महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब
महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल सर्व काही
भारतातील इन्कम टॅक्स पद्धती एक प्रगत पद्धती म्हणता येईल. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही इंडीव्हीजुअलच्या इन्कम टॅक्स रेट मध्ये होणारी वाढ तो महिला आहे की पुरुष यावर अवलंबून नसून त्याच्या इन्कम मधील चढ-उतारांवर अवलंबून असते.
हे समजायला खूप गुंतागुंतीचं वाटतंय का?
तर अगदीच सोप्या शब्दात सांगायचा झालं तर एखाद्या व्यक्तीची इन्कम वाढली की त्याची टॅक्स लायबिलिटी देखील वाढते. त्यांच्या इन्कम बरोबरच त्यांचे वय देखील विचारात घेतले जाते.
टॅक्सेशनच्या उद्देशाने टॅक्सपेअर्सचे तीन मुख्य समूह केले आहेत:
- 60 वर्षापेक्षा कमी वयाचे व्यक्ती
- 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती (सिनिअर सिटीझन)
- 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे व्यक्ती
पूर्वी, मूळ टॅक्स एक्झ्म्पशन लिमिट्स महिला आणि पुरुष टॅक्सपेअर्ससाठी वेगवेगळ्या होत्या. महिलांना त्यांच्या इन्कमवर टॅक्स भरतेवेळी अधिकाधिक एक्झ्म्पशन लिमिटचा लाभ घेता आला.
तरी, 2012-13 पासून हे मूळ टॅक्स एक्झ्म्पशन लिमिट्स काढून टाकण्यात आल्या होत्या आणि महिला आणि पुरुष या दोघांसाठी त्यांच्या इन्कमआणि वयाप्रमाणे एकसारखेच टॅक्स स्लॅब लागू करण्यात आले होते.
महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स खाली विस्तृतपणे दिलेले आहेत - 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला, सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझन.
महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल विस्तृत माहिती
एखाद्या व्यक्तीच्या इन्कम आणि वयानुसार त्याला लागू होणारे टॅक्स रेट्स म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅब्स आता वर्गीकरण प्रक्रिया एकच असली तरी प्रत्येक युनिअन बजेट दरम्यान स्लॅब्स बदलू शकतात. ज्या बजेट मध्ये कोणतेही बदल स्पष्ट केलेले नसतात त्या बजेट मध्ये टॅक्स रेट्स मागच्या आर्थिक वर्षाप्रमाणेच राहतात.
महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स (60 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला)
नवीन रिजिम प्रमाणे महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब - एफवाय 2023-24
युनिअन बजेट 2023 मध्ये नवीन टॅक्स रिजिमलाच डीफॉल्ट रिजिम बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला एफवाय 2023-24 साठीचे सुधारित इन्कम टॅक्स रेट्स खालीलप्रमाणे आहेत:
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
रु.3,00,001 ते रु.6,00,000 दरम्यान | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
रु. 6,00,001 ते रु.9,00,000 दरम्यान | ₹ 15,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹6,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 10% |
रु.9,00,001 ते रु.12,00,000 दरम्यान | ₹ 45,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 9,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 15% |
रु.12,00,001 ते रु. 15,00,000 दरम्यान | ₹ 90,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 12,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹ 1,50,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹15,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
नवीन रिजिम प्रमाणे महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब - एफवाय 2022-23
मागचे आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 मार्च 2023 पर्यंत लागू असलेले टॅक्स रेट्स खालीलप्रमाणे आहेत. 31, जुलै 2023 पर्यंत रिटर्न्स फाईल करताना महिला टॅक्सपेअर्सनी जर नवीन टॅक्स रिजिमचा पर्याय निवडला असेल तर खालील रेट्स वचारात घ्यावेत.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹2,50,000 पर्यंत | शून्य |
₹2,50,000 ते ₹5,00,000 दरम्यान | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
₹5,00,000 ते ₹10,00,000 दरम्यान | ₹ 12,500 + आपल्या एकूण इन्कमच्या 10% जे ₹ 5,00,000 पेक्षा जास्त आहे |
₹7,50,000 ते ₹10,00,000 दरम्यान | ₹37,500 + आपल्या एकूण इन्कमच्या 15% जे ₹ 7,50,000 पेक्षा जास्त आहे |
₹10,00,000 ते ₹12,50,000 दरम्यान | ₹75,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 20% जे ₹ 10,00,000 पेक्षा जास्त आहे |
₹12,50,000 ते ₹15,00,000 दरम्यान | ₹1,25,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 25% जे ₹ 12,50,000 पेक्षा जास्त आहे |
₹15,00,000 पेक्षा जास्ती | ₹ 1,87,500 + आपल्या एकूण इन्कमच्या 30% जे ₹ 15,00,000 पेक्षा जास्त आहे |
जुन्या रिजिमप्रमाणे महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2022-23 आणि एफवाय 2023-24
जुन्या टॅक्स रिजिमप्रमाणे 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांसाठी एफवाय 2022-23 आणि एफ वाय 2023-24 या दोन्ही वर्षांसाठी टॅक्स स्लॅब्स एकच आहेत, जे खालील प्रमाणे आहेत:
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹2,50,000 पर्यंत | शून्य |
₹2,50,000 ते ₹5,00,000 दरम्यान | आपल्या एकूण इन्कमच्या 5% जे ₹ 2,50,000 पेक्षा जास्त आहे |
₹5,00,000 ते ₹10,00,000 दरम्यान | ₹12,500 + आपल्या एकूण इन्कमच्या 20% जे ₹ 5,00,000 पेक्षा जास्त आहे |
₹10,00,000 पेक्षा जास्त | ₹1,12,500 + आपल्या एकूण इन्कमच्या 30% जे ₹ 10,00,000 पेक्षा जास्त आहे |
कॅलक्युलेट केलेल्या टॅक्स अमाऊंटवर अतिरिक्त 4% चा हेल्थ आणि एजुकेशन सेस लागू केला आहे.
सीनियर सिटीजन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब
नवीन रिजिम मध्ये सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2023-24
युनिअन बजेट 2023 प्रमाणे 60 वर्षापेक्षा जास्त वय पण 80 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांना ज्यांनी नवीन टॅक्स रिजिम हा पर्याय निवडला आहे, त्यांना खालील टॅक्स स्लॅब्स लागू होईल.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
रु.3,00,001 ते रु.6,00,000 दरम्यान | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
रु. 6,00,001 ते रु.9,00,000 दरम्यान | ₹ 15,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹6,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 10% |
रु.9,00,001 ते रु.12,00,000 दरम्यान | ₹ 45,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 9,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 15% |
रु.12,00,001 ते रु. 15,00,000 दरम्यान | ₹ 90,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 12,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹ 1,50,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹15,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
नवीन रिजिम प्रमाणे सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2023-24
एफवाय 2022-23 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना ज्या सिनिअर सिटीझन महिलांनी नवीन टॅक्स रिजिम हा पर्याय निवडला आहे त्यांनी खालीलप्रमाणे टॅक्स रेट्स विचारात घ्यावे:
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹2,50,000 पर्यंत | शून्य |
₹2,50,001 ते ₹5,00,000 पर्यंत | ₹2,50,000 रुपयांपेक्षा जास्त वर 5% |
₹5,00,001 ते ₹7,50,000 पर्यंत | ₹ 12,500 + ₹ 5,00,000 पेक्षा जास्त वर 10% |
₹7,50,001 ते ₹10,00,000 पर्यंत | ₹37,500 + ₹ 7,50,000 पेक्षा जास्त वर 15% |
₹10,00,001 ते ₹12,50,000 पर्यंत | ₹75,000 + ₹ 10,00,000 पेक्षा जास्त वर 20% |
₹12,50,001ते ₹15,00,000 पर्यंत | ₹1,25,000 + ₹ 12,50,000 पेक्षा जास्त वर 25% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹1,87,500 + ₹15,00,000 पेक्षा जास्त वर 30% |
जुन्या रिजिम मध्ये सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2022-23 आणि एफवाय 2023-24
60 वर्षाच्या पण 80 वर्षापेक्षा कमी वयाच्या ज्या महिलांनी जुने टॅक्स रिजिम हा पर्याय निवडला आहे त्यांनी खालीलप्रमाणे टॅक्स रेट्स प्रमाणे टॅक्स भरावा: 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांसाठी टॅक्स रेट्स समान आहेत.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
₹3,00,001 ते ₹5,00,000 | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
₹5,00,001 ते ₹ 10,00,000 | ₹10,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 20% जे ₹ 5,00,000 पेक्षा जास्त आहे |
₹10,00,000 पेक्षा जास्त | ₹1,10,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 30% जे ₹ 10,00,000 पेक्षा जास्त आहे |
सिनिअर सिटीझन्सना देखील त्यांच्या कॅलक्युलेटेड टॅक्स अमाउंटवर 4% चा अतिरिक्त हेल्थ आणि एजुकेशन सेस लागू होईल.
सुपर सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स
नवीन टॅक्स रिजिम मध्ये सुपर सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2023-24
80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला 1 एप्रिल, 2023 पासून लागू झालेल्या नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे खाली दिलेल्या रेट्सने टॅक्स भरण्यास जबाबदार आहेत.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
रु.3,00,001 ते रु.6,00,000 दरम्यान | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
रु. 6,00,001 ते रु.9,00,000 दरम्यान | ₹ 15,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹6,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 10% |
रु.9,00,001 ते रु.12,00,000 दरम्यान | ₹ 45,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 9,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 15% |
रु.12,00,001 ते रु. 15,00,000 दरम्यान | ₹ 90,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 12,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹ 1,50,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹15,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे सुपर सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2022-23
सुपर सिनिअर सिटीझन महिला ज्यांनी नवीन टॅक्स रिजिम हा पर्याय निवडला आहे त्यांनी एफवाय 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना खालील रेट्स प्रमाणे टॅक्स भरावा.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹2,50,000 पर्यंत | शून्य |
₹2,50,001 ते ₹5,00,000 पर्यंत | ₹2,50,000 रुपयांपेक्षा जास्त वर 5% |
₹5,00,001 ते ₹7,50,000 पर्यंत | ₹ 12,500 + ₹ 5,00,000 पेक्षा जास्त वर 10% |
₹7,50,001 ते ₹10,00,000 पर्यंत | ₹37,500 + ₹ 7,50,000 पेक्षा जास्त वर 15% |
₹10,00,001 ते ₹12,50,000 पर्यंत | ₹75,000 + ₹ 10,00,000 पेक्षा जास्त वर 20% |
₹12,50,001ते ₹15,00,000 पर्यंत | ₹1,25,000 + ₹ 12,50,000 पेक्षा जास्त वर 25% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹1,87,500 + ₹15,00,000 पेक्षा जास्त वर 30% |
जुन्या टॅक्स रिजिम मध्ये सुपर सिनिअर सिटीझन महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब्स - एफवाय 2022-23 आणि एफवाय 2023-24
80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे दोन्ही, मागील आणि चालू आर्थिक वर्षासाठी खाली दिलेल्या टॅक्स रेट्स प्रमाणे टॅक्स भरावा:
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹5,00,000 पर्यन्त | शून्य |
₹5,00,001 ते ₹ 10,00,000 | आपल्या एकूण इन्कमच्या, जी रु. 5,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
रु.10,00,001 पेक्षा जास्त | आपल्या एकूण इन्कमच्या जी रु.10,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
कॅलक्युलेट केलेल्या टॅक्स अमाऊंटवर अतिरिक्त 4% चा हेल्थ आणि एजुकेशन सेस लागू केला आहे.
अतिरिक्त सरचार्ज
50 लाखापेक्षा जास्त वार्षिक इन्कम असलेल्या महिलांना देखील सरचार्ज आकारण्यात येईल. 1 एप्रिल 2023 पासून लागू झालेला सरचार्ज खालीलप्रमाणे आहे:
टॅक्सेबल इन्कम | इन्कम टॅक्सवर सरचार्ज रेट |
---|---|
ज्यांचे इन्कम रु.50 लाखांपेक्षा जास्त पण रु.1 कोटींपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी | 10% |
ज्यांचे इन्कम रु.1 कोटींपेक्षा जास्त पण रु.2 कोटींपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी | 15% |
रु.2 कोटींपेक्षा जास्त इन्कम असणाऱ्यांसाठी | 25% |
2023 चे फायनान्स बिल येण्याआधी 5 करोडपेक्षा अधिक इन्कमवर 37% चा सर्वाधिक सरचार्ज आकारण्यात येत होता. तरी, वरील तक्त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे 1, एप्रिल 2023 पासून हा सरचार्ज 25% पर्यंत कमी करण्यात आला होता.
टॅक्सेबल इन्कम कॅलक्युलेशन कसे केले जाते?
भारतातील इन्कम टॅक्स विभागाने पाच शिर्षके निश्चित केली असून त्याअंतर्गत टॅक्सेबल इन्कमचे कॅलक्युलेशन केले जाते. हे आहेत:
- सॅलरीपासून इन्कम
- हाऊस प्रॉपर्टी इन्कम
- बिझनेस किंवा व्यवसाय मधून इन्कम
- कॅपिटल गेन्समधून इन्कम.
- इतर कोणत्याही मार्गे मिळालेले इन्कम ज्यामध्ये फिक्स्ड डिपॉजिट, सेव्हिंग्स अकाउंट यावरील इंटरेस्टचा समावेश होतो.
आता तुम्हाला काळजी वाटत असेल की तुमच्या टॅक्स लायबिलिटी वाढतच चालल्या आहेत, तर काळजी करू नका!
इन्कम टॅक्स अॅक्टने महिलांसाठी आणि इतर टॅक्स पेअर्ससाठी काही ठराविक इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन्स लागू केले आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या इन्कम मधील काही भागाची बचत करता येऊ शकते. ही एक्झ्म्पशन्स लागून करण्याचे प्रमुख्याचे कारण म्हणजे भारतीयांना बचतीची सवय लावणे होय.
आता आपण इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 द्वारा कोणकोणते इन्कम टॅक्स रिबेट आणि एक्झ्म्पशन्स लागू केलेले आहेत ते बघूया.
याबद्दल अधिक जाणून घ्या:
महिलांसाठी इन्कम टॅक्स रिबेट
युनिअन बजेट 2023 मध्ये इंडीव्हीजुअल टॅक्सपेअर आणि महिलांसाठी इन्कम टॅक्स अॅक्ट 1961च्या सेक्शन 87A खालील नवीन टॅक्स रिजिम अंतर्गत काही टॅक्स रीलीफ्स घोषित केले आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील महिलांसाठी मगील आणि चालू वर्षासाठीचे टॅक्स रिबेट खालीलप्रमाणे आहेत.
वय | नवीन रिजिम प्रमाणे इन्कम टॅक्स रिबेट | जुन्या रिजिम प्रमाणे इन्कम टॅक्स रिबेट | |
आर्थिक वर्ष 2022-23 | आर्थिक वर्ष 2023-24 | आर्थिक वर्ष 022-23 आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकसारखेच | |
60 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती | ₹5 लाखापर्यंतचे इन्कम (कॅलक्युलेटेड टॅक्सवर ₹12,500 पर्यंत) | ₹7 लाखापर्यंतचे इन्कम (कॅलक्युलेटेड टॅक्सवर ₹25,000 पर्यंत) | ₹5 लाखापर्यंतचे इन्कम (कॅलक्युलेटेड टॅक्सवर ₹12,500 पर्यंत) |
60 ते 80 वर्ष वायोगातील व्यक्ती | ₹2.5 लाखापर्यंतचे इन्कम | ₹3 लाखापर्यंतचे इन्कम | ₹3 लाखापर्यंतचे इन्कम |
80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती | ₹2.5 लाखापर्यंतचे इन्कम | ₹3 लाखापर्यंतचे इन्कम | ₹5 लाखापर्यंतचे इन्कम |
बजेट 2023 प्रमाणे नवीन टॅक्स रिजिम अंतर्गत महिलांसाठी दिलेले इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन्स
कॅटेगरी | एक्झ्म्पशन |
सॅलरीड महिलांसाठी | 'इन्कम फ्रॉम सॅलरी' या हेड खाली केवळ त्यांच्या इन्कम वर ₹ 50,000 पर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन |
सेक्शन 80CCD(2) | कोणत्याही महिलेच्या एनपीएस अकाउंट मध्ये, एम्प्लॉयर द्वारा करण्यात आलेल्या एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) कॉन्ट्रीब्युशन वरचे एक्झ्म्पशन तरी, एम्प्लॉईच्या स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनवरती कोणतेही टॅक्स डीडक्शन लागू नाही. |
प्राईव्हेट सेक्टर एम्प्लॉइंसाठी हे त्यांच्या सॅलरीच्या 10% तर गव्हर्मेंट एम्प्लॉइंसाठी हे त्यांच्या सॅलरीच्या 14% आहे. | |
अग्निवीर कॉरपस फंड (80CCH अंतर्गत) | अग्निवीर कॉरपस फंड तसेच अग्निवीर सेवा निधी अकाउंट मध्ये अग्निवीर किंवा केंद्र सरकार द्वारा केलेल्या कॉन्ट्रीब्युशनचा देखील समावेश . |
सेक्शन 80JJAA | 30% पर्यंत अतिरिक्त एम्प्लॉइ कॉस्ट |
महिलांसाठी सध्याचे नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन्स - एफवाय 2022-23 आणि एफवाय 2023-24
कॅटेगरी | एक्झ्म्पशन्स |
सेव्हिंग्स स्कीम्स | पोस्ट ऑफीस सेव्हिंग्स अकाउंट वरील इंटरेस्ट सेक्शन 10(15)(i) अंतर्गत इंडीव्हीजुअल अकाउंट्स साठी ₹ 3,500 पर्यंत आणि जॉइंट अकाउंट्स साठी ₹ 7,000 पर्यंत. सेक्शन 10(10D) अंतर्गत लाईफ इन्शुरन्स अकाउंट मॅच्युर झाल्यावर मिळणारे फंड्स देखील टॅक्स एक्झ्म्पशन साठी पात्र आहेत. सुकन्या समृद्धी योजनेमधून मिळालेले मॅच्युरिटी अमाऊंट्स आणि इंटरेस्ट्स |
एनपीएस, पीपीएफ आणि ईपीएफ (NPS, PPF and EPF) | एम्प्लॉईच्या एनपीएस आणि ईपीएफ आणि सुपर अन्यूएशन अकाउंट्स मध्ये एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रीब्युशनवर एका वर्षात ₹ 7.5 पर्यंत टॅक्स एक्झ्म्पशन. एम्प्लॉईच्या प्रॉव्हीडंट फंड अकाउंट मधून मिळालेले इंटरेस्ट, 9.5% पर्यंत एनपीएस खात्यातून लम्पसम मॅच्युरिटीची रक्कम आणि टियर 1 एनपीएस खात्यातून अंशत: फंड विथड्रॉवल, या दोन्ही गोष्टी टॅक्स फ्री आहेत. पीपीएफ खात्यातून मिळणारे इंटरेस्ट किंवा मॅच्युरिटीच्या रकमेवर टॅक्स एक्झ्म्पशन. |
होम लोन्स | भाड्याने दिलेल्या जागेसाठी घेतलेल्या होम लोनच्या इंटरेस्ट कंपोनंट वरती डिडक्शन. |
ग्रॅज्युटी | नॉन गव्हरमेंट एम्प्लॉईसाठी एम्प्लॉयरची ग्रॅज्युटी ₹20 पर्यंत एक्झ्म्पटेड आहेत आणि गव्हरमेंट एम्प्लॉईसाठी संपूर्ण ग्रॅज्युटी टॅक्स फ्री केलेली आहे. |
एम्प्लॉयर्सनी दिलेले अलाउन्सेस | डिसएबल्ड एम्प्लॉईज साठी ट्रॅव्हल अलाउन्स, कंव्हेयन्स अलाउन्स, एम्प्लॉईची ट्रॅव्हल कॉस्ट किंवा ट्रान्स्फरची कॉस्ट कव्हर करण्यासाठी देण्यात आलेला अलाउन्स, परक्वीजिट्स आणि डेली अलाउन्स. एम्प्लॉयर द्वारा एम्प्लॉईजना ऑफिशियल ड्युटी करण्यासाठी देण्यात आलेले अलाउन्स. जर नॉन गव्हरमेंट एम्प्लॉईजना कम्युटेड पेन्शन मिळत असेल तर त्यातील 1/3 रक्कम एम्प्लॉईला ग्रॅच्युटी मिळाल्यास टॅक्स एक्झ्म्पशनसाठी पात्र ठरते. जर एम्प्लॉईजना कम्युटेड पेन्शन मिळत नसेल तर त्यातील 1/2 रक्कम टॅक्स एक्झ्म्पशनसाठी पात्र ठरते. एम्प्लॉयर कडून मिळालेले गिफ्ट्स, ₹5,000 पर्यंत. |
रिटायरमेंट | लीव्ह एनकॅशमेंट वरील एक्झ्म्पशन. व्हॉलेंटरी रिटायरमेंटसाठी एम्प्लॉयर्सकडून मिळणारे आर्थिक फायदे, ₹ 5 लाखांपर्यंत. शैक्षणिक शिष्यवृत्ती, रिट्रेन्चमेंट नुकसान भरपाई आणि रिटायरमेंटसाठी किंवा मृत्यू नंतरचे आर्थिक फायदे. |
बजेट 2023 प्रमाणे नवीन रिजिम अंतर्गत महिलांसाठी खालील इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन लागू नाहीत
कॅटेगरी | एक्झ्म्पशन्स |
होम लोन (सेक्शन 80C आणि 80EE/ 80EEA खाली) | ₹1.5 लाखापर्यंतच्या हाउसिंग लोनच्या प्रिन्सिपल अमाउंट आणि इंटरेस्टच्या पेमेंटवर डिडक्शन |
सेक्शन 80C | सेक्शन 80C अंतर्गत एम्प्लॉईचे प्रॉव्हीडंट फंड, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम आणि सार्वजनिक पब्लिक प्रॉव्हीडंट फंडमध्ये केलेली इन्वेस्टमेंट. |
सेक्शन 80E | सेक्शन 80E अंतर्गत स्टुडंट लोनच्या डेब्टवर भरलेले इंटरेस्ट. |
चॅरिटी (सेक्शन 80G खाली) | साइंटीफिक रिसर्च साठीचे खर्च किंवा डोनेशन नॅशनल डिफेन्स फंड, पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड, नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनिटी हार्मनी, नॅशनल/स्टेट ब्लड ट्रांसफ्युजन काउन्सिल यासह सेक्शन 80G अंतर्गत डीडक्शन्स. |
आर्थिक वर्ष 2022-23 आणि आर्थिक वर्ष 2023-24 या नवीन टॅक्स रिजिम अंतर्गत सध्याचे इन्कम टॅक्स डिडक्शन्स
कॅटेगरी | एक्झ्म्पशन्स |
सॅलरी डिडक्शन्स | हाऊस रेंट अलाउन्स आणि लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स. प्रोफेशनल टॅक्स गव्हरमेंट एम्प्लॉईजसाठी - प्रोफेशनल टॅक्स आणि एंटरटेनमेंट अलाउन्स. |
बचत खाते | सेक्शन 80TTA आणि 80TTB अंतर्गत बचत खात्यातून मिळणारे इंटरेस्ट (सीनियर सिटीजन्सना डिपॉजिट्स वरील इंटरेस्ट टॅक्ससेबल आहे). सेक्शन 10(14) खाली स्पेशल अलाउन्स. स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील बिझिनेस व्यावसायिक आणि मालक सेक्शन 10AA अंतर्गत टॅक्स डिडक्शनचा क्लेम करू शकत नाहीत. |
होम लोन्स (सेक्शन 24(b) खाली) | स्वतःच्या किंवा भाड्याने दिलेल्या घराच्या लोन चे इंटरेस्ट हाऊस प्रॉपर्टीच्या खरेदी/बांधकाम/दुरुस्ती/पुनर्बांधणी यासाठी केलेले ₹2,00,000 पर्यंतचे इंटरेस्ट पेमेंट |
इतर सेक्शन | आयटी अॅक्टच्या सेक्शन 35(1)(ii), 35(2AA), 32AD, 33AB, 35(1)(iii), 33ABA, 35(1)(ii), 35CCC(a), and 35AD अंतर्गत टॅक्स डिडक्शन्स. सेक्शन 32(ii) (a) अंतर्गत निर्दिष्ट केल्याप्रमाणे अतिरिक्त डेप्रीसीएशन. मागील वर्षांतील न वापरलेले डेप्रीसीएशन अॅडजस्ट करण्याचा पर्याय. चॅप्टर VI-A अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या डिडक्शन्स जसे की 80IA, 80CCC, 80C, 80CCD, 80D, 80CCG, 80DDB, 80EE, 80E, 80EEA, 80DD, 80EEB, 80GG, 80IB, 80IAC, आणि 80IAB. अल्पवयीन मुले, मदतनीस भत्ते व मुलांच्या शिक्षणासाठी अलाऊंसेस. |
जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे महिलांसाठी इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन
आर्थिक वर्ष 2022-23 and 2023-24 साठी जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे महिलांसाठी खालील प्रमाणे काही डिडक्शन्स आणि अलाउन्सेस देण्यात आले आहेत
- ₹50,000 पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन.
- लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स (एलटीए) आणि हाऊस रेंट अलाउन्स (एचआरए)
- निवासी जागेत वापरल्या जाणाऱ्या दूरध्वनी व मोबाइलवरील खर्चाची रीमबर्समेंट.
- वर्तमान पत्र, पुस्तके, पिरिओडीकल्स, जर्नल्स साठीच्या खर्चाचे रीएम्बर्समेंट
- फूड कूपनवर होणारे एक्सपेन्सेस.
- बिझिनेसच्या उद्देशाने एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरित होण्यासाठी रीलोकेशन अलाउन्सचा फायदा.
- हेल्थ क्लब सुविधा, कॅब सुविधा, गिफ्ट्स किंवा व्हाउचर्स सारख्या एम्प्लॉयर्सने प्रदान केलेल्या विविध सुविधांवर फायदा.
अधिक जाणून घ्या: हेल्थ इन्शुरन्स टॅक्स फायदे
इन्कम टॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 80 अंतर्गत महिला टॅक्सपेअर खालील एक्झ्म्पशन मधून इन्कम टॅक्स क्लेम करू शकतात.
सेक्शन |
बेनिफिट्स |
लिमिट |
सेक्शन 80C |
खालील मिळकतींवर होम लोनचे प्रिन्सिपल पेमेंट |
जास्तीत जास्त एक्ज्म्पशन लिमिट ₹1.5 लाखांपर्यंत. |
सेक्शन 80CCC |
एलआयसी अॅन्युइटी प्लॅनमध्ये जमा रकमेवर. |
जास्तीत जास्त एक्ज्म्पशन लिमिट ₹1.5 लाखांपर्यंत. |
सेक्शन 80 TTA |
बँक बचत खात्यातून मिळणाऱ्या इंटरेस्टवर. |
हे लिमिट ₹10,000 पर्यंत आहे. |
सेक्शन 80GG |
जेव्हा व्यक्तीला हाऊस रेंट अलाउन्स मिळत नाही तेव्हा भाडे भरणे. |
खालील पैकी सर्वात कमी रक्कम पे केलेले रेंट - (एकूण मिळकतीच्या 10%) एकूण मिळकतीच्या 25%. ₹5000 दर महिना. |
सेक्शन 24a |
स्वत:च्या मालकीच्या प्रॉपर्टीसाठी आणि भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीसाठीच्या होम लोन वरील इंटरेस्ट. |
स्वत: राहत असलेल्या प्रॉपर्टीसाठी ₹2 लाखांपर्यंत. भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीसाठी कोणतीही लिमिट नाही.
|
सेक्शन 80E |
एजुकेशन लोनवर भरलेले एकूण इंटरेस्ट. |
सर्वाधिक रकमेवर लिमिट नाही. |
सेक्शन 80EEA |
पहिल्यांदा लोन घेणाऱ्यांसाठी होम लोन इंटरेस्ट |
₹50,000 पर्यन्त |
सेक्शन 80 CCG |
प्रथमच इन्वेस्टमेंट करणाऱ्यांसाठी राजीव गांधी इक्विटी स्कीमअंतर्गत इक्विटी उत्पादनांमध्ये इन्वेस्टमेंट. |
खालील पैकी सर्वात कमी रक्कम- इक्विटी स्कीम्स मधील इन्व्हेस्टमेंटच्या ₹25,000 or 50% |
सेक्शन - 80D |
स्वतःचे आणि कुटुंबाचे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमिअम |
₹25,000 (स्वतःसाठी, जोडीदारासाठी आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी) + 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या पालकांसाठी ₹25,000 ₹25,000 (स्वतःसाठी, जोडीदारासाठी आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी) + 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या पालकांसाठी ₹50,000 एचयूएफ च्या सदस्यांसाठी ₹50,000 पर्यंत जेथे सदस्य 60 वर्षांपेक्षा जास्त आहे + ₹50,000 पर्यंत (60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पालकांसाठी). |
सेक्शन 80DDB |
विशिष्ट आजारांनी ग्रस्त असलेल्या आश्रित व्यक्तींवर मेडिकल उपचार. |
60 वर्षांखालील व्यक्तींसाठी हे डिडक्शन ₹ 40,000 पर्यंत उपलब्ध आहे. |
सेक्शन 80GGC |
राजकीय पक्षांना दिलेले योगदान. |
रोख रकमेव्यतिरिक्त पेमेंट पद्धतींवर कोणतीही लिमिट नाही. |
सेक्शन- 80G |
चॅरिटेबल संस्था आणि काही रिलीफ फंडांमध्ये योगदान. |
काही धर्मादाय देणग्या 50% डिडक्शन्स पर्यंत पात्र आहेत, तर काही 100% डिडक्शन्स पर्यंत पात्र आहेत. |
याबद्दल अधिक जाणून घ्या:
अशाप्रकारे, वरील सर्व एक्झ्म्पशन्स आणि बेनिफिट्सच्या मदतीने महिला त्यांच्या टॅक्स लायबिलिटीज योग्य त्या इन्वेस्टमेंट्स आणि एक्स्पेन्सेस करून ठराविक मर्यादेपर्यंत कमी करू शकतात. जरी या इन्वेस्टमेंट्स लॉंग टर्म साठी असतील, तरी टॅक्स सेव्हिंग्सच्या बाबतीत अगदीच फायद्याच्या आहेत.
त्यामुळे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये टॅक्स रिटर्न भरण्याआधी आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी टॅक्स प्लॅन करताना महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या आयटी स्लॅब्स आणि सर्व लागू असलेले एक्झ्म्पशन्स चेक करून घ्यायला पाहिजेत जे
महिलांसाठी इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भारतात महिलांसाठी इन्कम टॅक्स लायबिलिटीज वेगवेगळ्या आहेत का?
पूर्वी, देशातील महिलांवर टॅक्सेशनसाठीचे एक्झ्म्पशन लिमिट पुरुष टॅक्सपेअर्स पेक्षा जास्त होते. आर्थिक वर्ष 2012-2013 पासून हे वर्गीकरण रद्द करून आता टॅक्स स्लॅब केवळ इंडीव्हीजुअल्सचे इन्कम आणि वय यावर ठरवले जातात.
सगळ्या टॅक्सपेअर्स साठी टॅक्स फाइलिंगची तारीख एकाच आहे का?
नाही, इन्कम टॅक्स फाइलिंगची तारीख वेगवेगळी आहे. इंडीव्हीजुअल टॅक्सपेअर्स साठी असेसमेंट इयर मधील 31st जुलै ही तारीख अंतिम तारीख आहे.
गृहिणींना देखील टॅक्स भरावा लागतो का?
जर गृहिणींची मिळकत, जी गिफ्ट्स किंवा सेव्हिंग्स अकाउंट वरील इंटरेस्ट्स, दिलेल्या स्लॅब पेक्षा जास्त असेल तर त्यांना योग्य त्या रिजिमप्रमाणे टॅक्स भरणे बंधनकारक आहे.