पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर
मोटार इन्शुरन्समधील पीए इन्शुरन्स म्हणजे काय?
अपघात अश्या घटना आहेत ज्यामुळे गंभीर नुकसान होते आणि शारीरिक दुखापतींमुळे कधीकधी जीवही जाऊ शकतो. अशा या गोष्टी ज्यांच्यामुळे केवळ आर्थिक ताणच नव्हे तर भावनिक हाहाकारही निर्माण होतो, या घटनांना कोण बारे बळी पडू इच्छितो ?
इन्शुरन्स पॉलिसी, मग ती मोटार इन्शुरन्स असो किंवा पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर ते एखाद्याचे आर्थिक तसेच इतर पर्सनल नुकसानांपासून संरक्षण करते. मोटार इन्शुरन्समधील पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी कव्हर ही मालक-ड्रायव्हरसाठी एक सुविधा आहे. ती मोटार पॉलिसी अंतर्गत वाहनाच्या मालकाने घेतलेला एक अनिवार्य लाभ आहे, मग तुम्ही सर्वसमावेशक पॅकेज किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी पॉलिसीची निवड करत असलात तरीही.
मोटार इन्शुरन्स अंतर्गत अनिवार्य पीए पॉलिसी वाहन मालकाच्या नावाने जारी केली जाते. जर त्यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरच तो/ती कव्हरसाठी पात्र आसतील. तुमच्याकडे पीए कव्हर नसल्यास, तुम्ही तुमचा कार इन्शुरन्स किंवा दुचाकी इन्शुरन्स खरेदी करता तेव्हा तुम्ही ते निवडू शकता..
पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरमध्ये काय काय समाविष्ट आहे?
मोटार इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत पीए कव्हर शारीरिक जखम, मृत्यू किंवा अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास नुकसान भरपाईसाठी पैसे देईल. IRDAI नुसार भरपाई रक्कम ची लिमिट Rs. 15 लाख एवढी आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत भरलेल्या भरपाईची टक्केवारी पुढे देत आहे:
अपघाती मृत्यू- रस्ता अपघातामुळे अचानक मृत्यू झाल्यास इन्शुरन्स कंपनी नॉमिनीला संपूर्ण इन्शुरन्सची रक्कम देईल.
कायमचे अपंगत्व आल्यास- कायमचे अपंगत्व आल्यास भरपाई रक्कम पुढील प्रमाणे राहील :
कव्हरेज | भरपाईचे % |
---|---|
मृत्यू | 100% |
2 अवयव गमावणे किंवा 2 डोळे / 1 अवयव / 1 डोळा | 100% |
1 डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा 1 अवयव | 50% |
कायमचे एकूण अपंगत्व | 100% |
पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर महत्वाचे का आहे?
जेव्हा मानवांना धोका जाणवतो, तेव्हा ते अशी योजना तयार करता जी त्यांना वाचवेल. दिवसभर जवळपास सर्वच भागांमध्ये खराब वाहतूक आणि घाईघाईने वाहने रस्त्यावर येण्यामुळे वाहन चालवणे तणावपूर्ण बनते. परंतु ते क्षण देखील सामान्य असतात जेव्हा तुमची कोणतीही चूक नसतानाही तुम्हाला दणका बसतो आणि गंभीर नुकसान सहन करावे लागते.
कल्पना करा एक वेगवान ट्रक कार ला धडक देऊन ड्रायवर ला इज पोचवते. या दरम्यान होणाऱ्या नुकसानाची तीव्रता भयावह असू शकते, आणि बऱ्याचदा अश्या अपघातात जीव देखील जाऊ शकतो. अशा अनेक अनपेक्षित घटनांमुळे जीवितहानी किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते. आणि जेव्हा आपल्याला माहित आहे की अशा घटनांची संभाव्यता नाकारली जाऊ शकत नाही, तेव्हा पीए कव्हर खरेदी करणे अधिकच आवश्यक बनते.
मोटार इन्शुरन्स अंतर्गत, पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर महत्त्वाचा असतो कारण हा कव्हर सर्व प्रकरणांमध्ये मालक-ड्रायव्हरला जास्तीत जास्त आर्थिक मदत देतो. विशेषत: जेव्हा व्यक्तीच्या कमाई क्षमतेवर याचा परिणाम होतो तेव्हा पॉलिसी अधिक महत्त्वपूर्ण वाटते.
पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर असणे अनिवार्य आहे का?
मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत, केवळ Third-Party Liability कव्हर अनिवार्य होते. यामध्ये शारीरिक इजा किंवा मालमत्तेच्या नुकसानीसाठी नोंदवलेले क्लेम्संच्या प्रकाराचे प्रमाण जास्त होते. टीपी क्लेम्संव्यतिरिक्त, मालक-चालकांच्या प्रकरणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नंतर, मोटार मालकांना पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले. कव्हरमागील हेतू हा होता की अपघातामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसान आणि जखमांसाठी मालकाला भरपाई चा फायदा व्हावा.
परंतु जानेवारी 2019 पासून, मोटर इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत अनिवार्यपणे पीए कव्हर खरेदी करण्याचे हे वैशिष्ट्य थोडेसे बदलले आहे. पुढील दोन अटी हा बदल समजवतात:
- हे सूचित करते की जर वाहनाच्या मालकाची रु. 15 लाख इन्शुरन्स रक्कम असलेली स्टँड-अलोन अॅक्सिडेंट पॉलिसी असेल, तर तिला/त्याला या कव्हरसाठी सूट दिली जाऊ शकते.
- या कव्हर अंतर्गत दुरुस्तीचा अर्थ असा आहे की जर एखाद्या वाहनाच्या मालक-ड्रायव्हरकडे त्याच्या सध्याच्या कार किंवा दुचाकीसाठी पीए पॉलिसी असेल, तर त्याच्यासाठी नवीन वाहन खरेदी करणे महत्त्वाचे नाही.
पीए कव्हर हे अनिवार्य आहे आणि Comprehensive Package Policy किंवा Third Party Liability Policy च्या पॉलिसीसह एकत्रित केले आहे.
पर्सनल अॅक्सिडेंट कव्हराचे फायदे?
जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडत असतात जसे की अपघात. म्हणून, आपल्याला स्टँडअलोन कव्हर व्यतिरिक्त पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी असणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती मोटर पॉलिसी अंतर्गत पीए कव्हर देखील खरेदी करू शकते. हे पुढे असलेल्या काही फायद्यांसह येते:
क्लेम कसे करावे?
पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी अंतर्गत क्लेम - मोटर इन्शुरन्सचा एक भाग आहे. संबंधित चारचाकी अथवा दोन चाकीवाहनाचे मालक-चालक या व्यक्तिकडून क्लेम केला जाऊ शकतो. नॉमिनी किंवा हयात असलेल्या मालकाला जास्तीत जास्त फायदे मिळावेत (पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे) हे पॉलिसीचे उद्दिष्ट आहे.
मालक-ड्रायव्हर जखमी झालेल्या अपघातादरम्यान पीए कव्हरचे फायदे पुनर्प्राप्त करण्यासाठी, आपणास क्लेम (File Claim) दाखल करणे आवश्यक आहे. क्लेम तयार करण्यासाठी खालील सूचना आहेत:
मालक-चालकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी क्लेम दाखल करेल. तिला/त्याला पॉलिसीनुसार क्लेम्सची रक्कम दिली जाईल.
मोटार इन्शुरन्समधील पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
टू-व्हीलरसाठी पीए कव्हर अनिवार्य आहे का?
होय, सर्व दुचाकी वाहनांसाठी पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर अनिवार्य आहे. तेच तुमच्या दुचाकी इन्शुरन्स पॉलिसीसह खरेदी केले जाऊ शकते.
माझ्या नावावर दोन दुचाकी आहेत, मला 2 पीए कव्हर्स घेणे आवश्यक आहे का?
नाही, फक्त एक पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर असणे आवश्यक आहे. पीए कव्हर तुमच्याशी एक व्यक्ती म्हणून संबंधित आहे, तुमच्या वाहनाशी नाही.
माझ्या नावावर कार आणि बाइक आहे, मला दोन्ही वाहनांसाठी स्वतंत्रपणे पीए कव्हर घेण्याची आवश्यकता आहे का?
नाही, एक पीए कव्हर पुरेसे आहे कारण तुमचे पीए कव्हर तुमच्या वाहनाशी संबंधित नसून एक व्यक्ती म्हणून तुमच्याशी संबंधित आहे.
पीए कव्हर फक्त मालक-ड्रायव्हरसाठी लागू आहे का?
होय, पीए कव्हर फक्त ड्रायवर व मालकासाठी आहे.