डिजिट इन्शुरन्स करा

डेफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी म्हणजे काय?

एका कंपनीचे फायनांशियल स्टेटमेंट तिची ग्रोथ पोटेन्शियल, कॅश फ्लो आणि फिस्कल हेल्थ याबद्दल दर्शवते. डेफर्ड टॅक्स हा फायनांशियल स्टेटमेंट मधील अतिशय निर्णायक असा मुद्दा आहे जो स्क्रूटिनाइज केला जातो. एक्चुअल इन्कम टॅक्स आणि अकाउंट बुक्स मध्ये जेव्हा फरक आढळून येतो तेव्हा डेफर्ड टॅक्स असेट किंवा लायबिलिटी तयार होते. (आयएफआरएस/जीएएपी प्रमाणे)

आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनीच्या अकाउंट बुक्स मध्ये डेफर्ड टॅक्स असेट आणि लायबिलिटी एडजस्ट केल्या जातात. परिणामी, हे घटक एंटरप्राइजच्या इन्कम टॅक्स पेआउट वर परिणाम करतात.

डेफर्ड टॅक्स आणि त्याच्या परिणामांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

[स्रोत 1]

[स्रोत 2]

डेफर्ड टॅक्स म्हणजे काय?

डेफर्ड टॅक्स हा कंपनीच्या बॅलेंसशीटमधला महत्वाचा भाग आहे.

डेफर्ड टॅक्सचा बॅलेंसशीटवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. बॅलेंसशीटमध्ये ही एन्ट्री असेट किंवा लायबिलिटी स्वरूपात असू शकते. समजा एखाद्या व्यक्तीने एडव्हांस टॅक्स भरला असेल आणि त्याला त्याचे टॅक्स क्रेडिट मिळाले असेल जें तो भविष्यात वापरू शकतो, तर हे असेट अंतर्गत येईल. त्याउलट, एखाद्या बिझिनेस भविष्यात अतिरिक्त टॅक्स भरण्यासाठी जबाबदार असेल तर याला लायबिलिटी समजले जाईल.

डेफर्ड असेट आणि लायबिलिटी मध्ये फरक तेव्हा निर्माण होतो जेव्हा त्यांच्या तयार होण्याच्या वेळेत फरक पडतो.

यामुळे आपल्याला हे समजते की टॅक्सेबल इन्कम आणि अकाउंट बुक्स मधील इन्कम यामध्ये अंतर असते. कंपनीच्या भविष्यावर याचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.

ही संकल्पना आणखीन सखोल समजून घेण्यासाठी डेफर्ड टॅक्स असेट चा अर्थ समजून घेऊ.

[स्रोत 1]

[स्रोत 2]

डेफर्ड टॅक्स असेट म्हणजे काय?

डेफर्ड टॅक्स असेट म्हणजे कंपनीमधील फायनांशियल बॅकअप किंवा भविष्यातील तरतूदींबद्दलची माहिती. बॅलेंसशीटमध्ये कंपनीने टॅक्स एडव्हांस मध्ये भरला आहे की जास्तीचा भरला आहे हे बघता येते

इंडीव्हिजुअल्सना या जास्तीच्या भरलेल्या रकमेचे रीएमबर्समेंट मिळते. साधारणतः, एका कंपनीमध्ये डेफर्ड टॅक्स असेट तयार होते जेव्हा टॅक्सेशनच्या नियमांमध्ये बदल होतात.

उदाहरणार्थ वार्षिक युनिअन बजेट मध्ये टॅक्स एक्झ्म्पशन नव्याने सुरु करणे. एखाद्या कंपनीला काही आर्थिक वर्षांमध्ये नुकसान झाले असेल तरी देखील डेफर्ड टॅक्स असेट तयार होतो. तेव्हा, हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हे असेट वापरता येऊ शकतात.

डेफर्ड टॅक्स असेट तयार होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक आहेत:

  • जेव्हा कोणी रेव्हेन्यूवर आधीच टॅक्स लावतो.
  • टॅक्सिंग अथॉरीटीकडून सर्व खर्च आधीच विचारात घेतल्यावर.
  • असेट्स आणि लायबिलिटीज मधील टॅक्स रुल्समधील फरक

डेफर्ड टॅक्स असेट बद्दल जाणून घेण्यासोबतच सर्वांनी डेफर्ड टॅक्स लायबिलिटी ही संकल्पना देखील समजून घ्यायला हवी. यामुळे आपल्याला या दोन्हीतील फरक समजून घेण्यास मदत होईल.

[स्रोत]

डेफर्ड टॅक्स लायबिलिटी म्हणजे काय?

डेफर्ड टॅक्स लायबिलिटीचा अर्थ अगदी सोपा आहे, कंपनीच्या ड्यू टॅक्स बद्दलची माहिती.देणे. जेव्हा कंपनी कमी टॅक्स लायबिलिटी भरते आणि उरलेली रक्कम भविष्यात भरण्याचे लायबिलिटवचन देते तेव्हा ही लायबिलिटी तयार होते.

आपण हेजाणून घ्यायला हवे की जर एखाद्या कंपनीची लायबिलिटी दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्या कंपनीने काहीच टॅक्स भरलेला नाही. त्याऐवजी, कंपनी वेगळ्या कालावधीमध्ये टॅक्स पे करण्याचे वचन देते.

एका बॅलंसशीट मधील डेफर्ड टॅक्स कंपनीच्या फायनांशियल स्टेटमेंट मध्ये टॅक्सेबल इन्कम रेव्हेन्यू पेक्षा कमी आहे हे दर्शवतो.

डेफर्ड टॅक्स लायबिलिटी तयार होण्यासाठी कारणीभूत परिस्थिती आहेत:

  • जेव्हा एखादी कंपनीच्या शेअरहोल्डेर्स समोर मांडण्यासाठी कंपनीचे कामकाज चालू ठेवते.
  • डुअल अकाउंटिंग करणाऱ्या कंपन्या अशा कंपन्या स्वतःच्या उपयोगासाठी किंवा टॅक्स एक्सपर्ट्सना देण्यासाठी फायनांशियल स्टेटमेंट्सची एक्स्ट्रा कॉपी बनवतात.
  • बरेच एंटरप्राइझेस त्यांचे प्रॉफिट्स पुढील वर्षात एडजस्ट करून त्यांची टॅक्स अमाउंट कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते एक्स्ट्रा इन्कम मधून टॅक्स भरण्याऐवजी ती रक्कम त्यांच्या बिझिनेसच्या कामकाजासाठी वापरतात. त्यांचा उद्देश्य त्यांचे प्रॉफिट्स वाढवणे हा असतो.

डेफर्ड टॅक्सचा अर्थ समजून घेण्यासाठी असेट्स आणि लायबिलिटी वेगळे करून आपण हे एक सोप्पं उदाहरण बघूया.

[स्रोत]

डेफर्ड टॅक्स असेट्स आणि लायबिलिटीचे उदाहरण

खालील डेफर्ड टॅक्स असेटचे उदाहरण ही संकल्पना आणखीन विस्तृतपणे स्पष्ट करते.

समजा, एक मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला अपेक्षा आहे की वॉरंटी पिरीयड क्लेमन्ट्स केवळ 2% असतील. जर एका आर्थिक वर्षासाठी पेएबल टॅक्स ₹1 लाख असेल तर बॅलेंसशीट आणि इन्कम टॅक्स स्टेटमेंट खालील संकेत दर्शवतील.

या उदाहरणामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते आहे की ₹400 चा टॅक्स डिफरंस आहे.

एका कंपनीचे बॅलेंसशीट

बॅलेंसशीटचे घटक रक्कम:
इन्कम/रेव्हेन्यू ₹1,00,000
टॅक्सेबल इन्कम ₹98,000
वॉरंटी क्लेम करण्यासाठीचे खर्च ₹2000
टॅक्स पेएबल (20%) ₹19,600

कंपनीचे इन्कम टॅक्स स्टेटमेंट

बॅलेंसशीटचे घटक रक्कम:
इन्कम/रेव्हेन्यू ₹1,00,000
टॅक्सेबल इन्कम ₹1,00,000
वॉरंटी क्लेम करण्यासाठीचे खर्च Nil
टॅक्स पेएबल (20%) ₹20,000

डेफर्ड टॅक्स असेट आणि डेफर्ड टॅक्स लायबिलिटी कॅलक्युलेशन संबंधी चित्र

 

हा तक्ता डेफर्ड टॅक्स असेट आणि डेफर्ड टॅक्स लायबिलिटी या संकल्पना स्पष्ट करतो. आपण असे गृहीत धरूया की या चित्रामध्ये बुक्स मध्ये आणि टॅक्स रेकॉर्ड्स मध्ये ओपनिंग बॅलेंस नाही.

स्पेसिफिकेशन्स डिफरंस डीटीए / डीटीएल
इन्कम ₹2,00,000 (₹10,00,000-₹8,00,000) -
रिडक्शन ₹1,00,000 (₹2,00,000-₹1,00,000) ₹30,000 (30% of ₹1,00,000)
पेएबल सेल्स टॅक्स ₹50,000 (₹50,000- ₹0) ₹15,000 (30% of ₹50,000)
लीव्ह एनकॅशमेंट ₹1,00,000 (₹2,00,000- ₹1,00,000) ₹30,000 (30% of ₹1,00,000)
डीटीए / डीटीएल (क्लोजिंग बॅलेंस) - ₹15,000

इथे पेएबल टॅक्स असेल-

= 30% of ₹8,00,000

= ₹2,40,000

जर डिफर्ड इन्कम ₹15,000 असेल तर नेट टॅक्स इफेक्ट हाच फरक असेल.

= ₹2,40,000- ₹15,000= ₹2,25,000.

आपण हेच उदाहरण डेफर्ड टॅक्स लायबिलिटी कॅलक्युलेशन समजून घेण्यासाठी देखील वापरू शकतात.

चला तर आता बॅलेंसशीट मधल्या टॅक्स हॉलिडेवर डीटीए आणि डीटीएलचा परिणाम लक्षात घेऊया.

डीटीए आणि डीटीएलचा टॅक्स हॉलिडेवर काय परिणाम होतो?

आपल्याला माहित असेलच की सरकार पब्लिक आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या एम्प्लॉइजना टॅक्स हॉलिडेज ऑफर करते.

यामुळे लायबिलिटी कमी करण्यात किंवा संपूर्ण काढून टाकण्यात मदत होते. याचबरोबर अनेक कंपन्या फ्री ट्रेड झोन बनवण्यासाठी टॅक्स कमी करतात.

सरकार बऱ्याचदा काही वस्तूंचे उत्पादन आणि खप वाढवण्यासाठी ठराविक काळासाठी टॅक्सेस काढून टाकते. तरी, हा मुद्दा वेगवेगळ्या परीस्थितींवर अवलंबून असतो.

आपल्याला माहित असेलच की डेफर्ड इन्कम टॅक्स त्याच्या तयार होण्याच्या वेळेतील फरकामुळे टॅक्स हॉलिडे या काळात सेटबॅकचे कारण ठरू शकतो. त्यामुळे हे एखाद्या इंटरप्राइजच्या टॅक्स हॉलिडे पिरिअड मध्ये अवलंबले जाऊ नये.

त्याउलट, वेळेसंबंधी फरक असलेले डेफर्ड टॅक्स हे मूळ वर्षातच कॅलक्युलेट केले गेले पाहिजे.

एमएटीला प्रभावित करणाऱ्या डीटीएच्या आणि इतर घटकांच्या प्रभावाबद्दल जाणून घेऊ.

डेफर्ड टॅक्स असेट आणि डेफर्ड टॅक्स लायबिलिटीचा एमएटी वर काय परिणाम होतो?

आपल्याला माहित असेलच की जर पेएबल टॅक्स कम्प्युटेड टॅक्स पेक्षा कमी असेल तर कंपनीला एमएटी किंवा मिनिमम अल्टरनेटर टॅक्स भरावाच लागतो. एका प्रॉफिट बुकचा फरक 18.5% आहे.

इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 115JB एन्टीटीच्या बुक प्रॉफिट प्रमाणे कॅलक्युलेट केलेला एमएटी लागू करतो.

आपल्याला माहित असेलच की कंपनीचा बुकप्रॉफिट खालील काही घटकांमुळे वधु शकतो-

  • अनिश्चित लायबिलिटी प्रोव्हीजन्स
  • रिजर्व्ह मध्ये ठेवलेली रक्कम
  • डीटी प्रोव्हीजन्स
  • इन्कम पेमेंट

तरी, हा बुक प्रॉफिट झपाट्याने कमी होऊ शकतो जर-

  • डेप्रिसिएशन प्रॉफिट एंड लॉस शीटमध्ये डेबिट केला तर
  • डटी प्रॉफिट एंड लॉस शीटमध्ये क्रेडीट केला तर
  • अनएबसॉर्ब्ड डेप्रिसिएशन
  • सेव्हिंग्स मधून काढलेली रक्कम

 डेफर्ड टॅक्स आणि त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दलची ही महत्त्वाची माहिती आहे. याचबरोबर आपण आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज मधील फरक समजून घेण्यासाठी एखाद्या प्रोफेशनlचा सल्ला घेऊ शकता.

यामुळे त्यांना त्यांच्या टॅक्स लायबिलिटी सक्षमपणे कमी करण्यात मदत होईल आणि डेफर्ड टॅक्स बेनिफिट मिळवता येईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डेफर्ड टॅक्स असेट तयार झाल्यावर कंपनी जास्त टॅक्स पे'केल्याचे दाखवते का?

नाही, डेफर्ड टॅक्स असेट तयार झाल्यावर कंपनीचे बॅलेंसशीट टॅक्स अथॉरिटी पेक्षा कमी इन्कम टॅक्स पेमेंट्स दाखवते.

बिझिनेस मधील सततचे होणारे नुकसान डेफर्ड टॅक्स असेट वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकते का?

होय, बिझिनेस मधील सततचे नुकसान आणि बॅलेंसशीट एडजस्टमेंट्स डेफर्ड टॅक्स असेटवाढवू शकतात.