टीडीएस कसा कॅलक्युलेट करावा: कॅलक्युलेशन आणि फॉर्म्युला याबद्दल सविस्तर माहिती
निव्वळ इन्कम सोर्स मधून टॅक्स कलेक्ट करणे हाच टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (टीडीएस) चा उद्देश्य आहे. या पद्धतीअंतर्गत एम्प्लॉयर त्याच्या एम्प्लॉईच्या सॅलरी मधून (अर्थात सॅलरीची रक्कम एक्झ्म्पशन लिमिट पेक्षा जास्त असेल तरच) सेक्शन 192 अंतर्गत टॅक्स अॅट सोर्स डीडक्ट करतो आणि सेन्ट्रल गव्हर्मेंटच्या अकाऊन्टमध्ये जमा करतो.
तसेच, एम्प्लॉईला किंवा टॅक्सपेअरला देखील एम्प्लॉयरने इशू केलेल्या फॉर्म 26AS किंवा टीडीएस सर्टिफिकेटच्या सहाय्याने डिडक्टेड अमाउंट परत मिळवण्याचा हक्क आहे.
टीडीएस कॅलक्युलेशनच्या तांत्रिक बाबी लक्षात घेण्याआधी तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की टीडीएस कशावर कॅलक्युलेट करतात.
टीडीएस कशावर कॅलक्युलेट करतात?
पेमेंटच्या वेगवेगळ्या स्वरूपांवर टीडीएसचे कॅलक्युलेशन अवलंबून असते.
त्यामुळे, सॅलरी, बिल अमाउंट किंवा फिक्स्ड डिपॉजिटवर टीडीएस कसा कॅलक्युलेट करायचा असा प्रश्न पडणाऱ्या व्यक्तींनी सर्वात आधी वेगवेगळे टीडीएस रेट्स जाणून घ्यायला हवे.
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला संबंधित सेक्शन्स आणि त्यासाठीचे टीडीएसचे रेट्स याची विस्तृत यादी मिळेल.
पेमेंटचे स्वरूप | संबंधित सेक्शन | 1 एप्रिल 2021 पासून टीडीएस रेट्स |
सॅलरी | कलम 192 | सर्वसाधारण स्लॅब-रेट |
प्री-मॅच्यूअर विड्रॉवल | सेक्शन 192A | 10.00% |
सिक्युरिटीज वर मिळालेले इंटरेस्ट | कलम 193 | 10.00% |
कंपनीच्या शेअर्स आणि म्युच्युअल फंड वर मिळालेले डिव्हीडंट्स | सेक्शन 194 आणि 194K | 10.00% |
सिक्युरिटीज वरच्या इंटरेस्ट व्यतिरिक्त मिळालेले इंटरेस्ट (फिक्स्ड डिपॉजिट वरील इंटरेस्ट) | सेक्शन 194A | 10.00% |
क्रॉसवर्ड्स किंवा इतर खेळांमधून जिंकेलेली रक्कम | सेक्शन 194B | 30.00% |
हॉर्स रेस मधून मिळालेली रक्कम | सेक्शन 194B | 30.00% |
कॉंट्रॅक्टर किंवा सब-कॉंट्रॅक्टरचे पेमेंट्स | सेक्शन 194C | 1% (वैयक्तिक/HUF), 2% (इतर) |
डोमेस्टिक कंपन्यांना मिळालेले इन्शुरन्स कमिशन | सेक्शन - 194D | 10.00% |
इतरांना मिळालेले इन्शुरन्स कमिशन | सेक्शन - 194D | 5.00% |
सेक्शन 10(10D) अंतर्गत एक्झ्म्प्ट नसलेल्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज | सेक्शन 194DA | 5.00% |
(एनएसएस) नॅशनल सेव्हिंग्स स्कीम अंतर्गत असलेल्या डिपॉजिट्स साठी केलेले पेमेंट | 194EE | 10.00% |
म्युच्युअल फंड किंवा UTI द्वारे युनिट्सच्या पुनर्खरेदीच्या खात्यावर पेमेंट | 194F | 20.00% |
लॉटरीचे तिकीट विकून मिळालेले कमिशन, बक्षीस आणि इतर. | सेक्शन- 194G | 5.00% |
ब्रोकरेज किंवा कमिशन | सेक्शन 194H | 5.00% |
शेतजमीन सोडून इतर इम्मूव्हेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना केलेले पेमेंट | सेक्शन 194IA | 1.00% |
एचयुएफ किंवा इंडीव्हिजुअल द्वारा ₹50,000 प्रति महिना प्रमाणे भरलेले भाडे | सेक्शन 194IB | 5.00% |
मशीनरी आणि प्लांटचे भाडे | 194- I | 2.00% |
इम्मूव्हेबल प्रॉपर्टीचे भाडे | 194-I | 10.00% |
प्रोफेशनल फी ई. चे पेमेंट | 194J | 2% (तांत्रिक सेवा, रॉयल्टिज, एफटीएस, कॉल सेंटर), 10% (इतर) |
एचयूएफ/इंडीव्हिजुअल्स द्वारा प्रोफेशनल्सना कमिशन किंवा ब्रोकरेज स्वरूपात ₹50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त केलेले पेमेंट | 194M | 5.00% |
ठराविक रकमेपेक्षा जास्तीचे कॅश विड्रॉवल | 194N | 2.00% |
ई-कॉमर्स पार्टिसिपंट्सवर टीडीएस (1.10.2020 पासून) | सेक्शन 194-O | 1.00% |
टीडीएस कॅलक्युलेशन फॉर्म्युला उदाहरणांसहित (नवीन रिजिम प्रमाणे)
सामान्यतः एम्प्लॉयर एम्प्लॉईच्या सॅलरीमधून त्याच्या अंदाजे एकूण इन्कमवर लागू होणाऱ्या 'एव्हरेज रेट' प्रमाणे टीडीएस डीडक्ट करतो.
फॉर्म्युला आहे:
सरासरी इन्कम टॅक्स रेट = इन्कम टॅक्स पेएबल (स्लॅब रेट्स प्रमाणे गणना केलेली इन्कम/आर्थिक वर्षासाठी अंदाजे गणना केलेली इन्कम)
समजा तुम्हाला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ₹1,00,000 प्रति महिना सॅलरी मिळते.
एकूण इन्कम | ₹12,00,000 |
---|---|
डिडक्शन अंदाजे (चॅप्टर VI A अंतर्गत) | ₹1,00,000 |
टॅक्स लागू असणारी इन्कम | ₹11,00,000 |
सेक्शन 192 अंतर्गत, तुमच्या सॅलरीवर सध्याच्या स्लॅब रेट प्रमाणे टीडीएस ₹1,42,500 असेल.
4% एजुकेशन सेस आणि हायर एजुकेशन सेस जोडल्यानंतर तुम्हाला भरायला लागणारा निव्वळ टॅक्स ₹1,48,200, इतका असेल.
तर, तुमच्या सॅलरीवर टीडीएसचा सरासरी रेट ₹1,48,200/12,00,000*100 = 12.35%, इतका असेल.
सेक्शन 192 अंतर्गत, तुमच्या सॅलरीवर प्रत्येक महिना डिडक्ट केला जाणारा टीडीएस ₹1,00,000 च्या 12.35%, म्हणजे ₹12,350 इतका असेल.
टीडीएस एक्झ्म्पशनचे सिनारिओ
इन्कम टॅक्स अॅक्ट प्रमाणे खाली काही असे सिनारिओ दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला टीडीएस मध्ये एक्झ्म्पशन मिळू शकते.
- तुम्हाला जर सेक्शन 139 अंतर्गत आईटी रिटर्न भरायचा नसेल तर.
- जर तुम्ही त्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सेक्शन 15G/15H अंतर्गत एक डिक्लेरेशन दिले असेल आणि एम्प्लॉयरने संबंधित नियमानुसार ते व्हेरीफाय केलं आहे.
- जर तुम्ही मुख्यतः सेक्शन 194A च्या सबसेक्शन 3 अंतर्गत एक्झ्म्पटेड आहात.
- जर तुम्ही सेक्शन 197 अंतर्गत सर्टिफिकेट मिळवले असेल. या सर्टिफिकेट मध्ये त्याच्या व्हॅलिडिटी आणि अटींनुसार, एम्प्लॉयरला अशा सूचना दिलेल्या असतात की एक तर त्याने टॅक्स डिडक्ट करू नये किंवा कमी रेटने डिडक्ट करावा.
तुम्ही टीडीएस कसा वाचवू शकता?
वरती दिलेल्या परिस्थितींव्यतिरिक्त, इतर सर्व केसेस मध्ये इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 194A प्रमाणे टीडीएस लावला जाईल. तरी, टीडीएस मधून निर्माण होणारी तुमची टॅक्स लायबिलीटी कमी करण्यासाठी तुम्ही पुढील पर्याय निवडू शकता.
लीव्ह रेंट अलाउन्स
एक्झ्म्पशन क्लेम करण्याआधी प्रत्येक टॅक्स पेअरकडे ट्रॅव्हलअलाउन्स खर्च केला असायला हवा. त्यामुळे जर तुमच्या सॅलरी ब्रेक-अप मध्ये ट्रॅव्हलअलाउन्स नसेल तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉयर कडे तुमच्या सॅलरी ब्रेक-अप मध्ये हा ट्रॅव्हलअलाउन्स दाखवण्याची विनंती करू शकता.
मेडिक्लेम प्रीमियम
तुमच्या पैड प्रीमियमचा पुरावा म्हणून तुम्ही इन्शुरन्स फर्मकडून घेतलेले 80D टॅक्स सर्टिफिकेट सादर करू शकता. तुम्हाला बँक स्टेटमेंट, पासबूक आणि रुटीन हेल्थ चेकअपच्या रिसीट्स पुरावा म्हणून सादर करण्यास सांगितले जाऊ शकते.
हाउस रेंट अलाउन्स (एचआरए)
जर त्याच आर्थिक वर्षात भरलेले तुमचे एकूण रेंट ₹1,00,000 पेक्षा जास्त असेल तर हा अलाउन्स क्लेम करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरमालकाचे नाव, पत्ता आणि पीएएन सादर करू शकता. तुमच्या घरमालकाचे तुमच्याकडे जर पीएएन नसेल तर तुम्हाला त्यांच्याकडून फॉर्म 60 हे डिक्लेरेशन घ्यावे लागेल.
रेसिडेन्शियल लोन इंटरेस्ट
हे एक्झ्म्पशन क्लेम करण्यासाठी तुम्हाला लोन देणाऱ्याचे नाव, पत्ता आणि पीएएन आणि लोन अव्हेल होण्याची तारीख, हप्त्यांची रक्कम आणि इंटरेस्ट अशी सर्व माहिती असलेले बँक सर्टिफिकेट देखील सादर करावे लागेल.
फूड कुपन्स
इन्कम टॅक्स अॅक्ट प्रमाणे मील व्हाऊचर मधून ₹50 एक्झ्म्प्ट केले जातात. त्यामुळे 25 वर्किंग डेज असलेल्या महिन्यात तुम्हाला ₹2,500चे टॅक्स एक्झ्म्पशन मिळेल.
ट्युशन फीज
यासाठी तुम्हाला तुमच्या एजुकेशनल इन्स्टीट्यूटने सही शिक्का दिलेल्या ट्युशन फीज च्या रिसीट्सच्या कॉपीज सादर कराव्या लागतील.
डोनेशन्स
काही चॅरिटेबलइन्स्टीट्यूशन्सना किंवा ऑथोराईज्ड ट्रस्टना जर तुम्ही काही फंड्स दिले असतील तर संबंधित क्रेडेन्शियल्स सह तुमच्या डोनेशनच्या रिसीट्स तुम्ही सादर करू शकता.
नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस)
याठिकाणी तुम्हाला त्या वर्षाच्या तुमच्या डिपॉजिटची रिसीट आणि त्यासोबत संबंधित बँकेचे स्टेटमेंट सादर करावे लागेल.
सेक्शन 80C चे बेनिफिट्स
तुम्ही सेक्शन 80C मध्ये इन्व्हेस्ट करून सर्व रक्कम तुमच्या सॅलरी वरील टीडीएसची बचत करण्यासाठी वापरायला हवी. Yयासंदर्भात सांगायचे झाले तर पब्लिक प्रॉव्हीडंट फंड (पीपीएफ) हा एक उत्तम पर्याय आहे कारण यामध्ये तुम्हला साधारण ₹1,50,000चे रिबेट मिळू शकते.
टीडीएस पेमेंट उशिरा केल्यामुळे लागणारे इंटरेस्ट कसे कॅलक्युलट करतात?
टीडीएस पेमेंट उशिरा केल्यामुळे तुम्हाला सेक्शन 201(1A) अंतर्गत इंटरेस्ट भरावे लागते. टीडीएसचे पेमेंट उशिरा केल्यामुळे लागणारा इंटरेस्ट ड्यू डेट पासून प्रत्येक महिन्याला 1.5% या दराने कॅलक्युलेट केला जातो.
असा समजा की तुमचा पेएबल टीडीएस ₹5,000 आहे आणि ड्यू डेट 13 जानेवारी आहे आणि तुम्ही टीडीएस 17 मे ला भरला. तर, टीडीएस लेट पेमेंट कॅलक्युलेटर प्रमाणे तुम्हाला भरावे लागणारे इंटरेस्ट ₹5,000 x 1.5% दर माह x 5 महीने = ₹375 इतके असेल.
वरील सर्व मुद्दे टीडीएस कॅलक्युलेशन अचूक करता येण्यासाठी मदतगार ठरतील. आणखीन अचूक कॅलक्युलेशन साठी तुम्ही ऑनलाइन टीडीएस कॅलक्युलेटर देखील वापरू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आपल्या इक्न्म मधून किती डिडक्ट झालाय हे कसे जाणून घ्यायचे?
तमच्या इन्कम मधून डीडक्ट झालेल्या टॅक्सची रक्कम जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला फॉर्म 26AS देण्याची मागणी करू शकता किंवा त्याने डिडक्ट केलेल्या टॅक्सचे सर्टिफिकेट मागू शकता.
फॉर्म 26AS मध्ये जर टीडीएसचे क्रेडीट दिसत नसेल तर काय करायचे?
फॉर्म 26AS मध्ये जर टीडीएसचे क्रेडीट दिसत नसेल तर एम्प्लॉईने एम्प्लॉयरला समधानकारक करणे विचारण्यासाठी संपर्क करावा. तरी तुम्ही फॉर्म 26AS आणि मिळालेले सर्व फॉर्म 16 रीकन्सील करून बघू शकता.