ट्रॅव्हल इन्शुरन्स जो फायनान्शियल इमर्जन्सी कॅश प्रदान करतो
पॉकेटमारांसाठी असे काही हॉटस्पॉट आहेत का ज्यापासून मला सावध राहण्याची आवश्यकता आहे?
प्रामुख्याने उच्च घनतेची पर्यटन स्थळे, सार्वजनिक वाहतूक आणि रेस्टॉरंट्स आणि समुद्र किनाऱ्यांसारखी इतर गर्दीची पर्यटन स्थळे. पॉकेटमारीसाठी लोकप्रिय असलेली काही पर्यटन स्थळे म्हणजे बार्सिलोना, रोम, पॅरिस, अथेन्स!
माझं पाकीट चोरीला गेलं तर?
प्रवासादरम्यान घडू शकणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आपले पाकीट हरवणे! अशा परिस्थितीला सामोरे जाताना सर्वप्रथम लक्षात ठेवा, ती म्हणजे घाबरून जाऊ नका. तुमचे कार्ड आणि कॅश नसणे ही स्वतःच एक मोठी समस्या आहे आणि त्यात जर आपण घाबरला तर यामुळे नक्कीच समस्येत भर पडेल.
बॅग्स आणि पाकीटं चोरीला गेल्यावर त्यापासून संरक्षण देणारा कोणता ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे का?
परदेशात प्रवास करताना पॉकेटमारी सामान्य आहे, संघटित गुन्हेगारीचे जाळे आहे जे बऱ्याचदा पर्यटकांना लक्ष्य करतात. म्हणूनच आपल्याला ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्याचा सल्ला दिला जातो जो आपल्या शहर आणि परिस्थितीनुसार योग्य कव्हरेज प्रदान करतो.
उदाहरणार्थ, डिजिटचा ट्रॅव्हल इन्शुरन्स, या मध्ये फायनान्शियल इमर्जन्सी कॅश कव्हर आहे जे आपले पाकीट चोरले गेल्यास किंवा बॅग चोरीला गेल्यास आपल्या निवडलेल्या प्लॅननुसार आपल्याला फायदा म्हणून रक्कम मिळते.
ठीक आहे, मग माझे पाकीट चोरीला गेल्यास मी काय करावे?
- रिपोर्ट करा! - चोरीला गेलेल्या वस्तूंची चोरी झाल्याच्या 24 तासांच्या आत पोलिसांत तक्रार करावी लागेल आणि लेखी पोलिस रीपोर्ट घ्यावा लागेल.
- आपले गॅजेट्स आणि कार्ड ट्रॅक करा आणि ब्लॉक करा - आपल्या सेवा प्रदात्यास आणि बँकेला कॉल करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या सेवा आणि डेबिट / क्रेडिट कार्ड ब्लॉक करा. आपल्या फोनचे लोकेशन तपासण्यासाठी आपण ट्रॅकिंग अॅप्स देखील वापरू शकता
- आपल्या इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा - जर आपली इन्शुरन्स पॉलिसी सामान /वैयक्तिक वस्तूंचे नुकसान कव्हर करते तर ते हरवलेल्या वस्तूंचे रीएमबर्स करू शकतात. जेव्हा आपण क्लेम करता तेव्हा आपल्याला आपले सर्व रिपोर्ट आणि पावती ठेवणे आवश्यक आहे. आवश्यक दस्तऐवज सादर करण्यात अपयशी ठरल्याने आपला क्लेम कमी किंवा नाकारला जाऊ शकतो.
डिजिटसह क्लेम कसा करावा?
- असे कोणतेही नुकसान झाल्यास ताबडतोब (48 तासांपेक्षा जास्त नसावे) आमच्या ट्रॅव्हल क्लेम हेल्पलाइनवर कळवावे. आमच्या टोलफ्री क्रमांकावर +91-7303470000 (आपण जगात कोठेही आहात) वर मिस्ड कॉल द्या आणि आम्ही आपल्याला 10 मिनिटांत परत कॉल करू.
- नुकसानीच्या 24 तासांच्या आत परदेशातील पोलिसांना प्रकरणाची नोंद करणे सुनिश्चित करा आणि डिजिट टीमसह रिपोर्ट शेअर करा
- आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवू जिथे आपण काही दस्तऐवज आणि आपल्या बँक खात्याचा डीटेल्स अपलोड करू शकता.
- गमावलेल्या ट्रॅव्हल फंडाची रक्कम रीप्लेस करण्यासाठी आम्ही पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करू.
आपले पाकीट मारले गेल्यास ते कव्हर करण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स नसला तरी आपल्या वस्तू रीप्लेस करण्याच्या खर्चात मदत करू शकते.आपली ट्रीप डिजिटसह इन्शुअर्ड करा. अधिक जाणून घ्या / आता खरेदी करा.