24X7 रोडसाइड असिस्टन्स म्हणजे काय?
रोडसाइड असिस्टन्स किंवा ब्रेकडाउन कव्हर हे एक ॲड-ऑन आहे जे तुम्ही तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स किंवा टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी मध्ये निवडू शकता, ज्यावेळी तुम्हाला रस्त्याच्या कडेला मदतीची आवश्यकता आहे अशा वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी, म्हणजेच तुम्ही रस्त्यावर अडकल्यावर काही मदतीची आवश्यकता असल्यावर हे उपयुक्त ठरते.
एक छोटीशी दुर्घटना असो किंवा टायर पंक्चर, रस्त्याच्या कडेला 24x7 चे सहाय्य कव्हर तुम्हाला अशा अडचणींच्या वेळी मदत करू शकते, आणि हे क्लेम म्हणून पकडले जात नाही.
रोडसाइड असिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती खर्च येतो?
तुम्ही तुमच्या प्रीमियममध्ये स्टँडर्ड मिनिमम ॲडीशनसाठी आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार किंवा बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रोडसाइड किंवा ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हर निवडू शकता. यासाठी डिजिटमध्ये, कारसाठी तुम्हाला अतिरिक्त 102 रुपये खर्च येऊ शकतो, तर बाईकसाठी तुम्हाला 40 रुपये खर्च येऊ शकतो.
रोडसाइड असिस्टन्स कव्हर कसे कार्य करते?
एकदा का तुम्ही तुमच्या डिजिट कार किंवा बाईक इन्शुरन्स प्लॅनमध्ये रोडसाइड/ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हरचा पर्याय निवडला असेल, तर गरजेच्या वेळी रोडसाइड असिस्टन्स कव्हर वापरणे सोपे आहे !
अडचणींच्या वेळी (जेव्हा तुम्हाला सेवेची गरज असते) तुम्हाला फक्त 1800-103-4448 वर कॉल करणे आणि तुमच्या पॉलिसीविषयीची माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे आणि आम्ही काही वेळातच आपल्यासाठी तेथे असू.
डिजिटसह, रोडसाइड असिस्टन्स कव्हर 24 x 7 सपोर्टसह येते आणि सुविधा आणि कामगार खर्चाची देखील यात काळजी घेतली घेते. आम्ही तुम्हाला तुमच्या शहरापासून 500 किलोमीटरपर्यंतची सेवा देतो (इतर लोक फक्त 100 किलोमीटरपर्यंतची सेवा देतात
आरएसए कव्हरमध्ये काय कव्हर्ड आहे - आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात
तुमच्या कार इन्शुरन्समध्ये किंवा टू-व्हिलर इन्शुरन्समध्ये आरएसए अंतर्गत जे काही कव्हर्ड आहे त्याचा सारांश तुम्हाला आधीच देण्यात आला आहे. तथापि, तुम्ही तुमच्या कव्हरेजमधील तपशील समजून घेणे देखील महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला रोड साइड असिस्टन्स किंवा ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हरचे फायदे पूर्णपणे समजतील.
हे अशा काळासाठी आहे जेव्हा आपल्या बॅटरीमधील समस्यांमुळे तुमची कार किंवा बाईक थांबते. याबाबतीत, तुमचे आरएसए कव्हर तुमच्यासाठी असेल, ज्यात सर्व मजुरीच्या आणि प्रवासाच्या खर्चासाठी पैसे देणे कव्हर्ड आहे.
तुम्हाला ते आवडो ना आवडो, लोक त्यांच्या कारच्या चाव्या बऱ्याच वेळा हारवतात! अशा अवघड परिस्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या चाव्यांशिवाय कोठेतरी अडकता, तेव्हा तुमचे रोडसाइड असिस्टन्स कव्हर तुम्हाला स्पेअर कीज (चाव्या) पिकअप आणि वितरणाची व्यवस्था करेल किंवा दरम्यान तंत्रज्ञांच्या मदतीने तुमची कार अनलॉक करण्यास मदत करेल.
आयुष्यात कधीतरी तुमच्य सर्वांचे टायर पंक्चर झाले आहेत! देव ना करो की तुम्ही टायर पंक्चर झाल्यामुळे तुमच्या वाहनासह अडकले आहात आणि कोणाकडेही मदत मागू शकत नाही, अशावेळी तुमच्या रोडसाइड असिस्टन्स कव्हरमुळे योग्य तंत्रज्ञ उपलब्ध करुन देण्याची आणि अतिरिक्त टायरसह मदत करण्याची व्यवस्था करून देण्यात येईल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
कधीकधी, गोष्टी अशा घडतात आणि आपण आता आपली कार किंवा बाईक का सुरू होत नाही असा विचार करत बसतो ! अशा दुर्दैवी परिस्थितीसाठी तुमचा रोडसाइड असिस्टन्स तुम्हाला गरजेच्या वेळेला आवश्यक दुरुस्तीची तरतूद करून मदत करू शकतो.
गंभीर प्रकरणांमध्ये जेथे तुमचे वाहन जागेवर दुरुस्त करता येत नाही आणि सर्व्हिसिंगसाठी वर्कशॉप किंवा गॅरेजमध्ये पाठवणे आवश्यक आहे, तुमच्या रोडसाइड असिस्टन्स कव्हरमुळे तुम्हाला आवश्यक टोइंग सुविधा घेऊन फायदा करुन घेता येईल.
एखाद्या दुर्दैवी प्रकरणात, जिथे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना परिस्थितीविषयी तातडीचा संदेश देण्याची गरज आहे, तिथे आम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊ!
दुर्दैवी परिस्थितीत जिथे केवळ तुमचे वाहनच नाही, तर तुम्हीसुद्धा अपघातामुळे अडचणीत सापडला आहात, तुमचे रोडसाइड असिस्टन्स कव्हर जवळच्या वैद्यकीय केंद्राशी समन्वय साधण्यास मदत करेल. जेणेकरून तुमच्या वैद्यकीय गरजांची चांगल्याप्रकारे काळजी घेतली जाईल.
हे आपल्यापैकी सर्वांच्या बाबतीत घडते! तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच तुमची इंधनाची टाकी संपते! अशावेळी, तुम्ही ज्या ठिकाणी अडकला आहात त्या ठिकाणी 5 लिटरपर्यंत इंधनाची व्यवस्था करून तुमचे कव्हर तुम्हाला मदत करेल!
रोडसाइड असिस्टन्समधून वगळलेल्या आणि लक्षात ठेवण्यासारख्या इतर गोष्टी
आम्ही आमच्या अटी आणि शर्तींबद्दल अगदी स्पष्ट आहोत जेणेकरून जेव्हा क्लेम्सचा प्रश्न येतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होणार नाही. डिजिटच्या रोडसाइड असिस्टन्स कव्हरच्या संदर्भात, तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा काही गोष्टी येथे दिल्या आहेत:
- आमच्या रोडसाइड असिस्टन्सच्या क्लेमचा हिशेब कव्हरमध्ये धरत नसले तरी एक पॉलिसी वर्षात केवळ चार वेळाच वापरता येते.
- तुम्ही तुमच्या पॉलिसी कालावधीत 2 वेळा इंधन सहाय्य घेऊ शकता.
- रोडसाइड असिस्टन्स केवळ अशा वेळेसाठी वापरले पाहिजे जेव्हा तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. उदाहरणार्थ; जर तुमचे वाहन जवळच्या वर्कशॉप किंवा डीलरकडे कोणत्याही त्रासाशिवाय सुरक्षितपणे हस्तांतरित केले जाऊ शकते, तर अशा प्रकरणात रोडसाइड असिस्टन्स लागू होणार नाही.
- तुमच्या रोडसाइड असिस्टन्स कव्हरमध्ये दुरुस्ती आणि कामगारांच्या खर्चासाठीदेखील कव्हर केले जाते, परंतु अपघात झाला त्या ठिकाणी रोडसाइड असिस्टन्समध्ये फक्त 45 मिनिटांपर्यंत मदत मिळते.
- सर्व कार आणि बाईक क्लेम्सप्रमाणेच, आपण मद्यधुंद अवस्थेत किंवा वैध परवान्याशिवाय वाहन चालवताना आढळल्यास आपल्याला कव्हर केले जाऊ शकत नाही.
रोडसाइड असिस्टन्स कव्हर कोणी घ्यावे?
जर तुमच्याकडे 5 वर्षांपेक्षा कमी वयाची कार किंवा बाईक असेल, तर आपण आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह कार किंवा बाईक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रोडसाइड असिस्टन्स निवडले पाहिजे जेणेकरून तुमचे नवीन वाहन सर्व संभाव्य परिस्थितीत नेहमीच चांगले राखले जाईल आणि संरक्षित केले जाईल.
जर तुम्ही अनेकदा प्रवास करणारे असाल, तर रोडसाइड असिस्टन्स 24x7 ची मदत निवडणे ही एक चांगली कल्पना आहे. तुम्हाला प्रवासात कधी मदतीची गरज कधी पडू शकते हे तुम्हाला माहित नाही!
काही लोक छोट्या दुर्घटनांमधून वाचतात पण काही दुर्घटना जास्त दुर्दैवी असतात! म्हणून, जर तुम्ही असे कोणी असाल जे आपल्या टू-व्हीलर किंवा कारमध्ये किरकोळ दुरुस्ती करण्याची कल्पनाही करू शकत नसाल, तर तुमच्या पॉलिसीमध्ये रोडसाइड असिस्टन्स ॲड-ऑन मिळवणे ही तुम्हाला देवदूत मिळाल्यासारखी गोष्ट असेल!
मोटार इन्शुरन्समधील 24X7 रोडसाइड असिस्टन्स कव्हरबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
रोडसाइड असिस्टन्स किफायतशीर आहे का ?
रोडसाइड असिस्टन्स कव्हरचे विविध फायदे पाहता, तुम्हाला अशा सेवेची गरज कधी पडू शकते हे तुम्हाला माहित नाही म्हणून हे नक्कीच फायद्याचे आहे!
माझ्या गाडीसाठी रोडसाइड असिस्टन्स मिळवण्यासाठी मला किती खर्च येईल ?
रोडसाइड असिस्टन्स किंवा ब्रेकडाउन असिस्टन्स कव्हरसाठी तुम्हाला तुमच्या कार इन्शुरन्स प्रीमियममध्ये अतिरिक्त 102 रुपये खर्च येईल.
माझ्या टू-व्हीलरसाठी रोडसाइड असिस्टन्स मिळवण्यासाठी मला किती खर्च येईल?
डिजिटमध्ये, तुम्ही रोडसाइड असिस्टन्स निवडल्यास आम्ही तुमच्या प्रीमियमसाठी स्टँडर्ड मिनिमम फी 40 रुपये आकारतो.
रोडसाइड असिस्टन्सचा क्लेम केल्याने माझ्या नो क्लेम बोनसवर परिणाम होईल का?
नाही! सुदैवाने रोडसाइड असिस्टन्स हे एकमेव कव्हर आहे ज्यात तुम्हाला त्याचा फायदा झाला तरी तो क्लेम म्हणून जोडला जाणार नाही आणि जर तुम्ही वर्षभरात इतर कोणतेही क्लेम केले नसतील, तर तुमचा नो क्लेम बोनस अबाधित राहील.
रोडसाइड असिस्टन्स कार अनलॉक करण्यास मदत करते का?
होय, जर तुम्ही तुमची चावी हरवली असेल किंवा स्वत:च्या गाडीतून चावी न घेता बाहेर पडलात, तर रोडसाइड असिस्टन्सचे कव्हर तुम्हाला अतिरिक्त चावीने मदत करेल आणि काही बाबतीत तंत्रज्ञाच्या मदतीने ते अनलॉक करण्यास मदत करेल, फक्त तुम्हाला वैध ओळखपत्र सुरक्षेच्या उद्देशाने पुरावा म्हणून सादर करावे लागेल.
मला रोडसाइड असिस्टन्स कव्हर विकत घ्यायचं आहे. मी आरएसए कव्हरमध्ये काय शोधावे?
- संपर्क सुलभता: जेव्हा तुम्ही तुमच्या कारसह विचित्र ठिकाणी अडचणीत असता, तेव्हा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी सहज संपर्क साधू शकता. त्यामुळेच, रोडसाइड असिस्टन्समध्ये शोधण्याची एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीपर्यंत किती सहजपणे पोहोचू शकता.
- वेळ: अडचणी अचानक येतात! त्यामुळेच, तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे की, तुमच्या इन्शुरन्स कंपनीचा रोडसाइड असिस्टन्स 24x7 सपोर्टसह येते!
- कव्हरेज: शेवटी, तुमच्या रोडसाइड असिस्टन्सच्या कव्हरने तुम्हाला फायदे आणि कव्हरेज दिले पाहिजे ज्यामुळे ते योग्य बनते. म्हणूनच, कव्हरेजचे फायदे काय आहेत आणि ते आपल्यासाठी मौल्यवान आहेत की नाही हे नेहमीच पाहा.
- सेवा लाभ: काही इन्शुरन्स कंपन्या बेसिक कव्हरेजपेक्षा जास्त लाभ देतात. डोळसपणे निवड करण्यासाठी वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या कोणत्या गोष्टी ऑफर करतात ते पाहा.