आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करा
Instant Policy, No Medical Check-ups

जे 1 व्हिसा: पात्रता क्रायटेरिया, प्रकार आणि अर्ज प्रक्रिया

जे 1 व्हिसा एक नॉन-इमिग्रेंट व्हिसा आहे, जो रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी आणि वैद्यकीय पदवीधारकांसाठी लोकप्रिय आहे. असे लोक सहसा अमेरिकेतून विशिष्ट कौशल्ये शिकतात आणि नंतर आपल्या मायदेशी परततात. म्हणूनच, जे 1 व्हिसाबद्दल सर्व काही जाणून घ्या!

चला सुरुवात करूया!

जे 1 व्हिसा म्हणजे काय?

जे 1 व्हिसाअंतर्गत अनेक कॅटेगरी उपलब्ध आहेत. मात्र, ढोबळ मानाने सांगायचे झाले तर हा काम आणि प्रवास या दोन्हींसाठीचा व्हिसा आहे. याव्यतिरिक्त, हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे जो काम, प्रवास किंवा अल्प-मुदतीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसाचा एक भाग म्हणून अमेरिकेत जाऊ इच्छित असलेल्या व्यक्तींना जारी केला जातो.

जे 1 व्हिसा कार्यक्रमात, व्यक्ती कमी कालावधीसाठी अमेरिकेत शिकू शकतात, नंतर मायदेशी परत येऊ शकतात आणि त्यांचे कौशल्य वापरू शकतात. शिवाय, जे 2 व्हिसावर त्यांच्यावर अवलंबून(डीपेनडेंट) त्यांच्या बरोबर जाऊ शकतात. हा व्हिसा घेण्यासाठी पात्रतेचे कडक क्रायटेरिया आहेत.

जे 1 व्हिसासाठी पात्रता क्रायटेरिया

जे1 व्हिसासाठी विविध उपकॅटेगरी आहेत. म्हणूनच, या व्हिसासाठी आपली पात्रता आपण अर्ज केलेल्या कार्यक्रमावर अवलंबून असेल. जी संस्था आपला जे1 व्हिसा प्रायोजित करेल त्या संस्थेकडे पात्रतेचे काही क्रायटेरिया देखील असतील, म्हणून आपल्याला पात्रतेसाठी दोघांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

तथापि, इतर दुसरे क्रायटेरिया असूनही हे 2 प्राथमिक क्रायटेरिया असतातच. हे आहेत -

1. इंग्रजीत प्रावीण्य

2. पुरेसा हेल्थ इन्शुरन्स

जे 1 व्हिसाचे प्रकार काय आहेत?

जे 1 व्हिसाचे 14 प्रकार आहेत ज्यात विविध नोकऱ्या आणि अभ्यास कार्यक्रमांचा समावेश आहे. ते आहेत -

  • एयू पेअर आणि एज्युकेअर
  • शिबिर समुपदेशक
  • शासकीय विजिटर
  • इंटर्न
  • आंतरराष्ट्रीय विजिटर (डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या वापरासाठी)
  • फिजिशियन
  • प्राध्यापक आणि रिसर्च स्कॉलर
  • शॉर्ट टर्म स्कॉलर
  • तज्ज्ञ
  • विद्यार्थी / माध्यमिक
  • विद्यार्थी, महाविद्यालय/विद्यापीठ
  • समर वर्क ट्रॅव्हल
  • शिक्षक
  • प्रशिक्षणार्थी

हे विविध उपकॅटेगरी आहेत. प्रत्येक उपकॅटेगरीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण येथे क्लिक करू शकता.

तथापि, जे 1 व्हिसासाठी अर्ज कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचन सुरू ठेवा!

जे 1 व्हिसासाठी अर्ज प्रक्रिया

जे 1 व्हिसासाठी अर्ज कसा करावा ते येथे आहे. या सोप्या स्टेप्स फॉलो करा.

  • स्टेप 1: नामांकित प्रायोजक शोधा, ज्याला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने मान्यता दिली पाहिजे. वर सूचीबद्ध केल्याप्रमाणे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात स्वीकृती मिळाल्याची खात्री करा.
  • स्टेप 2: पुढे, फॉर्म डीएस -2019 फील करा, ज्याला एक्सचेंज स्टेटस व्हिजिटरसाठी पात्रतेचे सर्टिफिकेट देखील म्हणतात.
  • स्टेप 3: त्यानंतर आपल्याला होमलॅण्ड सिक्युरिटी विभागाला 'सेव्हिस आय-901' शुल्क भरावे लागेल.
  • स्टेप 4: जे 1 व्हिसा प्रक्रियेचा एक भाग म्हणून आणखी काही फॉर्म फील करा आणि रंगीत छायाचित्रासह आपला पासपोर्ट सबमिट करा.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी आपल्याला स्थानिक अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात इंटरविव्ह घ्यावा लागेल. सामान्यतः लहान मुले आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना मुलाखतीची आवश्यकता नसते पण याला काही अपवाद असू शकतो.

जे 1 व्हिसा अॅप्लीकेशनसाठी आवश्यक दस्तऐवज

जे 1 व्हिसा आवश्यकतांमध्ये अनेक फॉर्म आणि दस्तऐवज आहेत. हे दस्तऐवज अर्जदार, प्रायोजक कार्यक्रम आणि युनायटेड स्टेट्स सरकारशी संबंधित आहेत.

जे1 व्हिसासाठी आवश्यक असलेली हे दस्तऐवज असे आहेत.

1. डीएस-2019

आपले डिटेल्स एसईव्हीआयएस नावाच्या यूएस डेटाबेसमध्ये लॉग इन केल्यानंतर हा फॉर्म तयार होईल. आपल्या प्रायोजकाने हा फॉर्म आपल्याकडे फॉरवर्ड करावा लागेल. फॉर्मचा तपशील अचूक आहे की नाही आणि आपल्या पासपोर्टशी जुळतो की नाही हे पाहण्यासाठी ते नीट तपासा.

2. डीएस-7002 प्रशिक्षण/इंटर्नशिप प्लेसमेंट कार्यक्रम

या फॉर्ममध्ये आपल्या प्रायोजक आणि स्वत: बद्दल चार विभाग आहेत. परराष्ट्र खात्याला या डिटेल्सची आवश्यकता आहे. आपल्या प्रायोजकाला फॉर्मचा काही भाग भरावा लागेल.

3. डीएस-160

डीएस-160 ऑनलाइन नॉन-इमिग्रेंट व्हिसा इलेक्ट्रॉनिक अॅप्लीकेशन हा या प्रकारातील पुढचा फॉर्म आहे. अमेरिकन दूतावासात अपॉइंटमेंट बुक करण्यापूर्वी आपल्याला हा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल. याव्यतिरिक्त, आपल्याला अशा ठिकाणाचा उल्लेख करावा लागेल जिथे आपण आपल्या व्हिसा इंटरविव्ह द्यायला उपस्थित राहू शकता.

4. पासपोर्ट

आपल्याला वैध पासपोर्टची आवश्यकता असेल जी वास्तव्याच्या कालावधीनंतर 6 महिन्यांनंतर संपणार नाही. आपल्यासोबत येणाऱ्या आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यानेही या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

5. रंगीत छायाचित्र

यशस्वी जे 1 व्हिसा अॅप्लीकेशनसाठी आपल्याला आपल्याबरोबर अपलोड करण्यासाठी किंवा सोबत नेण्यासाठी अलीकडील रंगीत छायाचित्राची आवश्यकता असेल.

जे 1 व्हिसाची कॉस्ट किती आहे?

डीएस -160 ची कॉस्ट $160 असेल आणि एसईव्हीआयएस ची कॉस्ट $180 असेल. तथापि, जे1 व्हिसाची कॉस्ट प्रत्येक कार्यक्रमात चेंज होते आणि वेगवेगळ्या अर्जदारांसाठी डीफ्रंट असेल. शिवाय, जर आपल्याला जे1 व्हिसा फी माफी हवी असेल तर आपल्याला डीएस -305 फॉर्मसाठी $120 पे करावे लागतील. शिवाय, एक्सटेन्शनसाठी आपल्याला नवीन डीएस-2019 साठी $367 पे करावे लागतील. विशिष्ट देशांतील लोकांना रेसीप्रोसिटी फी भरावी लागते.

जे 1 व्हिसाची प्रक्रिया करण्यासाठी किती वेळ लागतो?

प्रक्रियेचा वेळ 5 आठवड्यांपासून 2 महिन्यांपर्यंत लागू शकतो. प्रत्येक अर्ज वेगळा आहे आणि आपण अर्ज करीत असलेल्या वाणिज्य दूतावास किंवा दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असतो.

जे 1 व्हिसासाठी वास्तव्याचा कालावधी

 

वास्तव्याचा कालावधी कार्यक्रमावर अवलंबून असतो. तथापि, आपण जे1 व्हिसावर 7 वर्षे राहू शकता.

आम्ही खाली काही कार्यक्रमांची वैधता दर्शविली आहे -

कार्यक्रम वास्तव्याचा कालावधी
शिक्षक/प्राध्यापक/अभ्यासक/रिसर्चर 5 वर्षे
वैद्यकीय पदवीधर विद्यार्थी 7 वर्षे
व्यावसायिक प्रशिक्षणार्थी आणि सरकारी विजिटर्स 1 वर्ष 6 महिने किंवा 2 वर्षांपर्यंत देखील असू शकतो
शिबिर समुपदेशक आणि समर कामगार 4 महिने
नॅनीस आणि एयू पेअर्स 1 वर्ष
इंटरनॅशनल कम्युनिकेशन एजन्सीचे कर्मचारी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक

जे1 व्हिसाचे डीफ्रंट फायदे

जे1 व्हिसाचे विविध फायदे येथे आहेत -

  • त्यासाठी कामगार विभागाची परवानगी आवश्यक नाही, केवळ डिपार्टमेंट ऑफ स्टेटची परवानगी चालेल.
  • पती-पत्नी आणि डीपेंडंट्सना जे1 व्हिसाद्वारे मान्यता दिली जाऊ शकते.
  • जे1 व्हिसाच्या कोणत्याही मुदतवाढीला प्रायोजक संस्थेमार्फत मान्यता दिली जाते.

शेवटी, हे लक्षात घेतले पाहिजे की जे1 व्हिसा बहुतेक लोकांना अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जारी केला जातो. जे1 व्हिसामुळे अमेरिकन नोकऱ्या मिळू शकत नाहीत जसे की एच-1बी व्हिसामुळे होऊ शकते.

म्हणूनच, विद्यार्थी, अभ्यासक आणि रिसर्चर कर्मचाऱ्यांच्या पसंतीचा हा सर्वात लोकप्रिय व्हिसा आहे. म्हणून, आजच आपल्या जे 1 इन्शुरन्ससाठी अर्ज करा!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी जे 1 व्हिसावर काम करू शकतो का?

जर आपण त्या स्पष्ट हेतूने तेथे गेला असाल तर आपण जे1 व्हिसावर काम करू शकता. उदाहरणार्थ, नॅनी आणि एयू पेअर्सनी त्यांच्या कामाची कर्तव्ये पार पाडणे अपेक्षित आहे. विद्यार्थी आणि रिसर्चर्सनाही काम करायचे असेल तर त्यांच्या संस्थेची परवानगी घ्यावी लागते.

माझा जे 1 व्हिसा संपल्यानंतर देश सोडण्यासाठी माझ्याकडे किती दिवस असतील?

जे 1 व्हिसाची मुदत संपल्यानंतर विजिटर्सना देश सोडण्यासाठी 30 दिवसांचा ग्रेस कालावधी असतो.