डिजिट इन्शुरन्समध्ये स्विच करा

मोटार इन्शुरन्सचे प्रकार

मोटार इन्शुरन्स म्हणजे काय?

मोटार इन्शुरन्स हा इतर कोणत्याही इन्शुरन्स पॉलिसीसारखाच आहे, पण इतर इन्शुरन्सच्या तुलनेत तो ‘अनिवार्य’ आहे ! तसेच नावाप्रमाणेच हा इन्शुरन्स सर्व प्रकारच्या मोटार वाहनांशी-मोटारसायकल, कार, जीप, व्यावसायिक वाहने इत्यादीशी संबंधित आहे.

तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने मोटार इन्शुरन्स अनिवार्य केला आहे. आणि देव ना करो पण तुम्ही जेव्हा एखाद्या दुर्घटनेत अडकता तेव्हा तुम्हाला कळते की भरलेल्या वार्षिक प्रीमियमची रक्क्म एकदम कमी आहे.

येथे बऱ्याच लोकांचा आणखी एक गैरसमज आहे की, मोटार इन्शुरन्स फक्त मोटार वाहन कव्हर करते. पण ते चुकीचे आहे !

तर प्रथम, आपण मोटार इन्शुरन्स पॉलिसीच्या विविध प्रकारांनी आणि त्यामध्ये काय कव्हर केले जाते  त्याने सुरुवात करूया! मोटार विम्याचे वर्गीकरण 2 गोष्टींनुसार करता येते

  • ज्या प्रकारच्या व्हेईकलसाठी तुम्ही इन्शुरन्स घेत आहात
  • तुमच्या वाहनाच्या कव्हरेजसाठी तुम्हाला किती रकमेचे इन्शुरन्स कव्हर हवे आहे

तर, भारतातील व्हेईकल इन्शुरन्स कोणत्या प्रकारच्या वाहनाच्या प्रकारावर आधारित आहेत?

भारतातील मोटार इन्शुरन्सचे प्रका

खाजगी कार इन्शुरन्स पॉलिसी

हा असा मोटार इन्शुरन्स आहे जो एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या कोणत्याही खासगी कारसाठी घेणे आवश्यक आहे आणि भारत सरकारने असा इन्शुरन्स घेणे बंधनकारक केले आहे. यात अपघात, आग, नैसर्गिक आपत्ती, चोरी आणि मालकाला कोणत्याही प्रकारची इजा झाली तर  कव्हर देण्यात येते. यात थर्ड पार्टीला झालेल्या कोणत्याही नुकसानीचा आणि जखमांचाही समावेश होतो.  कार इन्शुरन्स घ्या

टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी

या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्कूटर किंवा बाईकसारख्या टू-व्हीलरचा समावेश आहे आणि भारत सरकारने हा इन्शुरन्स बंधनकारक केला आहे. टू-व्हीलर इन्शुरन्समध्ये अपघात, आपत्ती, आग, चोरी इत्यादींमुळे होणारे नुकसान तसेच थर्ड-पार्टीला होणारे कोणतेही नुकसान आणि जखम यासाठी कव्हर दिले जाते. हे मालक आणि गाडी चालवत असणाऱ्यासाठी अनिवार्य आहे.  पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर देखील प्रदान करते आणि प्रवाश्यांसाठीदेखील कव्हर देता येते. बाईक इन्शुरन्स घ्या

कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स

या इन्शुरन्समध्ये वैयक्तिक वापरासाठी न वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहनांचा समावेश आहे.  या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये त्या सर्व वाहनांचा समावेश आहे जे वैयक्तिक हेतूसाठी वापरले जात नाहीत. ट्रक, बस, हेवी कमर्शिअल व्हेईकल्स, हलकी कमर्शिअल वाहने, बहुपयोगी वाहने, कृषी वाहने,  टॅक्सी/कॅब, रुग्णवाहिका, ऑटो-रिक्षा इत्यादी काही वाहने या इन्शुरन्स अंतर्गत समाविष्ट आहेत. कमर्शिअल व्हेईकल इन्शुरन्स घ्या

भारतातील मोटार इन्शुरन्स पॉलिसींचे प्रकार

थर्ड पार्टी सर्वसमावेशक

अपघातामुळे स्वत:च्या टू व्हीलर चे नुकसान

×

आगीच्या घटनांमध्ये स्वतःचे टू व्हीलर चे नुकसान

×

नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी स्वत:च्या टू व्हीलर चे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या वाहनाचे नुकसान

×

थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान

×

वैयक्तिक अपघात संरक्षण

×

थर्ड पार्टीच्या व्यक्तीच्या दुखापती/मृत्यू

×

तुमच्या स्कूटर किंवा बाइक ची चोरी

×

तुमचा IDV कस्टमाइझ करा

×

कस्टमाइझ अ‍ॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

सर्वसमावेशक आणि थर्ड-पार्टी बाइक इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या.

कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटार इन्शुरन्स पॉलिसीसह ॲड-ऑन्स

खालील यादीत 'ॲड ऑन' कव्हर्सपैकी काही गोष्टी आहेत ज्या मूलभूत मोटार इन्शुरन्स पॉलिसी खर्चापेक्षा कमी प्रीमियमवर मिळू शकतात.

झिरो डिप्रिसिएशन

वाढत्या वयासोबत काही दोषही वाढत जातात. हीच गोष्ट तुमच्या वाहनालाही लागू होते. ते जितके जुने होईल तितके तुमच्या कार किंवा बाईकचे मूल्य कमी होते किंवा 'डिप्रिशिएट' होते. परंतु, चिंता करु नका, झिरो डेप्रीसिएशन ड-ऑन हे सुनिश्चित करते की तुम्ही खरेदी केले त्या दिवसाइतकेच तुमच्या वाहनाचे मूल्य राहील. शेवटी, इन्शुरन्स कंपनी अंतिम सेटलमेंट दरम्यान डिप्रिसिएशनचा विचार करणार नाही!

इंजिन संरक्षण कव्हर

इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हर हे एक 'ॲड ऑन' आहे जे वाहनाच्या इंजिनला झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करते. इंजिनमध्ये पाणी शिरण्यापासून ते ल्युब्रिकेटिंग तेलाच्या गळतीपर्यंत कोणतेही नुकसान या पॉलिसीमध्ये कव्हर केले जाते.

रोडसाइड असिस्टन्स

मध्यरात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी चोरीमारीच्या वाटेवर तुमच्या गाडीची चाकं तुटण्याची कल्पना कशी वाटते? घाबरू नका, रोडसाइड असिस्टन्स आहे. तुम्हाला फक्त त्यांना कॉल करणे आवश्यक आहे आणि ते घटनास्थळी येतील आणि तुमचे वाहन दुरुस्त करतील. शक्य नसल्यास ते जवळच्या सर्व्हिस स्टेशनकडे टो करतील. निदान तुम्ही सुखरूप राहाल!

कंझ्युमेबल कव्हर

आजकाल, मोटार इन्शुरन्स कंपन्या तुमच्या वाहनाच्या सर्व्हिस कॉस्टसाठी (देखभालीचा खर्च) एक कंझ्युमेबल कव्हर ॲड-ऑन  प्रदान करतात,  तुमच्या वाहनात टाकलेल्या नवीन इंजिन तेलापासून ते तुमच्या इंजिन कव्हरवरील हरवलेल्या नटपर्यंत सगळे कव्हर केले जाते.

रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर

दुरुस्तीच्या पलीकडे गेलेली स्थिती, चोरी किंवा नुकसान झाल्यास, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर तुम्हाला तुमच्या कारच्या/बाईकच्या इनव्हॉईस मूल्याची संपूर्ण रक्कम परत मिळविण्याचा फायदा देते, ज्यात अनुक्रमे नवीन वाहन आणि त्याचा रोड टॅक्स ( रस्ते कर) नोंदविण्याचा खर्च कव्हर होतो.

टायर प्रोटेक्ट कव्हर

सामान्यत: टायरचे नुकसान इन्शुरन्समध्ये कव्हर केले जात नाही, पण ते जर अपघातात खराब झाले असतील तर कव्हर होते. त्यामुळेच हा टायर प्रोटेक्ट ड-ऑन  तुम्हाला तुमच्या कारच्या टायरच्या नुकसानीपासून जसे की फुटणे, फुगणे किंवा कापले जाणे अशा तत्सम गोष्टींपासून संरक्षण देऊन या गोष्टी कव्हर करते.

हा इन्शुरन्स घेऊन वैयक्तिकरित्या काहीही फायदा होणार नसेल तर एखाद्याने तो घ्यावा असा विचार तुम्ही कदाचित करत असाल, बरोबर ना ?

ते ठीकही आहे, जर तुम्ही तुमचे वाहन फक्त अधूनमधून वापरत असाल तर थर्ड-पार्टी इन्शुरन्स घेणे योग्य ठरते, कारण एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता खूप कमी असेल.

तसेच, जर तुम्ही तुमची कार दोन दिवसात किंवा महिन्याभरात विकण्याचा विचार करत असाल, तर संपूर्ण वर्षासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्ससाठी इतका जास्त प्रीमियम भरणे योग्य होणार नाही!

आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सचा जास्त  प्रीमियम मर्यादित बजेट असलेल्या व्यक्तीवर अधिक भार टाकतो! हेच कारण आहे की ते थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे निवडतात.

असे असले तरीही, आम्ही अजूनही थर्ड पार्टी इन्शुरन्सपेक्षा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सची शिफारस करतो, कारण त्याचे फायदे आपण पे करत असलेल्या प्रीमियमनुसार योग्य आहेत.

शेवटी जेव्हा आपला मोटार इन्शुरन्स निवडण्याची वेळ येते तेव्हा ही जुनी म्हण खरी होते - "नेव्हर बी पेनी वाईस अँड पाउंड फुलिश 😊!"