बंपर टू बंपर इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

बंपर टू बंपर कार इन्शुरन्स कव्हर

कल्पना करा! अनेक महिने नियोजन, बजेट, चौकशी, चर्चा यानंतर शेवटी तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्याचा निर्णय घेता. काही काळ उत्सुकतेने वाट पाहिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नवीन कारची चावी दिली जाते, तुम्ही ड्रायव्हरच्या सीटवर बसून गाडी हातात घेता आणि इतक्यात...... रस्त्यात एखाद्या भयंकर अपघाताचा आवाज येतो, या धक्क्यातून सावरून जेव्हा तुम्ही गाडीच्या बाहेर येता तेव्हा तुम्हाला लगेच दुसरा धक्का बसतो तो म्हणजे कोणत्या तरी गाडीने येऊन तुमच्याच गाडीला टक्कर दिली आहे. तुमची शोरूममधून नुकतीच बाहेर आलेली गाडी क्षणार्धात... नाही नाही! आम्हाला तर यापुढे विचारही करताना त्रास होतोय. पण दुर्दैवाने असं काही घडलंच तर त्या प्रसंगामध्ये आपलं रक्षण करण्यासाठी बंपर टू बंपर इन्शुरन्स सज्ज आहे, तुमची नवीन कार कोणत्याही नुकसानाशिवाय पुन्हा अगदी नवी कोरी होऊन मिळेल!

बंपर टू बंपर इन्शुरन्स म्हणजे काय?

बंपर टू बंपर कव्हर सामान्यत: थोड्या अतिरिक्त प्रीमियमसह सर्वसमावेशक कार इन्शुरन्स पॉलिसीसह 'अ‍ॅड-ऑन' म्हणून येते. बंपर टू बंपर कव्हर म्हणजे काय ते आधी समजून घेऊ.

 

बरं, सामान्य शब्दात हे कार इन्शुरन्स ॲड-ऑन आहे जे तुमच्या कारच्या विशिष्ट इंजिनचे नुकसान, टायर, बॅटरी आणि काच यांचे नुकसान झाल्यास कव्हर करते. हा तुमचा सुपरहिरो आहे जो तुमच्या कारच्या नियमित कार इन्शुरन्स पॉलिसीच्या व्यतिरिक्त, कारच्या नुकसानीच्या दुर्दैवी घटनेत १०० % कव्हरेज देत तुमच्या कारची काळजी घेतो.

याला झिरो डिप्रीसिएशन कार  इन्शुरन्स असेही म्हणतात. याचे कारण असे की ते विमा संरक्षणातून घसारा  (डिप्रीसिएशन) सोडून संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित करते.

हे कव्हर भारतात २००९ मध्ये सादर करण्यात आले होते. तेव्हापासून ही योजना बर्‍याच कार मालकांसाठी वरदान सिद्ध झाली आहे. याचा फायदा पुढील लोकांना होऊ शकतो :

  • नवीन कार मालक किंवा ज्यांना कार घेऊन ५ वर्षांपेक्षा कमी वर्ष झाली आहेत
  • नवीन किंवा अननुभवी ड्रायव्हर्स
  • महागड्या सुट्या भागांसह उच्च श्रेणीतील लक्झरी सुपरकारचे मालक
  • ज्या भागात अनेकदा अपघात होतात त्या भागात/जवळ राहणारे मालक
  • जर तुम्ही अगदी लहान डेंट्स आणि अडथळ्यांबद्दल चिंतित असाल

हे विशेषत: नवीन कार मालकांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यांना त्यांच्या नव्या कारवर अगदी लहानसा  स्क्रॅच आला असला तरी चिंता वाटते आणि ज्यांना दुर्मिळ, महाग स्पेअर पार्ट्ससह उच्च श्रेणीतील महागड्या कार घेणे आवडते. या मालकांना जेव्हा १००% कव्हरेजसाठी अतिरिक्त प्रीमियम भरण्यास सांगितले जाते तेव्हा त्यांना कारच्या संरक्षणासाठी ही ॲड - ऑनची किंमत अगदी किरकोळ वाटते.

वापरा: बंपर टू बंपर कव्हरसह कार इन्शुरन्सच्या प्रीमियमची गणना करण्यासाठी कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटर

तुलना करा: बंपर टू बंपर कव्हरसह आणि कव्हरशिवाय सर्वसमावेशक धोरण

Compare: Comprehensive Policy with and without Bumper to Bumper Cover

बंपर टू बंपर कव्हरसह बंपर टू बंपर कव्हरशिवाय
झिरो डिप्रीसिएशन सह १००% कव्हरेज प्रदान करते डिप्रीसिएशन नंतर कव्हरेज प्रदान करते
थोडे जास्त प्रीमियम स्टँडर्ड पॉलिसी प्रीमियम
यामध्ये ५ वर्षे जुनी किंवा त्यापेक्षा जास्त जुनी वाहने समाविष्ट नाहीत जुनी वाहने समाविष्ट

मात्र  तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक कार पॉलिसीसह बंपर टू बंपर ॲड-ऑन निवडता तेव्हा तुम्ही थोडे जास्त प्रीमियम भरता पण अशावेळी ड्रायव्हिंग करताना चिंता विरहित राहण्याचे जे सुख आहे त्या तुलनेत हे प्रीमियम अगदी क्षुल्लक आहे. हो ना?

बंपर टू बंपर विमा निवडण्यापूर्वी पुढील घटकांचा विचार करा

क्लेम्सची संख्या: एका वर्षात आपण इन्शुरन्स मिळवण्यासाठी किती दावे(क्लेम) करू शकता याची मर्यादा इन्शुरन्स कंपनी ठरवते. त्यामुळे तुमची इन्शुरन्स कंपनी किती क्लेमची संख्या करण्याची परवानगी देते हे तपासणे महत्त्वाचे आहे.

खर्च: बंपर टू बंपर हा उच्च प्रीमियमसह येतो. कारण यात डिप्रीसिएशन विचारात न घेता संपूर्ण कव्हरेज दिले जाते. सर्वसमावेशक पॉलिसीपेक्षा अधिक प्रीमियम आकारले जाते.

नवीन कारसाठी उपलब्ध: हे प्रामुख्याने नवीन आणि ५ वर्षांपर्यंतच्या कारसाठी उपलब्ध आहे.

बंपर टू बंपर कार इन्शुरन्सचे फायदे

जर तुमच्या वाहनासाठी आपण सामान्य इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल आणि तुमच्या कारला सुमारे १५००० रुपयांचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही तुमच्या खिशातून सुमारे ५०% रक्कम सहज काढता आणि उरलेली रक्कम तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये घसाऱ्यानुसार (डिप्रीसिएशननुसार) म्हणजेच खराब झालेल्या भागांच्या अवमूल्यांकनासह बाजार मूल्य मिळाल्यानंतर कव्हर केली जाते. 

  • फायबरग्लास घटक-३०% घसारा वजावट
  • रबर, प्लास्टिकचे भाग, रबर आणि बॅटरीवर - ५०% घसारा वजावट
  • काचेचे भाग- शून्य

 

हे खूपच निराशाजनक आहे आणि त्यामुळेच नियमित वाहन विम्याच्या तुलनेत बंपर-टू-बंपर कव्हर लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. डिजिट इन्शुरन्ससारख्या विश्वासार्ह विमा कंपन्या त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी सर्वसमावेशक पॉलिसीसह हे ॲड - ऑन कव्हर ऑफर करतात.

आता जर तुमच्या वाहनाचा विमा झिरो डिप्रीसिएशन इन्शुरन्स असेल आणि तुमच्या कारला १५००० रुपयांचे नुकसान झाले असेल, तर तुम्हाला सर्व फायबर, रबर आणि धातूच्या भागांसाठी कोणतेही डिप्रीसिएशन न कापता एकूण (१००%) कव्हरेज मिळेल.

इतर कोणत्याही किफायतशीर ऑफरप्रमाणे, बंपर टू बंपर कव्हर असलेली पॉलिसीदेखील काही मर्यादांसह येते.

बंपर टू बंपर इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट (कव्हर) होत नाही

  • जर तुमच्या वाहनाचे वय ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर ते कव्हरसाठी पात्र असणार नाही
  • वाहनाचा कोणताही बेकायदेशीर सहभाग नोंदवला गेल्यास,  इन्शुरन्स कंपनी तुम्ही केलेल्या क्लेमवर प्रक्रिया करणार नाही
  • खाजगी वाहनाचा व्यावसायिक वापर
  • काही इंजिनचे नुकसान, बॅटरी/टायर/क्लच प्लेट्स/बेअरिंगचे नुकसान
  • कारचे नुकसान होत असताना ड्रायव्हरने ड्रग्ज किंवा मद्यपान केले असल्यास
  • वाहनाची कागदपत्रे अपूर्ण असल्यास
  • जर पॉलिसीच्या कालमर्यादेनुसार दावा केला गेला नाही
  • विमा नसलेल्या जोखमीमुळे नुकसान
  • यांत्रिक बिघाडामुळे नुकसान
  • ॲक्सेसरीज, गॅस किट आणि टायर यांसारख्या वस्तूंचे नुकसान

जेव्हा तुम्ही बंपर टू बम्पर ‘अ‍ॅड -ऑन’ कव्हर निवडता, तेव्हा तुम्ही तुमची मनःशांती निवडता. तुम्ही तुमचे वाहन आणि तुमच्या खिशासाठी अनपेक्षित परिस्थितींपासून व्यापक संरक्षण निवडता. हे एका छत्रीसारखे आहे जे तुम्हाला अनपेक्षित गोष्टीपासून संरक्षण देते. सर्व अनावश्यक खर्चांपासून वाचवते. तुमच्या पॉलिसीसह हे कव्हर निवडून तुमची कार आणि तुमच्या खिशासाठी योग्य निर्णय घ्या.

बंपर टू बंपर इन्शुरन्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही २४ तासांच्या आत अपघाताची तक्रार न केल्यास काय होईल?

तुमच्या इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या वेळेच्या आत अपघाताची त्वरित तक्रार केली पाहिजे. तुम्ही असे न केल्यास  तुमचा कार इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो.

अपघातात माझ्या स्वत:च्या कारचे नुकसान झाल्यास मी बंपर-टू-बंपर इन्शुरन्सचा क्लेम करू शकतो का?

होय, इन्शुरन्समध्ये बंपर-टू-बंपर कव्हर हे सूचित करते की क्लेमच्या पेआउट दरम्यान डिप्रीसिएशन मोजले जाणार नाही. तरीही तुमचे स्वतःचे नुकसान भरून काढले जाईल.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या माझ्या कारला कोणीतरी धडक दिली असेल तर माझ्या नुकसानीसाठी बंपर टू बंपर इन्शुरन्स कव्हर मिळेल का?

होय, तुमच्‍या कार इन्शुरन्समध्ये कारच्या झालेल्या नुकसानानुसार भरपाई मिळते. बंपर-टू-बंपर कव्हर हे सुनिश्चित करते की क्लेम पेआउट दरम्यान डिप्रीसिएशन मोजले जाणार नाही.

कार बंपर कार इन्शुरन्समध्ये कव्हर होते का?

होय, तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स किंवा स्वत:च्या कारचे नुकसान भरून देणाऱ्या इन्शुरन्सची निवड केली असल्यास तुमच्या कारचे बंपर कव्हर केले जाईल.