Third-party premium has changed from 1st June. Renew now
हिरो टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा
हिरो बाईक विकत घेत आहात का? हिरो बाईक इन्शुरन्स लोकांना का हवाहवासा वाटतो आणि तुमच्या वाहनासोबत हिरो बाईक इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी काय शोधावे याबद्दल सर्व जाणून घ्या.
हिरो मोटोकॉर्पने जाहीर केलेल्या विक्री अहवालानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारतात 7.8 दशलक्षाहून अधिक टू-व्हीलर्सची विक्री केली.
शिवाय ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 दरम्यान कंपनीने 7,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे.
पण, या बाईक इतक्या लोकप्रिय असण्यामागे नक्की कारण काय आहे? हिरो मोटोकॉर्पला कशामुळे ‘फोर्ब्स 200’ या जगातील सर्वात आदरणीय कंपन्यांच्या यादीमध्ये स्थान मिळाले? तसेच, मालकांसाठी हिरो बाईक इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेणे का महत्त्वाचे आहे ?
तर, स्टार्टर्ससाठी, मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत किमान थर्ड पार्टी लायॅबलिटी इन्शुरन्स पॉलिसी घेणे अनिवार्य आहे. जर तुमचा हिरो बाईकचा इन्शुरन्स थर्ड पार्टी पॉलिसी अंतर्गत कव्हर नसेल तर तुम्हाला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड होऊ शकतो.
शिवाय, अपघात, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे तुमची टू-व्हीलर खराब होण्याचा धोकादेखील आहे. त्यामुळेच इन्शुरन्स पॉलिसी घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.
पण हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याबद्दलच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यापूर्वी, चला ही बाईक तयार करणाऱ्या कंपनीच्या संक्षिप्त इतिहासाने सुरुवात करूया.
हिरो बाईक इन्शुरन्समध्ये काय कव्हर्ड आहे
काय कव्हर केले जात नाही
तुमच्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीमधे कशाचा समावेश होत नाही हे माहिती असणेही महत्त्वाचे आहे. म्हणजे कधी क्लेम करायचा झाला तर तुमच्यावर आश्चर्यचकित होण्याची पाळी येऊ नये. अशा काही घटना इथे दिल्या आहेत:
थर्ड-पार्टी लायॅबिलिटी ओन्ली बाईक पॉलिसी असल्यास त्यात स्वतःच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची भरपाई केली जात नाही.
तुम्ही दारू पिऊन किंवा टू-व्हिलरचे वैध लायसन्स नसताना गाडी चालवत असाल तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या बाईक इन्शुरन्सचे संरक्षण मिळत नाही.
जर तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असेल आणि तुम्ही तुमच्यामागे वैध लायसन्सधारक बसलेला नसताना टू-व्हिलर चालवत असलात तर अशा वेळी तुमचा क्लेम कव्हर केला जाणार नाही.
असे कोणतेही नुकसान जे आपघातामुळे झाले नसेल (उदा. अपघातानंतर जर नादुरुस्त टू-व्हिलर चुकीच्या पद्धतीने वापरली आणि त्यामुळे इंजिन खराब झाले तर त्याची भरपाई मिळणार नाही)
कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा कारणीभूत असेल तर (उदा. पुरामधे टू-व्हिलर चालवणे उत्पादकाच्या सूचनापत्रकानुसार योग्य नाही. तरीही तसे केल्यास त्यासाठी कव्हर मिळणार नाही)
काही विशिष्ट घटना ॲड-ऑन्सद्वारे कव्हर केल्या जातात. असे ॲड-ऑन्स तुम्ही घेतले नसतील तर त्या संबंधित घटनांसाठी कव्हर मिळणार नाही.
तुम्ही डिजिटचा हिरो बाईक इन्शुरन्स का विकत घ्यावा?
तुमच्या गरजेनुसार बाईक इन्शुरन्स प्लॅन्स
कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स हा बाईक इन्शुरन्सचा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्यात थर्ड पार्टीचे आणि तुमच्या स्वतःच्या बाईकचे नुकसानही भरून दिले जाते.
थर्ड पार्टी | कॉम्प्रिहेन्सिव्ह |
अपघातामुळे टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
|
आग लागल्यास टू-व्हीलर वाहनाचे नुकसान/ हानी |
|
नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर टू-व्हीलरचे नुकसान/ हानी |
|
थर्ड-पार्टीचे नुकसान |
|
थर्ड-पार्टीचे नुकसान |
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
|
तुमची स्कूटर किंवा बाईक चोरी |
|
तुमचे आयडीव्ही कस्टमाइझ करा |
|
कस्टमाइझ ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
क्लेम कसा दाखल कराल?
आमचा टू -व्हीलर इन्शुरन्स प्लॅन घ्या किंवा त्याचे नूतनीकरण करा आणि निर्धास्त रहा, कारण आमची 3-स्टेप्सची क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 वर फोन करा. कोणतेही फॉर्म्स भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लिंक मिळवा. तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानाची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनवर द्या.
स्टेप 3
आमच्या नेटवर्क गॅरेजेसमधून रिएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यांमधला तुम्हाला हवा असणारा दुरुस्तीचा मार्ग निवडा.
हिरो मोटोकॉर्प - कंपनीबद्दल तुम्हाला काय माहिती असायला हवे
डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल जी यांनी 1984 मध्ये स्थापन केलेली हीरो मोटोकॉर्प लिमिटेड पूर्वी हिरो होंडा म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी देशातील सायकल, स्कूटर आणि मोटारसायकलच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे ज्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. आज हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी टू-व्हीलर उत्पादक कंपनी आहे.
भारतात टू-व्हीलर बाजारात या कंपनीचे 46 टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. 1980 च्या दशकात कंपनीने सुरू केलेली वाहने प्रामुख्याने त्यांच्या इंधन कार्यक्षमतेमुळे लोकप्रिय झाली. शिवाय, परवडणाऱ्या किमतींमुळे हिरोच्या डीलरशिपच्या बाहेर बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी झुंबड उडायला लागली.
2010 मध्ये होंडाने हिरोबरोबरच्या संयुक्त उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नंतर होंडाच्या मालकीचे शेअर्स खरेदी करण्याचा आणि स्वतःची उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचा प्रवास सुरू झाला.
सध्या लोकप्रिय अशा हिरो बाईक्स आहेत:
• हिरो स्प्लेंडर प्लस
• हिरो एच.एफ. डिलक्स
• हिरो पॅशन प्रो
• हिरो सुपर स्प्लेंडर
• हिरो एक्स.पल्स 200
• हिरो ग्लॅमर
.. आणि बरेच काही!
गेल्या काही वर्षांत, भारतीय विसंबून राहू शकतात असा एक विश्वासार्ह ब्रँड बनण्यात हिरो यशस्वी झाला आहे.परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या ऑफरसह, हिरोच्या बाईक्स आणि स्कूटर्स प्रत्येक माणसाला काहीतरी ऑफर करतात.
हिरो बाईक्स इतक्या लोकप्रिय कशामुळे झाल्या?
हिरोने ग्राहकांमध्ये आपली लोकप्रियता सतत टिकवून ठेवण्यास यशस्वी होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी काही कारणांच्या यादीवर खाली एक नजर टाका-
• उत्कृष्ट ग्राहक सेवा हे कोणत्याही कंपनीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हिरो कंपनी केवळ ग्राहकांना विक्रीनंतरची उत्तम सेवा देण्याची इच्छा बाळगत नाही तर भारतातील इतर टू-व्हीलर उत्पादकांना प्रेरणा म्हणून काम करते.
• त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील प्रचंड फरक हे त्यांच्या अफाट वाढीचे आणखी एक कारण आहे. विविध आर्थिक पार्श्वभूमीचे ग्राहक त्यांच्या गरजा आणि खर्चाच्या क्षमतेसाठी योग्य उत्पादन शोधू शकतात.
• शेवटी, हिरो ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे ज्याने वर्षानुवर्षे आपली गुणवत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे. जेव्हा तुम्ही त्यांची एक बाईक विकत घेता, तेव्हा तुम्ही त्यांच्या ऑन-रोड परफॉर्मन्स आणि टिकाऊपणाबद्दल खात्री बाळगू शकता.
या ब्रँडची प्रचंड लोकप्रियता निर्माण करणारी ही काही कारणे असली, तरी जास्त वैशिष्ट्ये असलेल्या उत्पादनांमुळेच हिरोच्या ग्राहक संख्येत सातत्याने वाढ झाली.
हिरो टू-व्हीलरकडून तुम्ही अपेक्षा करू शकता अशी वैशिष्ट्ये
आपले बजेट काहीही असो, हिरोची विविध प्रकारची उत्पादने कार्यक्षमतेने तुमच्या गरजा पूर्ण करू शकतात. कंपनी त्यांच्या वाहनांसोबत ऑफर केलेल्या वैशिष्ट्यांशी तडजोड करत नाही.
तुम्हाला असे वाटते का की सर्वोत्तम वैशिष्ट्ये केवळ उच्च दर्जाच्या स्कूटर आणि दुचाकींपुरती मर्यादित आहेत? तर, पुन्हा विचार करा.
सर्व हिरो टू-व्हीलरसाठी येथे काही सामान्य वैशिष्ट्ये दिली आहेत:
• विश्वासार्हता - जेव्हा भारतीय बाजारपेठेचा विचार केला जातो, तेव्हा बाईकचे मायलेज आणि इंजिनची गुणवत्ता हे त्याचे दोन सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. लोकप्रिय स्प्लेंडर आणि पॅशन मॉडेल्ससह हिरोच्या बाईक, सर्वोत्तम ऑन-रोड मायलेज प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे मालकासाठी इंधन खर्च कमी होतो.
• टिकाऊपणा- बहुतेक सामान्य लोकांना टू-व्हीलर परवडण्यासाठी पैसे वाचवणे आवश्यक आहे. खरेदीनंतर वाहनाचे कोणतेही नुकसान होणे, म्हणजे बहुतेक खरेदीदारांना एक विनाशकारी धक्का असू शकतो. किंमत कमी ठेवण्यासाठी हिरो आपल्या बाईकच्या भागांच्या गुणवत्तेशी तडजोड करत नाही. यामुळे याचे डिझाइन्स मजबूत असतात जे विनाशकारी नुकसान न करता सहजपणे किरकोळ ठोकर किंवा क्रॅशेस सहन करू शकतात.
• उत्पादन विविधता - हिरो आपल्या उत्पादनांसह फक्त विशिष्ट आर्थिक वर्गाची पूर्तता करत नाही. त्याऐवजी, सुरुवातीपासूनच कंपनीने बाईक आणि स्कूटरची परवडणारी श्रेणी तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते त्यांच्या वाहनांचे प्रीमियम किंवा लक्झरी व्हेरिएंटदेखील प्रदान करतात, परंतु कंपनी काटेकोरपणे ‘अफोर्डेबल -टू-ऑल’ किंमत धोरणाचे अनुसरण करते.
• तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून नवलाई - त्यांच्या वाहनांमध्ये नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करण्याच्या बाबतीत कंपनी अग्रेसर आहे. उदाहरणार्थ, हिरोने अलीकडेच प्रीमियम रेंज स्पोर्ट्स बाईक एक्स्ट्रीम 200 एस प्रदर्शित केली. आणखी एक मनोरंजक उत्पादन म्हणजे एक्स.एफ.३.आर, जी लोकप्रिय व्हिडिओ गेम स्ट्रीट फायटरवर आधारित डिझाइन संकल्पना आहे.
मात्र, भारतीय रस्ते अपघात आणि इतर धोक्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने, वर नमूद केलेली कोणतीही वैशिष्ट्ये अशा रस्ते दुर्घटनांच्या परिस्थितीत आपल्या प्रिय हिरो वाहनाच्या संरक्षणासाठी पुरेशी नाहीत.
अशा अचानक आलेल्या लायॅबिलिटीपासून तुमच्या आर्थिक संरक्षणाची इच्छा असल्यास हिरो बाइक इन्शुरन्स योजनेची निवड करणे अनिवार्य आहे.
तुम्ही हिरो बाईक इन्शुरन्स का विकत घेणे आवश्यक आहे?
तुम्हाला असे वाटते का की आपण कोणत्याही इन्शुरन्स संरक्षणाशिवाय तुम्ही बाइक चालवू शकता? खरे तर, कायदेशीरदृष्ट्या सांगायचे तर, तुम्ही असे करू शकत नाही.
• कायदेशीर लायॅबिलिटीज– 1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व मोटार चालित वाहनांसाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणे अनिवार्य आहे. वैध इन्शुरन्स शिवाय पकडलेली बाईक किंवा स्कूटर किंवा इतर वाहन असलेली कोणतीही व्यक्ती दंड भरण्यास जबाबदार असते. मोटार वाहन (दुरुस्ती) कायदा 2019 अंतर्गत, इन्शुरन्स पॉलिसीशिवाय वाहन चालवण्यासाठी 2000 रुपये आणि वारंवार केलेल्या गुन्ह्यासाठी 4000 रुपये दंड होऊ शकतो.
कायदेशीर लायबिलिटीज व्यतिरिक्त, बाइक इन्शुरन्स पॉलिसी निवडणे महत्वाचे का आहे याची काही कारणे खाली दिली आहेत :
• थर्ड-पार्टी प्रॉपर्टीला झालेल्या नुकसानीसाठी रिएम्बर्समेंट क्लेम करा – थर्ड-पार्टी हिरो मोटोकॉर्प इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला तुमच्या वाहनाशी संबंधित अपघातांमुळे उद्भवलेल्या नुकसानीचा क्लेम करण्यास अनुमती देतात. ही आर्थिक मदत दुसऱ्या पार्टीच्या वाहन किंवा मालमत्तेचे झालेल्या कोणत्याही नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी असले, तरी अपघात झाल्यास आपल्या कायदेशीर लायॅबिलिटीवर मर्यादा येते. थर्ड-पार्टीच्या मालमत्तेचे झालेल्या आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त, अशा इन्शुरन्स प्लान मध्ये अपघातात जखमी झालेल्या कोणत्याही थर्ड-पार्टीला आणि मृत्यूच्या बाबतीतही समान आर्थिक मदत दिली जाते.
• स्वत:च्या बाईकच्या झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदतीचा क्लेम करा- जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह हिरो बाईक इन्शुरन्स पॉलिसी निवडली, तर अपघात किंवा रस्ते अपघातांमुळे आपल्या बाइकला झालेल्या नुकसानीचा सामना करण्यासाठी आपण आर्थिक मदतीचा क्लेम करू शकता. अशा पॉलिसींमुळे थर्ड-पार्टी आणि स्वत:च्या नुकसानीसाठी कव्हरेज वाढते. अपघातांव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती, आग, स्फोट, नुकसान, चोरी आणि इतर गोष्टींव्यतिरिक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हरच्या कव्हरेजखाली येतात.
• एकूण नुकसान किंवा वाहन चोरीच्या बाबतीत इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) वसूल करणे - काही परिस्थितीत, दुरुस्तीच्या पलीकडे हिरो बाईकचे नुकसान होऊ शकते. कदाचित, कोणीतरी तुमची बाईक चोरू शकते. अशावेळेस, जर तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर असेल, तर तुम्ही तुमच्या वाहनासाठी इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूचा लाभ घेऊ शकाल. आयडीव्ही म्हणजे हिरो टू-व्हीलरची सध्याची किंमत वजा त्याचे डिप्रिसिएशन. विमा धारक दुचाकीचे एकूण नुकसान किंवा चोरी झाल्यास आपली विमा कंपनी तुम्हाला आयडीव्ही रक्कम देण्यास जबाबदार आहे.
• वैयक्तिक अपघात कव्हर - विमाधारक वाहनाच्या अपघातामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याचे/तिच्या कुटुंबातील सदस्य इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. हा लाभ इन्शुरन्स पॉलिसीसह अनिवार्य वैयक्तिक अपघात ॲड-ऑन कव्हर अंतर्गत दिला जातो.
काही इन्शुरन्स कंपन्या बाईक मालक जिवंत असल्यास परंतु अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आल्यास समान आर्थिक मदत देखील देऊ शकतात.
हे संरक्षण पूर्वनिर्धारित मुदतीनंतर संपते हे लक्षात ठेवा. संरक्षण चालू राहील याची खात्री करण्यासाठी आपल्याला पी.ए कव्हर ॲड-ऑनसह हिरो बाईक इन्शुरन्सचे रिन्यूअल करणे आवश्यक आहे.
तुम्ही सध्याच्या इन्शुरन्स कंपनीवर नाराज आहात का ? तुम्ही कोणत्याही वेळी इन्शुरन्स कंपन्या बदलू शकता हे तुम्हाला माहिती आहे का?
तुमच्या सध्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून असलेले विविध फायदे आणि वैशिष्ट्ये यांची तुलना करा. जर तुम्हाला एखादा पैलू कमी वाटत असेल, तर डिजिटच्या टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅन्सकडे लक्ष द्या.
तुम्ही डिजिटचा हिरो बाईक इन्शुरन्स का निवडावा?
हिरो बाईक इन्शुरन्स प्लॅन शोधणाऱ्या व्यक्तींना डिजिटबद्दल आधीच माहिती असू शकते. सर्वात वेगाने वाढणारी सामान्य विमा कंपन्यांपैकी एक असलेली डिजिट कंपनी टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते जी कार्यक्षमतेने आर्थिक संरक्षण देऊ शकते. डिजिटमधून इन्शुरन्स खरेदी करताना तुम्ही कधीही चुकीचे होऊ शकत नाही याच्या काही कारणांची यादी खाली दिली आहे:
• उत्पादनांची व्यापक निवड – डिजिट हीरो टू-व्हीलर मालकांना त्यांना हव्या असलेल्या कव्हरेजच्या प्रकारानुसार खालील इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते.
1. a) थर्ड-पार्टी लायॅबिलिटी बाईक इन्शुरन्स - या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुमच्या बाईकमुळे थर्ड-पार्टी वाहन किंवा मालमत्तेच्या नुकसानीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा समावेश आहे. हे कोणत्याही शारीरिक इजा किंवा तृतीय पक्षाच्या मृत्यूसाठी कव्हरेज देखील प्रदान करते.
2. b) कॉम्प्रिहेन्सिव्ह बाईक इन्शुरन्स - तुमच्या दुचाकी किंवा स्कूटरसाठी ही एक अष्टपैलू संरक्षण योजना आहे. अशी पॉलिसी तुमच्याकडे असताना, तुम्ही स्वत:च्या नुकसानीचा क्लेम करू शकता, तसेच अपघातांमध्ये दुसऱ्या पक्षाने केलेल्या नुकसानीसाठीही क्लेम करु शकता. शिवाय, नैसर्गिक आपत्ती, दंगली किंवा इतर कारणांमुळे दुचाकीचे नुकसान झाल्यास या प्लॅनमुळे आपले आर्थिक लायॅबिलिटी कमी होते.
या सामान्य पर्यायांव्यतिरिक्त, डिजिटच्या यादीत ग्राहकांसाठी ओन डॅमेज बाईक इन्शुरन्स पॉलिसीदेखील आहे. असा प्लॅन ज्यांना आधीच दीर्घकालीन थर्ड-पार्टी पॉलिसी आहे आणि केवळ त्यांच्या स्वत: च्या वाहनासाठी आर्थिक लायॅबिलिटी संरक्षण शोधत आहेत त्यांना लागू होतो. तथापि, तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की हे कव्हर सप्टेंबर 2018 नंतर आपण आपली हिरो बाईक खरेदी केली असेल तरच उपलब्ध आहे.
• नेटवर्क गॅरेजची संख्या जास्त - तुम्ही डिजिट अंतर्गत नेटवर्क गॅरेजला भेट देऊन कॅशलेस इन्शुरन्स क्लेम्सचा लाभ घेऊ शकता. सुदैवाने, इन्शुरन्स कंपनीकडे संपूर्ण भारतात त्याच्या नेटवर्कमध्ये 1000 हून अधिक गॅरेजेस आहेत. त्यामुळे तुम्ही देशात कोठेही असलात तरी नेटवर्कमधील गॅरेज शोधणे सोपे जाते. फक्त एका नेटवर्क गॅरेजला भेट द्या आणि एकही पैसा खर्च न करता तुमच्या बाईकची दुरुस्ती पूर्ण करा.
•साधी खरेदी आणि रिन्यूअल प्रक्रिया– डिजिटमुळे हिरो बाईक इन्शुरन्सची ऑनलाइन खरेदी सुलभ होते. तुम्हाला फक्त काही तपशील भरणे, तुमचे इच्छित कव्हरेज निवडणे आणि ईमेलद्वारे इन्शुरन्स पॉलिसी प्राप्त करण्यासाठी देयके देणे आवश्यक आहे. अशा विनाअडथळा ऑनलाइन खरेदी/रिन्यूअलमुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होते आणि ब्रोकर किंवा इन्शुरन्स एजंटची सेवा घेण्याची गरजही पडत नाही.
• तुमच्या गरजेनुसार आयडीव्ही (IDV) कस्टमाइज करा – आयडीव्ही किंवा इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू ही तुमच्या वाहनाचे संपूर्ण नुकसान किंवा हानी झाल्यावर तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडून मिळवू शकता. ही रक्कम तुमच्या हिरो बाईकचे डिप्रिसिएशन त्याच्या उत्पादकाने ठरवलेल्या किमतीतून वजा करून मोजली जाते. आता, डिप्रिसिएशनचे गणित एका कंपनीपासून दुसऱ्या कंपनीनुसार बदलते. डिजिटसह तुम्ही जास्त आयडीव्हीचा आनंद घेऊ शकता आणि तुमचे फायदे जास्तीत जास्त करण्यासाठी ते कस्टमाइझ करण्याची संधी देखील घेऊ शकता.
• नो क्लेम बोनससह (NCB) तुमचा प्रीमियम कमी करा – तुमच्या टू-व्हीलरवर काळजीपूर्वक स्वार होण्याचा एक फायदा म्हणजे तुम्ही रस्त्यांवरील दुर्घटनांची शक्यता कमी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्याची शक्यता देखील कमी करता. जर तुम्ही तुमच्या हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स अंतर्गत क्लेम केले नाहीत, तर डिजिट तुम्हाला नो क्लेम बोनसचा लाभ देईल. या फायद्यासह तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी देय प्रीमियमवर पुढच्या वर्षात सूट मिळवू शकाल. हे एनसीबी 50% पर्यंत असू शकते (क्लेम न करण्याच्या वर्षांच्या संख्येनुसार), तुम्हाला तुमच्या प्रीमियमचा एक मोठा भाग वाचविण्याची मदत करू शकते.
• सुलभ क्लेम प्रक्रिया आणि क्लेम सेटलमेंटचे प्रमाण जास्त - डिजिटने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करुन पॉलिसीधारकांसाठी क्लेम करण्याची चांगली व्यवस्था केली आहे. डिजिटसह, तुम्ही स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन प्रक्रियेचा आनंद घेऊ शकता आणि क्लेम दाखल करताना तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या एजंटद्वारे तुमच्या हिरो टू-व्हीलरची तपासणी करण्याचा त्रास दूर करू शकता. शिवाय, बाईक इन्शुरन्स पॉलिसी घेताना तपासणी करण्यासाठी क्लेम सेटलमेंटचे प्रमाण हा एक महत्त्वाचा घटक आहे. डिजिटमध्ये क्लेम सेटलमेंटचे प्रमाण जास्त असल्याने तुम्ही तुमचा क्लेम नाकारण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता.
• विविध ॲड-ऑन्स आणि रायडर्सची उपलब्धता – स्टँडर्ड पॉलिसिस काही बाईकच्या भागांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देत नाहीत. उदाहरणार्थ, जर तुमच्या इंजिनला नुकसान झाले आहे, तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स प्लॅनअंतर्गत त्याच्या दुरुस्तीसाठी कव्हरेजचा क्लेम करू शकत नाही. डिजिट ग्राहकांना त्याच्या ॲड-ऑन्स आणि रायडर्ससह सर्वांगीण कव्हरेजचा व्यापक स्कोप देते. काही लोकप्रिय ॲड-ऑन सुरक्षा उपायांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
• a) इंजिन आणि गिअर संरक्षण कव्हर
• b) झिरो डिप्रिसिएशन कव्हर
• c) ब्रेकडाऊन असिस्टन्स
• d) रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर
• e) कन्झ्युमेबल कव्हर
सर्व बाबतीत आपल्या आर्थिक परिस्थितीचे खऱ्या अर्थाने संरक्षण करण्यासाठी, तुम्ही उपयुक्त ॲड-ऑन संरक्षणाचा लाभ घ्याल याची खात्री करा.
• विश्वासार्ह ग्राहक सेवा (Dependable Customer Service) - अपघात आणि इतर दुर्घटना कधीही होऊ शकतात. त्यामुळेच इन्शुरन्स कंपनी देत असलेल्या सेवांचा लाभ घेणे समर्पक आहे जी त्याच्या ग्राहकांसाठी नेहमी उपलब्ध असते, मग ते दिवस असो किंवा रात्र. डिजिटचे 24x 7 कस्टमर केअर असिस्टन्स हे सुनिश्चित करते की मदत केवळ फोन कॉलच्या अंतरावर आहे.
तुम्हाला अपघाताची माहिती द्यायची असेल किंवा तुमच्या पॉलिसी संदर्भात प्रश्न विचारायचा असेल, तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी समर्पित आहे.
पण, राष्ट्रीय सुट्टीवर कोणीही काम करत नाही, बरोबर ? चुकीचे. सुट्टीच्या दिवशीही आपण डिजिटच्या ग्राहक सेवेपर्यंत पोहोचू शकता.
तर, आजच तुमचा हिरो बाईक इन्शुरन्स खरेदी करा!
परंतु तुम्हाला चिंता आहे की इन्शुरन्स प्रीमियम खूप जास्त आहेत ? ठीक आहे, त्यासाठीही आमच्याकडे एक उपाय आहे.
हिरो टू-व्हीलर इन्शुरन्सचा प्रीमियम प्रभावीपणे कमी करणे
जर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी देय प्रीमियमचा विचार करत असाल, तर तुम्ही तुमचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी खालील पद्धती वापरू शकता -
• नो क्लेम बोनस (NCB) लाभाचा आनंद घ्या - तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला नो क्लेम बोनसचा लाभ देत असल्याची खात्री करा. तसेच क्लेम करण्याची गरज कमी करून, तुमच्या प्रीमियमची रक्कम कमी करून तुम्ही एनसीबी लाभ घेऊ शकता याची खात्री करा.
• व्हॉलंटरी डीडक्टीबल्सची निवड करा - व्हॉलंटरी डीडक्टीबल्सचा समावेश असलेली पॉलिसी निवडा. अशा पॉलिसी तुम्हाला इन्शुरन्स कंपन्यांकडून आर्थिक मदत सुरू होण्यापूर्वी क्लेमचा काही भाग भरण्याची संधी देतात. त्यानंतर, पॉलिसीचा देय प्रीमियम कमी होतो.
• तुमचा प्लॅन थेट इन्शुरन्स कंपनीकडून खरेदी करा - इन्शुरन्स कंपनीकडून थेट प्लॅन खरेदी करा. एजंट आणि दलाल यांसारखे मध्यस्थ त्यांच्या सेवेसाठी कमिशन आकारतात. या अतिरिक्त खर्चामुळे तुमचा हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स प्रीमियम मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
• तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या ॲड-ऑन्सचा लाभ घ्या - फक्त आवश्यक ॲड-ऑन्स कव्हर निवडा. अतिरिक्त संरक्षण नेहमीच इष्ट असले, तरी उपलब्ध प्रत्येक रायडरची आंधळेपणाने खरेदी करणे ही चूक आहे. त्याऐवजी, वैयक्तिक गरजांवर आधारित रायडर्स निवडा. उदाहरणार्थ, जर आपण पूरग्रस्त भागात राहत असाल, तर इंजिन संरक्षण ॲड-ऑन कव्हरेज निवडा.
केवळ प्रीमियमवर आधारित प्लॅन्स कधीही निवडू नका. त्याऐवजी, तुमच्या हिरो बाईकचे नुकसान झाल्यास पुरेशी आर्थिक मदत देणाऱ्या टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रत्येक पैलूचा विचार करा.
हिरो स्कूटर आणि बाईक या मौल्यवान मालमत्ता आहेत. जर आपण त्यांची काळजी घेतली, तर ते कोणत्याही समस्यांशिवाय एक दशकापर्यंत टिकू शकतात. हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स कव्हर तुम्हाला तुमच्या दुचाकीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास मदत करते!
भारतातील हिरो बाईक इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
माझ्या हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यासाठी मला माझ्या इन्शुरन्स कंपनीला अपघाताबद्दल माहिती देण्याच्या मुदतीचा कालावधी किती आहे?
बहुतेक प्रकरणांमध्ये इन्शुरन्स कंपन्या 7 दिवसांचा कालावधी प्रदान करतात. ज्यादरम्यान पॉलिसीधारक त्यांना टू-व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यासाठी अपघाताबद्दल माहिती देऊ शकतो. तथापि, काही इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या पॉलिसीधारकांना अपघाताची माहिती देण्यासाठी 24 ते 48 तासांची मुदतदेखील प्रदान करतात.
नो क्लेम बोनसचा (NCB) लाभ घेण्यासाठी मला माझ्या हिरो टू-व्हीलर इन्शुरन्स प्लॅनचे रिन्यूअल किती लवकर करावे लागेल ?
सामान्यत: मुदत संपलेल्या पॉलिसीचे रिन्यू्अल ९० दिवसांच्या आधी होणे आवश्यक आहे. या कालावधीनंतर, तुम्हाला नो क्लेम बोनसचा लाभ घेता येत नाही.
माझ्या हिरो बाईक/स्कूटरचा प्रीमियम कोणत्या घटकांवरून ठरतो ?
कोणतीही इन्शुरन्स देणारी कंपनी चार्जेबल प्रीमियमच्या बाबतीत खालील बाबींचा विचार करते.
• वाहनाचे वय.
• मॉडेल प्रकार.
• भौगोलिक क्षेत्र.
• इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV).
• बाईकच्या इंजिनची क्युबिक कॅपॅसिटी.