदार्थ, हेल्दी स्नॅक्स, सुगंधित मेणबत्त्या, वॉल हँगिंग्ज, टेबल मॅट्स आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. तुम्हाला कला, जसे की हस्तकला किंवा स्वयंपाकात कौशल्य अवगत असल्यास, तुम्ही Etsy , Amazon , Flipkart Ajio सारख्या साइट्सवर विक्रेता म्हणून सहजपणे नोंदणी करू शकता. तसेच तुम्ही सोशल मीडियावर तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचू शकता, आणि सेकंडरी मार्केटिंग माध्यमातून त्यांना तुमची उत्पादने थेट विकू शकता.
काही गुंतवणूक किंवा आवश्यकता आहे का?- तुम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी कच्च्या मालामध्ये गुंतवणूक करावी लागेल. जसे की, स्वयंपाकाचे साहित्य किंवा हस्तकला पुरवठा.
आपण किती कमवू शकता?- तुमचे उत्पन्न तुम्ही विकत असलेली उत्पादने, तुमची मार्केटिंग कौशल्ये आणि तुम्ही निवडलेल्या विक्री भागीदार साइटवर अवलंबून असेल. तुम्ही तुमची उत्पादने उच्च किंमतींवर सेट करू शकता.
3. भाषांतर करण्याची कामे शोधा
तुम्हाला अनेक भाषा येत असल्यास, गृहिणींसाठी पैसे कमवण्याची एक कल्पना म्हणजे अनुवादक बनणे. डॉक्युमेंट्स , व्हॉइस मेल, पेपर्स, सबटायटल्स आणि बरेच काही भाषांतरित करण्यासाठी बाजारात मोठी मागणी आहे. तुम्ही भाषांतर एजन्सी किंवा फ्रीलान्सिंग पोर्टल्स, जसे की Freelance India , Upwork किंवा Truelancer यांच्याशी संपर्क साधू शकता
काही गुंतवणूक किंवा आवश्यकता आहे का?- यात जास्त गुंतवणूक नाही, आणि सामान्यतः कोणतेही विशिष्ट शिक्षण आवश्यक नसते.
आपण किती कमवू शकता?- तुमचे उत्पन्न तुम्हाला माहीत असलेल्या भाषांनुसार बदलू शकते. जेव्हा तुम्हाला प्रतिशब्द पैसे दिले जातात, तेव्हा तुम्ही भाषेच्या आधारावर प्रति शब्द ₹1 ते ₹4 असे दर आकारू शकता.
- लक्षात ठेवा,तुम्हाला परदेशी भाषा (जसे की फ्रेंच,रशियन,स्पॅनिश किंवा जपानी) माहित असल्यास आणि त्यासाठी प्रमाणपत्र असल्यास तुम्ही नेहमीच अधिक कमाई करू शकता.
4. ब्लॉग सुरू करा
घरबसल्या पैसे कमवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे ब्लॉग सुरू करणे. कोणीही ब्लॉगर बनू शकते, तुम्हाला फक्त आवडीचे क्षेत्र हवे आहे. जसे की, प्रवास, कला आणि हस्तकला, अन्न, पुस्तके, मेकअप इ.
तुम्ही WordPress , Weebly , Medium किंवा Blogger सारख्या ब्लॉगिंग साइटवर साइन अप करू शकता. मग, तुम्हाला फक्त आवडीच्या विषयांवर लिहायचे आहे, आणि एकदा का तुमचा ब्लॉग सुरू झाला, व थोडे ट्रॅफिक आले की, तुम्ही जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवू शकता.
विशेषत: जर तुम्ही पाककृती किंवा हस्तकलेसाठी टिप्स, यासारख्या गोष्टी शेअर करत असाल, तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर पीडीएफ, प्रिंटेबल, ई-पुस्तके देखील विकू शकता
काही गुंतवणूक किंवा आवश्यकता आहे का?- तुम्ही विशिष्ट डोमेन नाव खरेदी करू इच्छित नसल्यास जास्त गुंतवणूक समाविष्ट नाही. मात्र, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा SEO चे कौशल्य प्राप्त करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल, जेणेकरून आपली साइट अधिक सक्रिय होईल.
- आपण किती कमवू शकता?- तुमची कमाई तुमच्या साइटवरील ट्रफिक, तुमची विशिष्ट वाचकसंख्या यावर अवलंबून असेल. बर्यापैकी लोकप्रिय साइटसह, तुम्ही 2″x 2″ जाहिरात जागेसाठी महिन्याला ₹2,000-15,000 पर्यंत कमवू शकता.
5. YouTube चॅनल सुरू करा
तुम्हाला लेखनाची आवड नसल्यास व तरीही तुम्हाला तुमची आवड जगासह शेअर करायची असल्यास, तुम्ही YouTube चॅनेल सुरू करण्याचा विचार करू शकता. एखाद्या ब्लॉगप्रमाणे, तुम्ही YouTube वर पाककृती आणि स्वयंपाकापासून नृत्य किंवा कला शिकवण्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती शेअर करू शकता. तुम्हाला कोणत्याही विशेष साइटसाठी साइन अप करण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त एक ईमेल आयडी आणि YouTube अकाउंट आवश्यक आहे. येथे ब्लॉगप्रमाणे, तुम्ही जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवू शकता.
जाहिरातींच्या कमाई व्यतिरिक्त, तुम्हाला मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळाल्यास, तुम्ही तुमच्या व्हिडिओवर जाहिरात करू इच्छिणाऱ्या ब्रँडसह सशुल्क डीलद्वारे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवू शकता.
काही गुंतवणूक किंवा आवश्यकता आहे का?- तुम्हाला आवश्यक असलेले कोणतेही साहित्य किंवा पुरवठा याशिवाय,यात कोणतीही गुंतवणूक नाही.
- आपण किती कमवू शकता?- तुमची कमाई तुमच्या प्रेक्षकांच्या संख्येवर अवलंबून असेल; सरासरी, तुम्ही प्रति व्हिडिओ 10K व्ह्यूजसाठी ₹200 ते ₹500 पर्यंत कमवू शकता आणि हे व्ह्यूजच्या संख्येसह वाढेल.
6. ट्रॅव्हल एजंट किंवा प्लॅनर व्हा
गृहिणींसाठी सर्वात सोयीस्कर पर्यायांपैकी एक म्हणजे घरबसल्या ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणे, प्रवासाच्या योजना आखणे आणि तिकीट बुक करणे. हे सर्व आजकाल ऑनलाइन केले जाऊ शकते. परंतु जे व्यस्त आहेत, किंवा इंटरनेटशी परिचित नाहीत, त्यांच्यासाठी ही एक मोठे आव्हान होऊ शकते. यामुळे ट्रॅव्हल एजंट आणि प्लॅनर्ससाठी मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे.
तुम्ही Upwork , AvantStay , किंवा Hopper सारख्या साइटवर काम करण्यासाठी साइन अप करू शकता, किंवा तुम्ही स्वयंरोजगार मिळवत ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करू शकता.
काही गुंतवणूक किंवा आवश्यकता आहे का?- यात कोणतीही गुंतवणूक किंवा आवश्यकता नाही. तरीही तुम्हाला स्वस्त फ्लाइट, स्वस्त हॉटेल बुकिंग आणि इतर चांगले प्रवासी प्लॅन कसे शोधायचे? हे माहित असले पाहिजे.
आपण किती कमवू शकता?- तुम्ही किती कमावता, हे तुमच्या क्लायंटवर, तुम्ही ज्या कंपनीसाठी काम करता किंवा तुम्ही कोणत्या प्रकारच्या सुट्ट्यांसाठी व्यवहार करता, यावर अवलंबून असेल (उदाहरणार्थ: लक्झरी सुट्ट्या, कौटुंबिक सहली इ.).
तंत्रज्ञानाने गृहिणींसाठी काम करणे नेहमीपेक्षा सोपे केले आहे, यातून थोड्या किंवा कोणत्याही गुंतवणुकी शिवाय ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. हे काम दिसते त्यापेक्षा सोपे आहे, आणि या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी व घरी बसून थोडे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला थोडा मोकळा वेळ हवा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गृहिणींनी पार्ट टाइम नोकरी का करावी?
आम्हाला माहित आहे की, गृहिणींकडे आधीच घर आणि कुटुंबाची काळजी घेणे या जगातील सर्वात कठीण कामाची जबाबदारी आहे. पण, पार्टटाइम नोकरी केल्याने त्यांना थोडेसे पैसे कमविण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे त्यांना अधिक स्वातंत्र्य आणि समाधान मिळवता येऊ शकते.
गृहिणी आणि घरी राहणाऱ्या पालकांनी घरबसल्या योग्य काम कसे निवडायचे?
घरी राहणाऱ्या पालकांसाठी आणि गृहिणींसाठी करिअरचे बरेच पर्याय आहेत. सर्वोत्तम पर्याय म्हणजे घरातून पार्ट टाइम स्वरूपात करता येणारे काम.
ऑनलाइन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुभव आवश्यक आहे का?
हे तुम्हाला कोणत्या प्रकारची नोकरी करायची आहे, यावर अवलंबून आहे. फक्त निवडलेल्या नोकरीसाठी काही पात्रता निकष आहेत का? ते तपासा. मात्र, जर तुम्ही घरगुती खाद्यपदार्थ किंवा वस्तू विकण्याचा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करत असाल, तर तुम्हाला फक्त हायस्पीड इंटरनेट कनेक्शन, जाहिरातीसाठी चांगली मार्केटिंग कौशल्ये आणि तुमच्या कामाची आवड असणे आवश्यक आहे.
नोकरी किंवा व्यवसाय ऑनलाइन सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे का?
तुम्ही ऑनलाइन करू इच्छित असलेल्या कामासाठी लागणारी गुंतवणूक कामाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, POSP बनण्यासारख्या कामासाठी जास्त गुंतवणूक आवश्यक नाही. परंतु काही इतर व्यवसायांसाठी, गुंतवणूक 0 ते ₹5000 प्रति महिना बदलू शकते.