एच-1बी व्हिसा साठी अर्ज कसा करायचा?
अमेरिकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एच-1बी व्हिसा आवश्यक आहे. हा सर्वात महाग व्हिसा आहे ज्यासाठी दर वर्षी 200,000 अर्ज येतात. परंतु, दुर्दैवाने हा हवाहवासा वाटणारा व्हिसा
या व्यक्तींपैकी काही जणांनाच मिळतो.
तर, एच-1बी व्हिसा काय आहे, आणि यासाठी अर्ज कसा करायचा?
पुढे वाचा आणि तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती मिळवा!
एच-1बी व्हिसा काय आहे?
एच-1बी व्हिसा हा व्हिसाचा एक प्रकार आहे जो अमेरिकन सरकार इशू करते. या व्हिसा द्वारे इतर देशांतील व्यक्तींना अमेरिकेमध्ये येऊन काम करण्याची परवानगी दिली जाते. तसेच, कोणताही परदेशी व्यक्ती जो या व्हिसा साठी अर्ज करत आहे, अशा क्षेत्रात किंवा हुद्यावर कार्यरत असावा जिथे अमेरीकेतील मूळ व्यक्ती कार्यरत नसेल. त्यामुळे, हे नियम खूपच कंडक आहेत आणि यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.
सर्वात आधी, तुमचा एम्प्लॉयर या व्हिसा साठी लागणारा अर्धा खर्च पे करत आहे आणि आवश्यक कागदपत्र देखील तुमच्या वतीने जमा करत आहे, हे सुनिश्चित करा. तसेच, एम्प्लॉयरने हे देखील सिद्ध करावे की त्या देशात राहणारी इतर कोणतीही खास व्यक्ती देखील हे काम करू शकत नाही आणि म्हणूनच एका परदेशी व्यक्तीला या कामासाठी नेमणे गरजेचे आहे.
एच-1बी व्हिसाच्या पात्रतेसाठीचे निकष
एच-1बी व्हिसाच्या पात्रतेसाठी अनेक नियम आहेत. याचे पत्रातेसाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
अर्जदाराकडे बॅचलर किंवा मास्टर्स डिग्री किंवा परदेशातील समतुल्य डिग्री असणे आवश्यक आहे.
तुमच्याकडे त्या नोकरीसाठी आवश्यक सर्व डिग्री असेन आवश्यक आहे. जसे डॉक्टर पदासाठी एमडी डिग्री.
संबंधित पदाची/क्षेत्रातील विस्तारित ज्ञान.
एम्प्लॉयरने हे सिद्ध करावे की खुद्द अमेरिकेमध्ये या पदासाठी कोणीही तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध नाही.
युनायटेड स्टेट्स सिटीझनशिप एंड इमिग्रेशन सर्व्हिसेस ठरवतील की हे पद एक विशिष्ट सेवा आहे आणि तुम्ही ही सर्व्हिस देण्यासाठी पात्र आहात की नाही.
तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या नियम आणि अटींसंबंधी लेबर कंडीशन्स डिपार्टमेंट ऑफ लेबर मध्ये फाईल केलेल्या असाव्यात.
तुम्ही जे काम करायला अमेरिकेला जात आहात ते करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात हे देखील तुम्हाला सिद्ध करावे लागेल.
आता तुम्ही हा एच-1बी व्हिसा कसा मिळवू शकता, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल! चला तर बघूया..
एच-1बी व्हिसा साठी अर्ज कसा करायचा?
एच-1बी व्हिसा साठी अर्ज करण्यासाठी मूळतः चार स्टेप्स आहेत:
अमेरिकेमध्ये तुमची नेमणूक करू शकणारी कंपनी शोधणे
लेबर कंडीशन्स परवानगी मिळवणे
फॉर्म आय-129 भरणे
तुमच्या देशातील अमेरिकी वाणिज्य दूतावासाला (युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेट) भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे
आता तुम्ही एच-1बी व्हिसा साठी अर्ज कसा करावा, हे डीटेल मध्ये बघूया.
स्टेप 1: अमेरिकेतील तुम्हाला स्पॉन्सर करणारी कंपनी शोधा. म्हणजेच, तुम्हाला अशी कंपनी शोधायची आहे जी तुम्हाला काम देण्यास इच्छुक आहे आणि या कामासाठी अमेरिकेतील कोणतीही योग्य व्यक्ती त्या कंपनीला मिळालेली नाही.
स्टेप 2: तुम्हाला नोकरी मिळाली की तुमच्या एम्प्लॉयरने एच-1बी व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करावी.
स्टेप 3: त्यानंतर, या कंपनीने डिपार्टमेंट ऑफ लेबर मध्ये वेतनासंबंधी नियमांसह लेबर कंडीशन्स अप्रूव्हल (एलसीए) फाईल करायला हवे.
स्टेप 4: त्यानंतर, एम्प्लॉयरला फॉर्म आय-129 भरावा लागेल. हा फॉर्म म्हणजे नॉन-इमिग्रंट कामगारासाठी केलेली एक याचिका. या प्रक्रियेला साधारण 3 4 दिवस लागतात आणि फी, रेझ्युमे, कन्फर्मेशन लेटर, लेटर ऑफ सपोर्ट, ट्रेनिंग सर्टिफिकेट्स, एजुकेशन आणि एक्सपीरियन्स इव्हॅल्यूएशन डॉक्युमेंट्स हे सर्व सबमिट करणे या प्रक्रियेचाच एक भाग आहे.
स्टेप 5: ही याचिका मान्य झाली की, त्या व्यक्तीने पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याच्या देशातील अमेरिकन कॉन्सुलेटला ( अमेरिकी वाणिज्य दूतावासाला) भेट द्यावी. यासाठी 2 3 दिवस लागतील.
एच-1बी व्हिसा साठी लागणारी कागदपत्र
जसे की आपण पहिले, एच-1बी व्हिसा साठी असंख्य कागदपत्रांची आवश्यकता असते. पुढे आपण एच-1बी व्हिसा साठी लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल चर्चा करणार आहोत.
यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे जेव्हा व्यक्ती अमेरिकेच्या बाहेर स्थायिक असेल, आणि दुसरा म्हणजे जेव्हा व्यक्ती अमेरिकेतच स्थायिक आहे.
एच-1बी व्हिसा साठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत.
अमेरिकेच्या बाहेर स्थायिक असलेल्या व्यक्तींसाठी एच-1बी व्हिसा
सर्वात आधी तुमच्याकडे 2 ते 3 पासपोर्ट साईजचे रंगीत फोटो असायला हवेत.
तुमच्या डिग्रीजच्या कॉपीज
त्यानंतर, तुमच्या सध्याच्या अमेरिकन लायसन्सच्या कॉपीज किंवा टेम्पररी लायसन्स, आणि संबंधित सर्टिफिकेट्स सह रेझ्युमे.
जर एच-4 व्हिसा साठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला बाळाच्या जन्माच्या दाखल्याच्या आणि मॅरेज सर्टिफिकेटच्या कॉपीज सबमिट कराव्या लागतील
स्पॉन्सरिंग अमेरिकी कंपनी मधील कामाचे स्वरूप आणि तुमच्या जबाबदाऱ्या थोडक्यात सांगाव्या लागतील.
लेबर सर्टिफिकेट अप्रूव्हल (एलसीए)
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरकडून अपॉइंटमेंट लेटर घ्यावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला भारताच्या कन्सुलेट जनरल आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टीस कडे सबमिट केलेल्या अपॉइंटमेंट लेटरच्या कॉपीज पाठवाव्या लागतील.
त्यानंतर, तुम्हाला तुमच्या जुन्या कंपनीतील सर्व अपॉइंटमेंट आणि रीलीव्हिंग सर्टिफिकेट्स घ्यावे लागतील.
पासपोर्ट
पोस्टग्रॅज्यूएट सर्टिफिकेशन
कंपनीचे टॅक्स रिटर्न पेपर्स
त्यांनतर, तुम्हाला एच-1बीच्या स्टेटस मध्ये अमेरिकेतील तुमच्या आधीच्या वास्तव्याच्या तारखा लिहाव्या लागतील.
प्रोसेसिंग फी साठी $45 चा आणि इशुअन्स फी साठी $100 चा, असे दोन डिमांड ड्राफ्ट्स लागतील.
अमेरिकेत स्थायिक असलेल्या व्यक्तींसाठी एच-1बी व्हिसा
बायोग्राफिकची कॉपी आणि सध्याच्या पासपोर्टचे व्हिसा पेजेस
क्रेडेन्शिअल्स इव्हॅल्यूएशनची कॉपी
युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज डिग्रीची कॉपी
असल्यास, सध्याच्या लायसन्सची कॉपी
एम्पलॉयमेंट हिस्ट्रीसह सध्याचा रेझ्युमे
सध्याचा अमेरिकेतील पत्ता
एच-1बीच्या स्टेटस मध्ये अमेरिकेतील तुमच्या आधीच्या वास्तव्याच्या तारखा
डे एंड इव्हनिंग फोन नंबर्स
तुमच्या कामाचे स्वरूप आणि तुमच्या जबाबदाऱ्यांचे विस्तृत विवरण
ई-मेल एड्रेस
परदेशातील पत्ता
फॉर्म आय-94 कार्डची कॉपी
एच1-बी अप्रूव्हलच्या आधीच्या नोटिसेसच्या कॉपीज
सध्याच्या पेस्लिप्सच्या कॉपीज
डब्ल्यू2च्या सध्याच्या कॉपी
सोशल सिक्युरिटी नंबर
स्पॉन्सारिंग अमेरिकन कंपनीमध्ये असलेले तुमच्या पदाचे नाव
त्याच बरोबर, पासपोर्ट-साईज्ड फोटो जे तुम्हाला सबमिट करायचे असतात, त्याबाबत असलेल्या रिक्वायरमेंट्स देखील माहित असणे महत्त्वाचे आहे.
एच-1बी व्हिसा अर्जासाठी फोटोग्राफ रिक्वायरमेंट्स
फोटो चौकोनी असावा, आणि त्याचे डायमेंशन्स कमीत कमी 600x600 पिक्स्ल्स इतके असावे.
फोरो कलर (एसआरजीबी) कोड मध्ये असावा.
फाईलचा फॉर्मॅट जेपीईजी मध्ये असावा.
फोटोचा साईज 240 केबी किंवा त्याच्यापेक्षा कमी असावा.
फोटोमध्ये तुमचा संपूर्ण चेहरा, खांदे, आणि मान दिसायला हवी आणि समोरच्या बाजूचा व्ह्यू असावा.
चेहऱ्यावरचे हावभाव हसरे नसावेत आणि सामान्य असावेत. डोळे उघडलेले असावेत. आणि तुम्ही थेट कॅमेऱ्याकडे बघणे अपेक्षित आहे.
तुमची मान स्थिर असावी आणि फ्रेमच्या मधोमध असावी.
बॅकग्राउंड अगदी हलक्या रंगाचे असावे. त्याच बरोबर, फोटोमध्ये कोणतीही सावली दिसू नये.
चेहरा स्थिर असायला हवा, आणि फोटो खूप तीक्ष्ण (शार्प) नसावा.
त्याच बरोबर, फोटो अगदी काळपट किंवा अगदी भडक नसावा.
एच-1बी व्हिसा साठी फीज किती आहेत?
उद्दिष्ट | देयक फीज |
---|---|
रजिस्ट्रेशन फी | $10 |
फॉर्म I-129 साठी स्टॅन्डर्ड फी | $460 |
एसीडब्ल्यूआयए तेनिंग फी | $750 - $1500 |
फ्रॉड रोखण्यासाठी आणि पकडण्यासाठीची फी | $500 |
पब्लिक लॉ 114-113 एकूण कामगारांपैकी अर्ध्या कामगारांकडे एच-1बी किंवा एल-1 स्टेटस असलेल्या कंपनीसाठी फी | $4000 |
जे फॉर्म I-907च्या सहाय्याने एच-1बी व्हिसा प्रक्रिया जलद गतीने करून घेतात अशा लोकांसाठी ऑप्शनल फी | $1440 |
एच-1बी व्हिसा बद्दल इतर विविध मुद्दे
- एच-1बी व्हिसाची लॉटरी प्रक्रिया म्हणजे काय?
दर वर्षी अप्रूव्ह होणाऱ्या एच-1बी व्हिसाची संख्या मर्यादित आहे. तितके व्हिसा अप्रूव्ह झाल्यावर, अर्जदारांना एका रँडम लॉटरी मध्ये भाग घ्यावा लागतो. जर तुमचा नंबर निवडला गेला, तर तुम्ही व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. अन्यथा, तुम्हाला पुन्हा अर्ज करण्यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत थांबावे लागेल.
- एच-1बी व्हिसाचा स्टेटस कसा चेक करायचा?
एच-1बी व्हिसाचा स्टेटस ऑनलाईन बघता येऊ शकतो. या स्टेप्स फॉलो करा -
- स्टेप 1: यूएससीआयएसचे ऑफिशियल पोर्टल चेक करा.
- स्टेप 2: रजिस्टर केल्यावर, तुम्हाला 13 अंकांचा एक रिसीट नंबर मिळेल. इएसी, व्हीएससी, एनएससी, डब्ल्यूएसी अशी या नंबरची सुरुवात असेल.
- स्टेप 3: हा नंबर टाका आणि एच-1बीचा स्टेटस तुम्ही बघू शकता.
- एच-1बी व्हिसाची वैधता किती काळ आहे?
एच-1बी व्हिसा 3 वर्षांसाठी वैध असतो. त्यानंतर, तो आणखीन तीन वर्षांसाठी वाढवून घेता येऊ शकतो. त्यानंतर, तुम्हाला एफ-1 स्टूडंट किंवा ओ-1 वर्कर यासाठी अर्ज करावा लागेल.
सहा वर्षानंतर व्हिसाची वैधता वाढवण्यासाठी, अर्जदाराला म्हणजेच तुमच्या सध्याच्या एम्पलॉयरला किंवा नवीन एम्पलॉयरला फॉर्म आय-126 भरावा लागतो.
- एच-1बी व्हिसा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो?
अप्रूव्ह झालेल्या याचिका किंवा अर्जांची प्रक्रिया 3-5 दिवसात पूर्ण होते. असे असले तरी, एच-1बी अर्ज करण्यासाठी 3 ते 6 महीने लागू शकतात.तरी, प्रीमियम प्रोसेसिंगची रिक्वेस्ट केली असेल तर अर्ज करायच्या प्रक्रियेला 15 दिवस लागतात.
- रिसीट नंबर नसताना एच-1बी व्हिसाचा स्टेटस कसा चेक करायचा?
तुम्ही 1-800-375-5283 या नंबरवर कॉल करून तुमच्या व्हिसाचा स्टेटस चेक करू शकता. कॉल्सची संख्या बघून तुम्ही रिसीट नंबर नसतानाही तुमच्या एच-1बी व्हिसाचा स्टेटस चेक करू शकता.
एच-1बी व्हिसाचे कोन्कोते फायदे आहेत?
एच-1बी व्हिसाचे असंख्य फायदे आहेत, विशेषतः त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला. ते आहेत:
कुटुंबातील सदस्य (जोडीदार आणि मुलं, ज्यांचे वय 21 वर्ष असेल) त्या व्यक्तीबरोबर तिथे राहू शकतात. तरी, त्यांना एच4 व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.
एच4 व्हिसा धारक शाळेत जाऊ शकतात, बँक अकाउंट उघडू शकतात, आणि सोशल सिक्युरिटी नंबर देखील मिळवू शकतो.
एच- 1बी व्हिसा मिळवण्यासाठी अगदीच साध्या रिक्वायरमेंट्स आहेत ज्यामुळे हा व्हिसा मिळवणे अगदी सहज आणि सोपे होते. यासाठी बॅचलर्स डिग्री आणि अमेरिकन कंपनीकडून नोकरीची ऑफर एवढीच रिक्वायरमेंट असते.
इतर व्हिसा जसे जे-1 किंवा बी-1 यांच्या तुलनेत या व्हिसा वर अमेरिकेमध्ये राहण्याचा कालावधी देखील जास्त आहे.
तुम्ही या व्हिसा वर अमेरिकेमध्ये पार्ट टाईम किंवा दुसऱ्या एम्पलॉयर बरोबर देखील काम करू शकता.
तुम्ही या व्हिसा वर अमेरिकेमध्ये कायदेशीररीत्या कायमस्वरूपी नागरिकत्व देखील मिळवू शकता.
थोडक्यात सांगायचे झाले तर, एच-1बी व्हिसा इतका लोकप्रिय आणि हवाहवासा वाटतो यात काहीच नवल नाही. तरी, मागील काही वर्षांत या व्हिसाला अनेक एम्पलॉयर्सने नापसंत केले आणि त्यामुळे याबद्दलचे नियम आता कडक करण्यात आले आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
दर वर्षाची किती जण एच-1बी व्हिसाचा अर्ज करू शकतात?
दर वर्षी 85,000 अर्ज लॉटरी पद्धतीने निवडले जातात.
जर तुमची एच 1बी व्हिसा लॉटरी मध्ये निवड नाही झाली तर?
जर तुमची एच 1बी व्हिसा लॉटरी मध्ये निवड नाही झाली तर यूएससीआयएस तुमचा अर्ज आणि फी परत करतात.