डिजिट इन्शुरन्स करा

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टचे सेक्शन 80DDB

अलीकडील जागतिक आरोग्य सेवा संकटामुळे वाढत्या वैद्यकीय खर्चावर लक्षणीय बचत करण्यासाठी आरोग्यसेवा इन्शुरन्सवरील लोकांचे अवलंबन वाढले आहे. मात्र, नियमित हेल्थकेअर इन्शुरन्स प्रीमियम घेऊ शकत नसलेल्या व्यक्ती IT अ‍ॅक्टच्या सेक्शन 80DDB द्वारे त्यांच्या टॅक्स लायबिलिटीवर बचत करू शकतात. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या किंवा तुमच्यावर डिपेंडंट असलेल्या वैद्यकीय एक्सपेन्सवर 80DDB डिडक्शनचा लाभ घेऊ शकता.

भारी ना?

तुम्हाला आता इन्कम टॅक्समध्ये 80DDB म्हणजे काय हे माहित आहे. चला तर मग आता यातील पात्रता, क्लेम प्रोसेस आणि इतर घटकांबद्दल समजूया जेणेकरुन तुम्हाला अजून चांगले समजेल.

80DDB डिडक्शन: याचा लाभ कोण घेऊ शकेल?

सेक्शन 80DDB अंतर्गत टॅक्स फायद्यासाठी क्लेम करण्यासाठी पात्रतेसाठीचे निकष पहा -

  • केवळ व्यक्ती आणि हिंदू अनडिव्हाइडेड फॅमिली (HUF) सेक्शन 80DDB साठी पात्र आहेत. आणि
  • व्यक्ती किंवा HUF भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. अनिवासी व्यक्ती किंवा कॉर्पोरेट करदाते या सेक्शनअंतर्गत फायद्याचा क्लेम करू शकत नाहीत. आणि
  • पात्र होण्यासाठी, तुम्ही टॅक्सपेअर असणे आवश्यक आहे आणि तुमच्या डिपेंडंटना झालेल्या आजाराच्या उपचारांसाठी तुम्ही वैद्यकीय खर्च केले पाहिजे.

या संदर्भात, डिपेंडंट म्हणजे:

  • जर करदाता एक व्यक्ती असेल, तर डिपेंडंटमध्ये त्या व्यक्तीचा जोडीदार, मुले, भावंडे आणि पालक यांचा समावेश होतो.
  • जर करदाता HUF असेल, तर हिंदू अनडिव्हाइडेड फॅमिलीतील कोणत्याही सदस्याला डिपेंडंट मानले जाऊ शकते.

[स्रोत]

80DDB आजारांची यादी: आजाराचे नाव ज्यावर तुम्ही डिडक्शनचा क्लेम करू शकता

खाली नमूद केलेल्या इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 80DDB अंतर्गत आजाराची यादी पहा -

न्यूरोलॉजिकल आजार

ही डिडक्शन 40% आणि त्याहून अधिक न्यूरोलॉजिकल अपंगत्व असलेल्या रुग्णांना कव्हर करते. या आजारांचा समावेश आहे -

  • एटॅक्सिया
  • पार्किन्सन डिसीज
  • मोटर न्यूरॉन आजार
  • डिमेंशिया
  • हेमिबॅलिस्मस
  • कोरिया
  • डिस्टोनिया मस्क्युलरॉन डीफॉर्मन्स
  • अ‍ॅफेसिया

इतर आजारांचा समावेश होतो

  • गंभीर रिनल फेल्युअर
  • घातक कॅन्सर
  • थॅलेसेमिया
  • हिमोफिलिया
  • AIDS

[स्रोत]

सेक्शन 80DDB अंतर्गत डिडक्शनचा क्लेम कसा करावा?

80DDB अंतर्गत टॅक्स फायद्यासाठी क्लेम कसा करायचा यावर खालील पॉइंटर्स नोट करा:

80DDB डिडक्शनचा लाभ घेण्यापूर्वी विचार करण्यासारखे 3 घटक

तुम्ही टॅक्स डिडक्शनचा क्लेम करताना, प्रथम या पॉइंटर्सचा विचार करा:

  • एक पात्र टॅक्सपेअर म्हणून, तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्राची हार्ड कॉपी प्रदान करणे आवश्यक आहे. सरकारी दवाखान्यात किंवा सरकारने मान्यता दिलेल्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्या. प्रमाणपत्रात रुग्णाचे नाव आणि वय, आजाराचे स्वरूप आणि प्रमाणपत्र जारी करणार्‍या तज्ज्ञाचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर यांसारखे डिटेल्स असले पाहिजेत.
  • तुम्ही नमूद केलेल्या आजारासाठी पात्र वैद्यकीय उपचारावर खर्च केले आहे याची खात्री करा. या एक्सपेन्समध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना दिलेली फी, निदान चाचण्यांची कॉस्ट, औषधे आणि उपचारांशी थेट संबंधित इतर खर्च यांचा समावेश असू शकतो. केलेल्या एक्सपेन्सच्या योग्य नोंदी आणि पावत्या ठेवा.
  • तुम्ही डिपेंडंट कुटुंबातील सदस्यांसाठी डिडक्शनचा क्लेम करत असल्यास, ते इन्कम टॅक्स अ‍ॅक्टनुसार डिपेंडंट व्यक्तीच्या व्याख्येत येत असल्याची आधी खात्री करा.

तुमच्या 80DDB डिडक्शनचा क्लेम करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज

1. वैद्यकीय प्रमाणपत्र

टॅक्सपेअर म्हणून, तुमच्या टॅक्स रिटर्न फाइलिंगला तुम्हाला अधिकृत वैद्यकीय व्यावसायिकाने जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे सादर करणे आवश्यक आहे. हे वैद्यकीय उपचार किंवा केलेल्या उपचारांचा पुरावा म्हणून काम करते.

तुम्ही कोणाकडून ते मिळवू शकता हे जाणून घेण्यासाठी खालील टेबल पहा:

[1]

आजार प्रमाणपत्र
न्यूरोलॉजिकल आजार न्यूरोलॉजिस्टकडून एक प्रिस्क्रिप्शन (न्यूरोलॉजीमध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन किंवा इतर समतुल्य पदवी)
गंभीर रिनल फेल्युअर नेफ्रोलॉजिस्टकडून एक प्रिस्क्रिप्शन (नेफ्रोलॉजीमध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन किंवा इतर समतुल्य पदवी). अन्यथा, यूरोलॉजिस्टकडून एक प्रिस्क्रिप्शन (मास्टर ऑफ सर्जरी किंवा इतर समतुल्य पदवी)
घातक कॅन्सर ऑन्कोलॉजिस्टकडून एक प्रिस्क्रिप्शन (ऑन्कोलॉजीमध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन किंवा इतर समतुल्य पदवी)
हीमेटोलॉजिकल डिसऑर्डर्स (थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया) तज्ज्ञांकडून एक प्रिस्क्रिप्शन (हेमॅटोलॉजीमधील डॉक्टरेट ऑफ मेडिसिन पदवी किंवा इतर समतुल्य पदवी)
AIDS डॉक्टरांकडून एक प्रिस्क्रिप्शन (जनरल किंवा इंटर्नल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा इतर समतुल्य पदवी)

नोट: मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने वर नमूद केलेल्या वैद्यकीय पदव्या ओळखल्या पाहिजेत.

तसेच, 2 गोष्टी लक्षात ठेवा:

  • खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेली व्यक्ती

या केसमध्ये, तो/ती त्याच हॉस्पिटलमधून प्रमाणपत्र कलेक्ट करू शकतो. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे त्याला सरकारी रुग्णालयातून ते कलेक्ट करावे लागणार नाही.

  • शासकीय रुग्णालयातून उपचार घेत असलेली व्यक्ती

त्याने/तिने पूर्णवेळ कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र कलेक्ट केले पाहिजेत.

2. सेल्फ डिक्लरेशनचे दस्तऐवज

तुम्ही सेल्फ डिक्लरेशनचे प्रमाणपत्र प्रदर्शित करणे आवश्यक आहे. हे तुम्ही केलेल्या वैद्यकीय खर्चाचा पुरावा म्हणून काम करते. म्हणून, या दस्तऐवजात अपंग डिपेंडंटचे प्रशिक्षण आणि पुनर्वसन यासह सर्व वैद्यकीय खर्च समाविष्ट करणे आवश्यक आहे.

3. 80DDB फॉर्म

नवीन नियमानुसार, तुम्हाला प्रिस्क्रिप्शन आणि फॉर्म 10-1 सबमिट करण्याची गरज नाही. परंतु एखाद्या डिपेंडंट व्यक्तीला ऑटिझम आणि सेरेब्रल पाल्सी सारख्या अपंगत्वाचा त्रास होत असेल तर अश्या केसमध्ये हे गरजेचे आहे.

[स्रोत]

80DDB साठी फॉर्म कसा भरायचा?

80DDB फॉर्म भरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • स्टेप 1 : रुग्णाचे नाव, पत्ता, वडिलांचे नाव भरा.
  • स्टेप 2 : नाव आणि व्यक्तीचा पत्ता आणि ती व्यक्ती ज्याच्यावर अवलंबून आहे त्याच्याशी असलेले नाते लिहा.
  • स्टेप 3 : आजाराचे नाव नमूद करा. तसेच, अपंगत्वाची व्याप्ती नमूद करा (उदाहरणार्थ, 40% किंवा अधिक).
  • स्टेप 4 : वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचे नाव, पत्ता, रजिस्ट्रेशन आणि पात्रता भरा. हॉस्पिटलचे नाव आणि पत्ता नमूद करा.
  • स्टेप 5 : "वेरीफिकेशन" सेक्शन भरा. तसेच, फॉर्मवर तुमची आणि सरकारी रुग्णालयाच्या प्रमुखाची रीतसर साइन असावी. त्याने/तिने जनरल किंवा इंटर्नल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

80DDB डिडक्शन लिमिट: तुम्हाला काय लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे

 

80DDB अंतर्गत डिडक्शन पूर्णपणे तुम्ही ज्याच्यावर वैद्यकीय खर्च केले आहे त्याच्या वयावर आधारित आहे. चला तर मग वयासंबंधित कॅटेगरी बघूयात:

कॅटेगरी वयाचे वर्णन
सीनियर्स ज्येष्ठ म्हणून कॅटेगराइझ केलेल्या व्यक्ती भारतीय निवासी आहेत आणि दिलेल्या वर्षात 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहेत.
सुपर सीनियर्स सुपर सिनियर्स हे भारतीय निवासी आहेत ज्यांचे वय दिलेल्या वर्षात 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

टॅक्स डिडक्शनची सर्वाधिक मर्यादा ही वास्तविक सशुल्क वैद्यकीय कॉस्ट किंवा ₹40,000 यापैकी जे आधी येईल ऐवढी आहे. हे लक्षात घेता, डिडक्शनची अमाऊंट खालीलप्रमाणे आहे:

वय 80DDB डिडक्शन अमाऊंट
60 वर्षांपेक्षा कमी ₹40,000 किंवा वास्तविक वैद्यकीय कॉस्ट, यापैकी जे कमी असेल
60 वर्षे किंवा त्याहून अधिक ₹1,00,000 किंवा वास्तविक वैद्यकीय कॉस्ट, जे कमी असेल
80 वर्षे किंवा त्याहून अधिक ₹1,00,000 किंवा वास्तविक वैद्यकीय कॉस्ट, जी असेल ती

 एम्प्लॉयर किंवा इनशूरर कंपनीद्वारे अमाऊंट रीएमबर्स कमी करा

उदाहरण: तुमचा एम्प्लॉयर किंवा इन्शुरन्स कंपनी वैद्यकीय कॉस्टची परतफेड करत असल्यास, ते क्रेडिट 80DDB डिडक्शनमध्ये समायोजित केले जाते. उदाहरणार्थ, तुम्हाला ₹60,000 किमतीची वैद्यकीय कॉस्ट आली असल्यास, तुम्ही ₹40,000 च्या टॅक्स सूटचा क्लेम करू शकता. परंतु, समजा तुमचा इनशूरर नमूद आजारासाठी ₹30,000 वैद्यकीय कॉस्ट रीएमबर्स करतो. त्यानंतर, तुम्ही सेक्शन 80DDB इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट अंतर्गत फक्त ₹10,000 च्या डिडक्शनचा क्लेम करू शकता.

लक्षात ठेवा, जर रीएमबर्समेंट ₹40,000 च्या परवानगीयोग्य अमाऊंटपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही टॅक्स डिडक्शनचा लाभ घेऊ शकत नाही. मात्र, डिपेंडंट ज्येष्ठ नागरिक असल्यास, तुम्ही ₹1,00,000 ची टॅक्स सूट घेऊ शकता.

[स्रोत]

थोडक्यात

सध्याच्या आरोग्यसेवा संकटामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी टॅक्स फायदे वाढवण्याचा सरकारचा प्लॅन आहे. त्यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय 80DDB डिडक्शनचा लाभ घेण्यासाठी हे वरील पॉइंटर्स लक्षात ठेवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

80DDB अंतर्गत डिडक्शन 80DD पेक्षा वेगळे कसे आहे?

80DD मध्ये, तुम्ही अपंग डिपेंडंटवर होणाऱ्या वैद्यकीय उपचारांवर टॅक्स डिडक्शनचा लाभ घेऊ शकता. तर, 80DDB स्वत:च्या किंवा डिपेंडंटच्या वैद्यकीय उपचारांवरील वैद्यकीय एक्सपेन्सवर टॅक्स फायदे सुनिश्चित करते.

पॅरालिसीस 80DDB डिडक्शन अंतर्गत कव्हर आहे का?

पॅरालिसीस हा न्यूरोलॉजिकल आजाराच्या अंतर्गत येत असल्याने, तो 80DDB सूचीमध्ये कव्हर आहे.

एकाच वेळी 80D आणि 80DDB दोन्ही डिडक्शनसाठी क्लेम करता येऊ शकतो का?

होय, तुम्ही एकाच वेळी 80D आणि 80DDB चा क्लेम करू शकता. परंतु नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करण्याचे सुनिश्चित करा.

[स्रोत 1]

[स्रोत 2]