डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट विषयी सर्व काही
राज्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या एक हेल्थकेअर कार्यक्रमाचे म्हणजे आरोग्यश्री योजनेचे व्यवस्थापन डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट, तर्फे करण्यात येत आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना या योजनेचा मोठा लाभ उचलता येईल.
कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना हेल्थकेअरसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री डॉ. वायएसआर रेड्डी यांनी 2007 मध्ये याची सुरुवात केली आणि 2014 मध्ये आंध्र प्रदेशचे दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजन झाले.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट आणि डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ इन्शुरन्स प्लॅनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा!
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट म्हणजे काय?
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट अशा लोकांसाठी वैद्यकीय संरक्षण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते ज्यांना सामान्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढायला परवडत नाही.
हे सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे आणि प्रति कुटुंब वार्षिक रु. 5 लाखांएवढे इन्शुरन्स कव्हर देते. डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट एक हेल्थ कार्ड जारी करते जे लाभार्थी कॅशलेस उपचार मिळविण्यासाठी सरकारी हॉस्पिटल्सत दाखवू शकतात. एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला सीईओ म्हणून नेमण्यात येते आणि योजनेची एकूण अंमलबजावणी त्याच्या नियंत्रणाखाली होते.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टची वैशिष्ट्ये काय आहेत?
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट द्वारे व्यवस्थापन केलेल्या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
कॅशलेस हेल्थकेअर - या इन्शुरन्स प्लॅन मध्ये लाभार्थी आणि त्याच्या नोंदविलेल्या कुटुंबाला सुमारे रु. 5 लाखांचे आर्थिक संरक्षण दिले जाते.
इन-पेशंट हेल्थकेअर - डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये या कार्यक्रमांतर्गत नमूद केलेल्या आजार आणि थेरपी यांच्या यादीसाठी रूग्णसेवा पुरविली जाते. याव्यतिरिक्त, यात हॉस्पिटल्सत दाखल होण्याचा खर्च देखील समाविष्ट आहे.
फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स कव्हर - डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत संपूर्ण कुटुंबाला संरक्षण दिले जाते. कोणत्याही सदस्यासाठी स्वतंत्र संरक्षणाची गरज नाही.
आउट-पेशंट हेल्थकेअर - या कार्यक्रमात इन-पेशंट सेवेव्यतिरिक्त शासकीय हॉस्पिटले व हेल्थ शिबिरांमध्ये आउट-पेशंट सेवाही दिली जाते.
पाठपुरावा उपचार - डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या इन्शुरन्स प्लॅनचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे यात पाठपुरावा थेरपी आणि प्रक्रियांचा सुद्धा समावेश आहे.
पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रोगासाठी संरक्षण - शिवाय या योजनेसाठी नोंदणी करण्यापूर्वी लाभार्थी आधीच एखाद्या आजाराने ग्रासलेला असेल, तर त्याला त्याच्या उपचारासाठी संरक्षण घेता येईल. इतर व्यावसायिकरित्या उपलब्ध हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्समध्ये हे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टचे फायदे काय आहेत?
नि:शंकपणे, डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट योजनेने नागरिकांची मने जिंकली आहेत. अनेक मौल्यवान फायद्यांमुळे हे उपक्रम उठून दिसते. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
प्रति कुटुंब वार्षिक रु. 5 लाखांचे इन्शुरन्स कव्हर.
शासकीय हॉस्पिटल्सतून मोफत हेल्थकेअर.
डिस्चार्ज दिल्यावर पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसांपर्यंत कॅशलेस उपचार.
थेरपी घेणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कॅशलेस उपचार.
या योजनेत रुग्णाच्या वाहतुकीच्या आणि जेवणाच्या खर्चाचा समावेश आहे.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टचे हे काही प्रमुख फायदे आहेत.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या योजनेत कोणत्या उपचारांचा समावेश होतो?
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टमध्ये थेरपींच्या एका विशिष्ट यादीचा समावेश आहे. एकूण पाहता, 30 श्रेणींमध्ये 2434 शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध आहेत.
येथे सामान्य शस्त्रक्रिया आणि क्रिटिकल केअरची तपशीलवार यादी दिली आहे. तसेच, या कार्यक्रमांतर्गत वगळलेल्या गोष्टींची यादी पहा.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट अंतर्गत सामान्य शस्त्रक्रिया
या योजनेत संरक्षण दिल्या गेलेल्या सामान्य शस्त्रक्रियांची यादी अशी आहे
ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि प्रोसीजर
नेत्रशास्त्र
इएनटी शस्त्रक्रिया
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र
सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी
मेडिकल ऑन्कोलॉजी
प्लॅस्टिक सर्जरी
मेकेल डायव्हर्टिकुलम चिरून काढणे
सेप्टोऱ्हायनोप्लॅस्टी
हाडांच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया, अंतर्गत संस्थापन करून पुनर्निर्माण करणे
संयम न राखता आल्याने मूत्राशय ग्रीवेचे पुनर्निर्मिती करणे
मायरिंगोप्लास्टी
कक्षेचे एक्सेन्टेरेशन करणे
ड्रग-एल्यूटिंग स्टेंटसह कोरोनरी बलून अँजिओप्लॅस्टी
ओपन रॅडिकल प्रोस्टेटक्टॉमी
कार्डियोथोरॅसिक शस्त्रक्रिया
बालशस्त्रक्रिया
जननेंद्रियाच्या शस्त्रक्रिया
न्यूरोसर्जरी
सर्जिकल ऑन्कोलॉजी
रेडिएशन ऑन्कोलॉजी
सुपरफिशियल पॅरोटीडेक्टॉमी (अघातक)
रेक्टल प्रोलॅप्ससाठी जाळी घालून ओपन रेक्टोपेक्सी
काचबिंदू (ग्लॉकोमा) शस्त्रक्रिया
एम्फिसीमा थोरासिससाठी शस्त्रक्रिया
मूत्रवाहिनी रोपणासह युरेटरोसेल काढून टाकणे
सांध्यांची पुनर्निर्मिती / इंट्रा-आर्टिक्युलर फ्रॅक्चर
कोलोस्टोमी शिवाय रेक्टोवझाइनल फिस्टुलाचे व्यवस्थापन
बालरुग्णात लंबर हर्निया दुरुस्त करणे
ड्युओडेनल छिद्रासाठी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया उपचार
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट अंतर्गत क्रिटिकल केअर उपचार
या योजनेत संरक्षण दिल्या गेलेल्या क्रिटिकल केअर स्थितींची यादी अशी आहे
जनरल मेडिसिन
बालरोगचिकित्सा
नेफ्रोलॉजी
पल्मोनोलॉजी
संधिवात शास्त्र
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी
कृत्रिम अवयव
संसर्गजन्य रोग
कार्डियोलॉजी
न्यूरोलॉजी
त्वचाविज्ञान
एंडोक्रायनोलॉजी
मानसोपचारशास्त्र
पॉलीट्रॉमा
योजनेत हे वगळले गेले आहे
या योजनेत कव्हर न केलेल्या उपचारांची यादी
कावीळ
संसर्गजन्य रोग
एचआयव्ही/एड्स
हृदय निकामी झाल्याने सहाय्यक उपकरणे
कुष्ठरोग
अस्थिमज्जेशी संबंधित उपचार
गॅस्ट्रोइंटेरायटिस
क्षयरोग
हृदय प्रत्यारोपण
यकृत प्रत्यारोपण
हत्तीरोग (फिलारिया)
न्यूरोसर्जरीमध्ये गॅमा-नाइफ प्रक्रिया
वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या योजनेसाठी कोणती पात्रता असली पाहिजे?
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टला लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
आंध्र प्रदेशचा रहिवासी असावा.
तसेच अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे.
अर्जदारांकडे पांढरे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. प्रत्येक पांढरे रेशन कार्डधारक आपोआप या योजनेअंतर्गत समाविष्ट होतो.
या व्यतिरिक्त, या योजनेत अन्नपूर्णा आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसह बीपीएल रेशन कार्डवर ज्यांची नावे आणि छायाचित्रे दिसतात अशा व्यक्तींना संरक्षण मिळते.
अर्जदारांकडे 35 एकरपेक्षा जास्त ओली व कोरडी जमीन असू नये.
अर्जदाराकडे 3000 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असले पाहिजे.
कोणत्याही अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त कार असू शकत नाहीत.
खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभार्थी होता येईल.
हे नियम डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट योजनेची पात्रता दर्शवितात.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी कोणती दस्तऐवज आवश्यक आहेत?
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी आवश्यक असणारी दस्तऐवज खालीलप्रमाणे आहेत:
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
इन्कम टॅक्स रिटर्न्स किंवा इन्कम सर्टिफिकेट
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी नावनोंदणी कशी करता येईल
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी नावनोंदणी करण्याचे दोन मार्ग आहेत. आपण खाली ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतींबद्दल चर्चा केली आहे.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी नावनोंदणी करण्यासाठी ऑफलाइन पद्धत
ऑफलाइन पद्धतीद्वारे या योजनेसाठी नावनोंदणी करण्याकरिता, आपल्याला हे स्टेप्स करावे लागतील:
स्टेप 1: https://navasakam2.apcfss.in/ या वायएसआर नवसकम वेबसाइटला भेट द्या.
स्टेप 2: वरील टॅबचा 'डाऊनलोड' पर्याय निवडा.
स्टेप 3: 'वायएसआर आरोग्यश्री हेल्थ कार्ड परफॉर्मा'वर क्लिक करा.
स्टेप 4: या योजनेसाठी अर्जाचा फॉर्म उघडेल. हा फॉर्म डाऊनलोड करा.
स्टेप 5: त्यानंतर फॉर्मचे प्रिंटआउट घ्या.
स्टेप 6: सर्व आवश्यक दस्तऐवज गोळा करा, फॉर्म भरा आणि संबंधित विभागाकडे सादर करा.
स्टेप 7: या दस्तऐवजांची पडताळणीची वाट पहा, आणि त्यानंतर वायएसआर हेल्थ कार्ड जारी केले जाईल.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टसाठी नावनोंदणी करण्याची ऑनलाइन पद्धत
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट अर्ज ऑनलाइन अपलोड करण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत:
स्टेप 1: नोंदणी करण्यासाठी, वायएसआर नवसकमची अधिकृत वेबसाइट किंवा ग्राम प्रभाग सचिवालय पोर्टल या दोनपैकी कोणत्याही वेबसाइटला आपण भेट देऊ शकता
स्टेप 2: यानंतर लॉगिन टॅबवर क्लिक करा. आपल्याला लॉगिन पृष्ठावर पाठविण्यात येईल.
स्टेप 3: वेबसाइट मध्ये लॉगिन करा आणि 'आरोग्यश्री हेल्थ कार्ड' अर्जाचा फॉर्म निवडा.
स्टेप 4: आवश्यक तपशील भरा.
स्टेप 5: त्यानंतर, आवश्यक असलेले प्रत्येक सहाय्यक कागदपत्र अपलोड करा.
स्टेप 6: सर्वात शेवटी, अर्ज ऑनलाइन सादर करा आणि संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
शेवटी असा निष्कर्ष लागतो की, वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट आंध्र प्रदेशच्या जनतेसाठी वरदान आहे. समाजातील दारिद्र्यरेषेखालील सदस्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. शिवाय, या कार्यक्रमात 2000 हून अधिक वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत नावनोंदणी करण्यापूर्वी झालेल्या रोगांना यात संरक्षण दिले जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
इतर कोणत्याही मार्गांनी डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टच्या योजनेसाठी नोंदणी करता येईल का?
होय, खाली दिलेल्यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन लोकांना स्वतः हून प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करता येईल:
प्राथमिक आरोग्य सेवेकडे वैद्य मित्र काउंटर्स
संदर्भ देऊन नेटवर्क हॉस्पिटल्स मध्ये थेट नोंदणी
प्राथमिक हेल्थकेअर किंवा नेटवर्क हॉस्पिटल्स द्वारे आयोजित केलेल्या हेल्थ शिबिरात
संदर्भ मिळविण्यासाठी प्रमाणित मेडिकल अनुपालन अधिकाऱ्याकडे जाऊन
त्यामुळे यापैकी कोणत्याही ठिकाणी जाऊन आपल्याला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्टने जारी केलेल्या हेल्थ कार्डाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
हेल्थ कार्डासोबत आपल्याला रु. 1.5 लाखांपर्यंतच्या उपचार खर्चाची रीएमबर्समेंट मिळू शकते. जर किंमत रु. 1.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर आपल्याला रु. 50,000 साठी अतिरिक्त मंजुरी मिळविता येईल. कोणत्याही क्रिटिकल इलनेससाठी आपल्याला रु. 2 लाखांचे इन्शुरन्स कव्हर घेता येईल.
डॉ. वायएसआर आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट कार्ड कसे डाउनलोड करता येईल?
आपल्याला https://www.ysraarogyasri.ap.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वरून हेल्थ कार्ड सहज डाउनलोड करता येईल. मुख्य पृष्ठावर, इएचएस विभागात जा आणि "हेल्थ कार्ड डाऊनलोड करा" चिन्हांकित बटण निवडा. आपले लॉगिन तपशील लिहा आणि "गो" निवडा. कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
आरोग्यश्री ॲप कसे डाऊनलोड करता येईल?
आरोग्यश्री ॲप डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनवर प्ले स्टोअर वर जा. हे ॲप आयफोनवर उपलब्ध नाही. प्ले स्टोअरमध्ये, आपल्याला आरोग्यश्री ट्रस्ट शोधता येईल आणि "इंस्टॉल" बटणावर क्लिक करता येईल.