इन्कम टॅक्स ऍक्टचे सेक्शन 154: वैशिष्ट्ये आणि रेक्टीफिकेशन प्रोसेस
टॅक्सपेअर्स इन्कम टॅक्स रिटर्न फाइलिंग करताना चुका करू शकतात. असेसमेंट करताना संबंधित अधिकारी रेकॉर्डस मधून अशा चुका अधोरेखित करतात. इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 154 अन्वये टॅक्सपेअर या त्रुटी दुरुस्त करू शकतात.
काय आहे इन्कम टॅक्स ऍक्टचे सेक्शन 154?
काही वेळा असेसिंग अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशात चूक होऊ शकते. अशा परिस्थितीत रेकॉर्डवरून स्पष्ट झालेल्या चुका सेक्शन 154 अन्वये दुरुस्त करता येतील. सेक्शन 154 अन्वये चुका सुधारण्यासंदर्भातील तरतुदींची चर्चा या आर्टिकलमध्ये करण्यात आली आहे.
इन्कम टॅक्सच्या सेक्शन 154 ची वैशिष्ट्ये काय आहेत?
या सेक्शन मधील काही प्राथमिक मुद्दे खाली दिले आहेत.
- विसंगती टाळण्यासाठी चुकीच्या माहितीसंदर्भात आदेश काढणे आयटी विभागाला बंधनकारक आहे.
- असेसीझची टॅक्सची रक्कम वाढविणे किंवा कमी सूट देणारी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आयटी विभागाने रजिस्टर्ड आयडी किंवा रजिस्टर्ड निवासी पत्त्यावर पत्रावर ईमेल पाठविणे मॅनडेटरी आहे.
- टॅक्स पेएबलची किंवा सूटच्या रकमेत डीडक्शन्स करण्यासंदर्भात सेक्शन 154 अन्वये केलेल्या कोणत्याही कारवाईबद्दल टॅक्सपेअर्सना सूचित करणे आयटी विभाग जबाबदार आहे. याशिवाय आयटी विभागाने टॅक्सपेअर्सना अशा त्रुटींचे वर्णन करण्याची मुभा द्यावी.
- टॅक्सपेअर्सच्या खात्यात जादा रक्कम जमा झाल्यास ती सेक्शन 154 अन्वये समजली जाऊ शकते.
- टॅक्सपेअर्सनी अतिरिक्त रिफंड आयटी विभागाला परत करावा.
- टॅक्सपेअर्सनी केलेल्या अर्जांचा निपटारा आयटी विभागाने ज्या महिन्यात अर्ज प्राप्त झाला त्या महिन्याच्या अखेरीपासून 6 महिन्यांच्या आत करणे आवश्यक आहे.
- सेक्शन 154 अन्वये रेक्टीफिकेशनची मुदत ज्या आर्थिक वर्षात आदेश देण्यात आली आहे, त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून 4 वर्षांपर्यंत आहे.
- आयटी कामिशनरनी आदेश दिलेल्या केसमध्ये, त्यांना 2 प्रकारे त्रुटी दुरुस्त करण्याची अथॉरिटी आहे-
- स्वत:च्या मोशनवर
- टॅक्सपेअर्सनी केलेला अर्ज असे असले तरी इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 154 अन्वये टॅक्सपेअर दुरुस्त करू शकणाऱ्या त्रुटींची यादी लिमिटेड आहे.
इन्कम टॅक्सच्या सेक्शन 154 अन्वये रेकटिफिकेशन फाइल करण्यास कोण पात्र आहे?
इन्कम टॅक्सच्या सेक्शन 154 अन्वये रेक्टीफिकेशन फाइल करण्यास कोण पात्र आहे?
सीपीसी कडून सेक्शन 143 (1) अन्वये आदेश किंवा नोटीस प्राप्त झाल्यानंतर, खालील पक्ष ई-फाइलिंग पोर्टलवर रेक्टीफिकेशन विनंती फाइल करू शकतात.
- रजिस्टर्ड टॅक्सपेअर्स
- ईआरआय (फक्त ज्यांनी क्लायंट पॅन समाविष्ट केले आहे)
- अथॉराइज्ड प्रतिनिधी आणि स्वाक्षरी करणारे
याव्यतिरिक्त, इन्कम टॅक्स अथॉरिटी केवळ खालील त्रुटींवर रेक्टीफिकेशनची परवानगी देतात.
- चुकीचे माहिती
- चुकीचे तथ्य
- अंकगणितीय त्रुटी
- टॅक्स मध्ये तफावत
- टॅक्स क्रेडिटमध्ये विरोधाभास
- चुकीचे लिंग स्पेसीफाय
- किरकोळ लिपिकीय चुका
- कायद्यामधील सक्तीच्या तरतुदींकडे दुर्लक्ष
- कॅपिटल गेन्ससाठी अतिरिक्त दाखले सादर न करणे
यापैकी कोणतीही त्रुटी आढळल्यास इन्कम टॅक्स विभाग संबंधित टॅक्सपेअर्सना सूचित करेल.
सेक्शन 154 अन्वये रेक्टीफिकेशन ऑनलाइन कसे फाइल करावे?
रिटर्न्सचे मूल्यमापन केल्यानंतर इन्कम टॅक्स विभाग संबंधित टॅक्सपेअर्सना स्वत: तयार केलेले रेक्टीफिकेशन आदेश किंवा नोटिसा बजावतो.
खालील विभाग सेक्शन 154 अंतर्गत रेक्टीफिकेशन ऑनलाइन कशी दाखल करावी हे शोधत असलेल्या व्यक्तींना कॉम्प्रिहेन्सिव्ह अंतर्दृष्टी प्रदान करते.
- स्टेप 1: इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- स्टेप 2: लॉग इन करा किंवा रजिस्ट्रेशनसाठी साइन अप करा.
- स्टेप 3:'माय अकाउंट' वर नेव्हिगेट करा आणि 'रिक्वेस्ट फॉर इन्टीमेशन u/s 143(1)/154’ वर क्लिक करा.
नोट: एक छोटा डायलॉग बॉक्स दिसेल जिथे तुम्हाला पॅन नंबर टाकावा लागेल.
- स्टेप 4: संबंधित मूल्यांकन वर्ष निवडा आणि रेक्टीफिकेशन दाखल करण्यासाठी सीपीसी कम्युनिकेशन नंबर द्या आणि 'कंटिन्यू' वर क्लिक करा.
- स्टेप 5: 'रिटर्न डेटा करेक्शन', 'टॅक्स क्रेडिट मिसमॅच अँड टॅक्स ऑर इंटरेस्ट कॉम्प्युटेशन' आणि 'ओनली रिप्रोसेस दी रिटर्न' या तीन विनंती प्रकारांपैकी जे लागू असेल ते निवडा.
- स्टेप 6: 'रिटर्न डेटा करेक्शन' निवडल्यानंतर रेक्टीफिकेशनची 4 कारणे निवडा, रिटर्नमध्ये रेक्टीफाय करावयाच्या वेळापत्रकांचा समावेश करा आणि एक्सएमएल अपलोड करा.
नोट: 'ओनली रिप्रोसेस दी रिटर्न' निवडल्यानंतर टॅक्सपेअर्सना त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड करण्याची गरज नाही.
- स्टेप 7: फॉर्म 26 AS मधील टीडीएस डिटेल्स तपासा, आपले सर्व इनपुट पुन्हा तपासा आणि 'सबमिट' वर क्लिक करा
टॅक्सपेअर्सनी अर्ज प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आयटी विभाग संदर्भ क्रमांक तयार करेल. पुढील प्रोसेससाठी हा क्रमांक सीपीसी बंगळुरू येथे पाठविण्यात येणार आहे.
रेक्टीफिकेशनचा अर्ज करण्यासाठी करावयाची प्रोसीजर
कोणताही रेक्टीफिकेशन अर्ज करण्यापूर्वी टॅक्सपेअरने खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
- टॅक्सपेअरने ज्या आदेशाविरुद्ध रेक्टीफिकेशनसाठी अर्ज दाखल करायचा आहे, त्याचा बारकाईने अभ्यास करावा.
- अनेवेळा टॅक्सपेअरला असे वाटू शकते की इन्कम टॅक्स विभागाने दिलेल्या आदेशात काही चूक आहे परंतु प्रत्यक्षात टॅक्सपेअरची कॅलक्युलेशन्स चुकीची असू शकतात आणि सीपीसी ने त्या चुका सुधारल्या असाव्यात. उदा., टॅक्सपेअरने इन्कमच्या रिटर्न मध्ये चुकीचे इंटरेस्ट मोजले असावे आणि त्या सूचनेत इंटरेस्टची योग्य मोजणी झाली असावी.
- त्यामुळे, वरील प्रकरणांमध्ये रेक्टीफिकेशनचा वापर टाळण्यासाठी टॅक्सपेअरने आदेशाचा अभ्यास करावा आणि सूचनेत चूक असल्यास त्याची खातरजमा करावी.
- आदेशात काही त्रुटी आढळल्यास च सेक्शन 154 अन्वये रेक्टीफिकेशनसाठी अर्ज करावा.
- शिवाय चूक ही रेकॉर्डवरून स्पष्ट होणारी आहे आणि ती चूक नाही ज्यासाठी वादविवाद, डिटेल्स, तपास इत्यादींची आवश्यकता आहे, याची खातरजमा करावी. आदेशात काही त्रुटी आढळल्यास सेक्शन 154 अन्वये रेक्टीफिकेशनसाठी अर्ज करावा. रेक्टीफिकेशनसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी टॅक्सपेअरने अधिकृत वेबसाइटवर विहित केलेल्या रेक्टीफिकेशन प्रोसीजरचा संदर्भ घ्यावा.
- सेक्शन 200A(1)/206CB अन्वये माहिती च्या रेक्टीफिकेशनसाठी ऑनलाइन रेक्टीफिकेशन रिटर्न फाइल करावे लागेल; त्याची प्रोसीजर वेबसाइटवर देण्यात आली आहे.
- मूल्यांकन वाढविणे किंवा रिफंड कमी करणे किंवा अन्यथा टॅक्सपेअरची (किंवा डीडक्टरची) लायबिलिटी वाढविण्याचा परिणाम करणारी सुधारणा किंवा रेक्टीफिकेशन जोपर्यंत संबंधित अथॉरिटीने टॅक्सपेअरला किंवा डीडक्टरला तसे करण्याच्या हेतूची नोटीस दिली नाही आणि टॅक्सपेअरला (किंवा डीडक्टरला) सुनावणीची वाजवी संधी दिली नाही तो पर्यन्त करू नये.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी इन्कम टॅक्स रेक्टीफिकेशन आदेशाविरोधात अपील दाखल करू शकतो का?
होय, सीपीसी ने जारी केलेल्या सूचना आदेशाविरोधात आपण थेट सीआयटी (A) कडे अपील दाखल करू शकता.
मी पे केल्यानंतर सीपीसी ने केलेली मागणी रद्द करण्यासाठी मला रेक्टीफिकेशन फाइल करावा लागेल का?
नाही, पेमेंट केल्यावर मागणी आपोआप अॅडजस्ट होईल.
रेक्टीफिकेशनची विनंती दाखल करताना कोणता क्रमांक आवश्यक आहे?
रेक्टीफिकेशनची विनंती दाखल करताना ताज्या इन्कम टॅक्स रिटर्न्सचे सीपीसी आदेश क्र. किंवा सूचना क्र. किंवा डीआयएन इसेंशियल आहे.