सिनिअर सिटीझन्ससाठी आणि सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी इन्कम टॅक्स स्लॅब
सिनिअर सिटीझन्ससाठी आणि सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल सर्व काही
इंडिअन सेन्सस 2011 अनुसार, देशात 60 वर्ष वयाच्या पुढील भारतीयांची संख्या 10.38 करोड पेक्षा अधिक आहे, जी 2026 पर्यंत 17.32 करोड इतकी होण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. हे आकडे बघता, यापुढचा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आरोग्यविषयक आव्हाने
अशा सर्व लायबिलिटीज विचारात घेता, 2015 - 2016 या असेसमेंट इअर साठी सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी एक्झ्म्पशन लिमिट मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याहीपुढे, सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझन्ससाठी इन्कम टॅक्स बेनिफिट्स देखील 60 वर्ष वयापेक्षा कमी व्यक्तींच्या तुलनेत जास्त आहेत.
पण भारतामध्ये सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझन म्हणजे नक्की कोण? चला तर बघुया
भारतात सिनिअर सिटीझन म्हणजे कोण?
इन्कम टॅक्स प्रमाणे, सिनिअर सिटीझन म्हणजे भारतात राहणारा व्यक्ती जो आर्थिक वर्षा दरम्यान कधीही 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असेल पण 80 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल.
भारतात सुपर सिनिअर सिटीझन म्हणजे कोण?
सुपर सिनिअर सिटीझन म्हणजे भारतात राहणारा व्यक्ती जो आर्थिक वर्षा दरम्यान कधीही 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा आहे.
सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझन यांसाठी स्लॅब्स, त्यांच्यासाठीचे एक्झ्म्पशन्स आणि लागू असलेले टॅक्स बेनिफिट्स.
सिनिअर सिटीझन्ससाठी हेल्थ इन्शुरन्स बद्दल अधिक जाणून घ्या
सिनिअर सिटीझन आणि सुपर सीनियर सिटीजन्ससाठी आर्थिक वर्ष 2023-24 (एवाय 2024-25) चे इन्कम टॅक्स स्लॅब्स
2023 युनिअन बजेट मध्ये नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे सर्व टॅक्स पेअर्ससाठी त्यांचे वय विचारात न घेता एकसमान इन्कम टॅक्स स्लॅब्सचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो की 1 एप्रिल, 2023 पासून सिनिअर सिटीझन जें 60 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे पण 80 वर्ष वयापेक्षा कमी वयाचे आणि सिनिअर सिटीझन जे 80 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असतील त्यांना तितकाच टॅक्स भरावा लागेल जितका 60 वर्ष वयापेक्षा कमी नागरिकांना भरायचा असतो.
आर्थिक वर्ष 2023-24 (आर्थिक वर्ष 2024-25) साठी इन्कम टॅक्स स्लॅब - नवीन टॅक्स प्रणाली (सिनिअर आणि सुपर सीनियर सिटीजनसाठी समान)
नवीन टॅक्स रिजिम प्रमाणे टॅक्सपेअर जे 60 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांनी एफवाय 2023-24 मध्ये खालीलप्रमाणे टॅक्स भरावा
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
रु.3,00,001 ते रु.6,00,000 दरम्यान | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
रु. 6,00,001 ते रु.9,00,000 दरम्यान | ₹ 15,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹6,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 10% |
रु.9,00,001 ते रु.12,00,000 दरम्यान | ₹ 45,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 9,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 15% |
रु.12,00,001 ते रु. 15,00,000 दरम्यान | ₹ 90,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 12,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹ 1,50,000 + आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹15,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
आर्थिक वर्ष 2023-24 (एवाय 2024-25) साठी सुपर सीनियर सिटीजनसाठी इन्कम टॅक्स स्लॅब - जुनी टॅक्स प्रणाली
सिनिअर सिटीझन जे 60 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त पण 80 वर्ष वयापेक्षा कमी, जे एफवाय 2022-2023 जुन्या रिजिम फॉलो करतात, त्यांना खालीलप्रमाणे इन्कम टॅक्स स्लॅब्स लागू होतात.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
₹3,00,001 ते ₹5,00,000 | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
₹5,00,001 ते ₹ 10,00,000 | ₹10,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 20% जे ₹ 5,00,000 पेक्षा जास्त आहे |
₹10,00,000 पेक्षा जास्त | ₹1,10,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 30% जे ₹ 10,00,000 पेक्षा जास्त आहे |
त्याच बरोबर सिनिअर सिटीझनांवर त्यांची टॅक्सेबल अमाउंट कॅलक्युलेट करून त्या रकमेवर आणखीन एक 4% चा हेल्थ आणि एजुकेशनल सेस लागू केला जाईल.
आर्थिक वर्ष 2023-24 (एवाय 2024-25) साठी सुपर सीनियर सिटीजनसाठी इन्कम टॅक्स स्लॅब - जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे
80 वर्ष वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी, जे सुपर सिनिअर सिटीझन या श्रेणी मध्ये येतात, त्यांच्यासाठी एफवाय 2023-2024 या वर्षातील जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे टॅक्सेशनचा रेट खालीलप्रमाणे असेल:
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹5,00,000 पर्यन्त | शून्य |
₹5,00,001 ते ₹ 10,00,000 | आपल्या एकूण इन्कमच्या, जी रु. 5,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
रु.10,00,001 पेक्षा जास्त | आपल्या एकूण इन्कमच्या जी रु.10,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
सुपर-सीनियर सिटीजन्सना कॅलक्युलेटेड टॅक्सच्या रक्कमेवर अतिरिक्त 4% हेल्थ व शिक्षण सेस भरावा लागतो.
आर्थिक वर्ष 2022-23 (एवाय 2023-24) साठी सीनियर आणि सुपर सीनियर सिटीजन्स इन्कम टॅक्स स्लॅब्स
60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या नागरिकांना 31 जुलै 2023 पर्यंत मागील 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न फाईल करावे लागते, त्यांनी खालील इन्कम टॅक्स स्लॅब्स फॉलो कराव्यात. 2023च्या बजेट पूर्वी पर्यंत या स्लॅब्स लागू होतात.
आर्थिक वर्ष 2022-23 (एवाय 2023-24) साठी सीनियर आणि सुपर सीनियर सिटीजन्स साठी इन्कम टॅक्स स्लॅब्स
एफवाय 2022-23 साठी, सिनिअर सिटीझन्ससाठी (म्हणजेच जे 60 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त पण 80 वर्ष वयापेक्षा कमी वयाचे आहेत) आणि सुपर सिनिअर सिटीझन (म्हणजेच जे 80 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत) इन्कम टॅक्स स्लॅब्स खालीलप्रमाणे आहेत:
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹2,50,000 पर्यंत | शून्य |
₹2,50,001 ते ₹5,00,000 पर्यंत | ₹2,50,000 रुपयांपेक्षा जास्त वर 5% |
₹5,00,001 ते ₹7,50,000 पर्यंत | ₹ 12,500 + ₹5,00,000 पेक्षा जास्त वर 10% |
₹7,50,001 ते ₹10,00,000 पर्यंत | ₹37,500 + ₹ 7,50,000 पेक्षा जास्त वर 15% |
₹10,00,001 ते ₹12,50,000 पर्यंत | ₹75,000 + ₹ 10,00,000 पेक्षा जास्त वर 20% |
₹12,50,001ते ₹15,00,000 पर्यंत | ₹1,25,000 + ₹ 12,50,000 पेक्षा जास्त वर 25% |
₹15,00,000 पेक्षा जास्त | ₹1,87,500 + ₹15,00,000 पेक्षा जास्त वर 30% |
आर्थिक वर्ष 2022-23 (एवाय 2023-24) साठी सीनियर साठी इन्कम टॅक्स स्लॅब्स- जुने टॅक्स रिजिम
सिनिअर सिटीझन्ससाठी जे 60 वर्ष वयाचे किंवा त्यापेक्षा जास्त पण 80 वर्ष वयापेक्षा कमी वयाचे आहेत त्यांनी एफवाय 2022-23च्या जुन्या टॅक्स रिजिम प्रमाणे दिलेले खालील रेट्स फॉलो करावेत.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹3,00,000 पर्यंत | शून्य |
₹3,00,001 ते ₹5,00,000 | आपल्या एकूण इन्कमच्या, जी ₹ 3,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 5% |
₹5,00,001 ते ₹ 10,00,000 | ₹10,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 20% जे ₹ 5,00,000 पेक्षा जास्त आहे |
₹10,00,000 पेक्षा जास्त | ₹1,10,000 + आपल्या एकूण इन्कमच्या 30% जे ₹ 10,00,000 पेक्षा जास्त आहे |
टॅक्सेबल अमाउंट कॅलक्युलेट करून त्या रकमेवर आणखीन एक 4% चा हेल्थ आणि एजुकेशनल सेस लागू केला जाईल.
एफवाय 2022-23 (एवाय 2023-24) साठी सुपर सीनियर सिटीजन्स साठी इन्कम टॅक्स स्लॅब्स- जुने टॅक्स रिजिम
80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्या नागरिकांना 31 जुलै 2023 पर्यंत मागील 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न फाईल करावे लागते, त्यांनी खालील इन्कम टॅक्स स्लॅब्स फॉलो कराव्यात.
इन्कम टॅक्स स्लॅब्स | टॅक्सेशनचे रेट्स |
---|---|
₹5,00,000 पर्यन्त | शून्य |
₹5,00,001 ते ₹10,00,000 | आपल्या एकूण इन्कमच्या, जी रु. 5,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 20% |
रु.10,00,001 पेक्षा जास्त | आपल्या एकूण इन्कमच्या जी रु.10,00,000 पेक्षा जास्त आहे, त्याच्या 30% |
सिनिअर सिटीझनांवर त्यांची टॅक्सेबल अमाउंट कॅलक्युलेट करून त्या रकमेवर आणखीन एक 4% चा हेल्थ आणि एजुकेशनल सेस लागू केला जाईल.
₹50 लाखापेक्षा जास्त इन्कम वर सरचार्ज
जर सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझन यांची टॅक्सेबल इन्कम ₹50 लाखापेक्षा जास्त असेल, तर 1 एप्रिल, 2023 पासून लागू असलेल्या एफवाय 2023-24 साठीच्या खाली दिलेल्या सरचार्ज प्रमाणे टॅक्सचे मुल्यांकन केले जाते.
टॅक्सेबल इन्कम | सरचार्ज |
---|---|
₹50 लाखांपेक्षा जास्त पण ₹1 कोटींपेक्षा कमी | 10% |
₹1 कोटींपेक्षा जास्त पण ₹2 कोटींपेक्षा कमी | 15% |
₹2 कोटींहून अधिक | 25% |
एफवाय 2022-23 (एवाय 2023-24), ₹5 पेक्षा जास्त इन्कम वर 37% असा सर्वाधिक सरचार्ज होता जो1 एप्रिल, 2023 पासून लागू होणाऱ्या युनिअन बजेट 2023 द्वारे आता कमी करून 25% करण्यात आले आहे.
60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पण 80 वर्ष पेक्षा कमी वय असलेल्या सिनिअर सिटीझन्ससाठी इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन्स
युनिअन बजेट 2023 ने जेव्हा एफवाय 2023-24 साठीच्या नवीन रिजिम अंतर्गत इन्कम टॅक्स स्लॅब्स मध्ये सुधारणा केल्या तेव्हा सिनिअर सिटीझन्ससाठी बेसिक एक्झ्म्पशन लिमिट्स दोन्ही टॅक्स रिजिम्स साठी एकच म्हणजे 3 लाख एवढेच आहे. एफवाय 2022-2023 मध्ये, नवीन टॅक्स रिजिम अनुसार बेसिक एक्झ्म्पशन लिमिट ₹2.5 लाख इतके होते.
सुपर सिनिअर सिटीझन ज्यांचे वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स एक्झ्म्पशन्स
सुपर सिनिअर सिटीझन्स साठी दोन्ही टॅक्स रिजिम्स मध्ये बेसिक एक्झ्म्पशन लिमिट एकच आहे. युनिअन बजेट 2023 ने नवीन रिजिम अंतर्गत ₹3 लाखाचे बेसिक एक्झ्म्पशन लिमिट प्रस्तावित केले, जे एफवाय 2022-2023 मध्ये ₹2.5 इतके होते.
तर जुन्या टॅक्स रिजिम अंतर्गत दोन्ही आर्थिक वर्षांसाठी ते ₹5 पर्यंतचे बेसिक इन्कम एक्झ्म्पशन क्लेम करू शकतात.
60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सिनिअर सिटीझन्ससाठी इन्कम टॅक्स बेनिफिट्स उपलब्ध नाहीत.
जर सिनिअर सिटीझन आणि सुपर सीनियर सिटीजननी एफवाय 2023-24 साठी नवीन टॅक्स रिजिमचा पर्याय निवडला तर त्यांना काही इन्कम टॅक्स बेनिफिट्स सोडावे लागतील, जे खालीलप्रमाणे आहेत:
- हाउस रेंट अलाउन्स (एचआरए)
- लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स(एलटीए)
- प्रोफेशनल टॅक्स
- एम्प्लॉयर द्वारा देण्यात येणारा विशेष अलाउन्स ज्यामध्ये कन्व्हेयन्स अलाउन्स, रिलोकेशन अलाउन्स, आणि त्यांच्या नोकरीच्या कालावधीदरम्यान होणाऱ्या डेली एक्स्पेन्सेस साठीचा अलाउन्स.
- सेक्शन 24 अंतर्गत हाउसिंग लोनवरील इंटरेस्ट
- चिल्ड्रन एजुकेशन अलाउन्स
- हेल्पर अलाउन्स
- चॅप्टर VI-A अंतर्गत डीडक्शन जसे की 80C, 80D, 80E, 80TTB इत्यादी. पेन्शन स्कीम आणि 80JJAA अंतर्गत नमूद केलेल्या डिडक्शन व्यतिरिक्त
भारतातील सिनिअर आणि सुपर सिनिअर नागरिकांसाठी इन्कम टॅक्स बेनिफिट्स
या सर्व एक्झ्म्पशन्स पैकी सर्वात महत्वाचा भाग जिथून तुम्हाला विशिष्ट बेनिफिट्स मिळू शकतात, तो म्हणजे हेल्थकेअर. देशातील वाढत्या हेल्थकेअर कॉस्ट लक्षात घेता सरकारने हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी वरती अनेक बेनिफिट्स ऑफर केले आहेत ज्यामुळे उपचार घेण्यासाठीची फायनन्शिअल लायबिलिटी काही अंशी कमी होते.
60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी फायनन्शिअल इअर्स 2022-23 आणि 2023-24 मधील काही सामान्य टॅक्स डिडक्शन्स आणि बेनिफिट्स खालीलप्रमाणे आहेत.
- स्टँडर्ड डिडक्शन
60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे पेन्शनर्स त्यांच्या पेन्शन वरतीच इन्कम फ्रॉम सॅलरीज या हेड खाली ₹50,000 चे स्टँडर्ड डिडक्शन क्लेम करू शकतात. फॅमिली पेन्शनर्स देखील ₹15,000 पर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन क्लेम करू शकतात.
- सेक्शन 80DDB खालील डिडक्शन
सिनिअर सिटीझन ठराविक गंभीर आजारांसाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी, युनिअन बजेट 2018-19 मधील सुधारणांनप्रमाणे ₹ 1 लाखापर्यंतचे डिडक्शन क्लेम करू शकतात.
- हेल्थ इन्शुरन्स
इन्कमटॅक्स अॅक्ट मधील सेक्शन 80D खाली सिनिअर सिटीझन मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम साठी ₹ 50,000 पर्यंतचे डीडक्शन क्लेम करू शकतात जें इतर नागरिकांसाठी ₹ 25,000 इतके आहे.
- सेव्हिंग्स मधून मिळणारे इंटरेस्ट
सेक्शन 80TTB खाली, बँक अकाऊंट्स, बँक डिपॉजिट्स, पोस्ट ऑफिस डिपॉजिट्स किंवा कॉरपोरेट बँक्स पोस्ट ऑफिस आणि बँक यामधून मिळालेल्या इन्कम वरील इंटरेस्ट वरचे डिडक्शन 60 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी ₹ 10,000 वरून ₹ 50,000 करण्यात आले आहे. हे बेनिफिट्स वेगवेगळ्या फिक्स्ड आणि रिकरिंग डिपॉजिट स्कीम्स साठी देखील लागू होतात.
- रिव्हर्स मोर्गेज स्कीम
या स्कीमच्या अंतर्गत सिनिअर सिटीझन्सना इंस्टॉलमेंट्स त्यांनी त्यांचे घर आयुष्यभरासाठी तारण ठेवल्यावर सुरळीत मिळायला लागतात तरी त्यांच्याचकडे असलेला मालकी हक्क आणि घराचा ताबा हा इन्कम टॅक्स मधून पूर्णपणे एक्झ्म्प्ट केले जातात.
अशाप्रकारे या इन्कम टॅक्स बेनिफिट्स द्वारे सरकारने देशातील सिनिअर सिटीझन आणि सुपर सिनिअर सिटीझनसाठी टॅक्स बर्डन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स भरण्याआधी लागू असलेल्या इन्कम टॅक्स स्लॅब्स आणि त्यासोबतचे टॅक्स बेनिफिट्स देखील जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सोनेरी काळात एक स्वतंत्र आयुष्य जगता येईल.
सिनिअर सिटीझन्ससाठी इन्कम टॅक्स स्लॅब बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सुपर सिनिअर सिटीझन्स हेल्थ संबंधी टॅक्स बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकतात का?
80 वर्ष वयाचे नागरिक जे कोणत्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी द्वारे इनशूअर्ड नसतात, ते वैद्यकीय उपचार आणि हेल्थ चेकअप साठी इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80D खाली ₹50,000 पर्यंतचे डिडक्शन क्लेम करू शकतात.
सिनिअर सिटीझन कोणत्या फॉर्म द्वारे त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतात?
ज्या सिनिअर सिटीझनांना पेन्शन किंवा घर भाड्याने देऊन किंवा इतर माध्यमांतून इन्कम किंवा सॅलरी मिळते ते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी ITR-1 हा फॉर्म वापरू शकतात. वर दिलेल्या इन्कम शिवाय, लॉंग किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स द्वारे इन्कम मिळत असेल तर अशा नागरिकांनी त्यांचे रिटर्न ITR- 2 द्वारे फाईल करावेत.
सेक्शन 87A खाली सिनिअर सिटीझन एनआरआय टॅक्स रिबेट क्लेम करू शकतात का?
नाही, सेक्शन 87A खाली डिडक्शन मिळवण्यासाठीच्या महत्वाचा क्रायटेरियांमधील एक क्रायटेरिया हा देखील आहे की ते नागरिक भारतात स्थायिक असावेत. त्यामुळे, भारतात स्थायिक नसलेले नागरिक सेक्शन 87A खाली रिबेट क्लेम नाही करू शकत. सुपर सिनिअर सिटीझन्स हेल्थ संबंधी टॅक्स बेनिफिट्स मिळवू शकतात का?
80 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक जे कोणत्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी द्वारे इनशूअर्ड नसतात, ते वैद्यकीय उपचार आणि हेल्थ चेकअप साठी इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80D खाली ₹50,000 पर्यंतचे डिडक्शन क्लेम करू शकतात.
एका पेक्षा अधिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी साठी टॅक्स बेनिफिट्स मिळवता येतात का?
होय, एका पेक्षा अधिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी साठी टॅक्स बेनिफिट्स मिळवता येतात. तरी, तुम्हाला लागू असलेल्या एलिजिबलिटी क्रायटेरियाची पूर्तता करावी लागेल आणि टॅक्स बेनिफिट्स मिळवण्यासाठी हे सुनिश्चित करावे लागेल की सर्व प्रीमियम भरले गेले आहेत.