डिजिट इन्शुरन्समध्ये स्विच करा

2024 मधील एनएसई मधील हॉलिडेजची सूची

एनएसई किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज हा जगातील दहावा सर्वात मोठा स्टॉक एक्स्चेंज आहे, ज्याचे ऑगस्ट 2021 पर्यंतचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन $3.4 दशलक्ष इतकी आहे. हे अग्रगण्य स्टॉक एक्स्चेंज सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत कार्यरत असते, याचे एक प्री-ओपनिंग ट्रेडिंग सेशन असते जे सकाळी 9:00 ते 9:08 पर्यंत असते.

शनिवार आणि रविवार सोडून एनएसई मधील ट्रेडिंग ऑपरेशन्स ट्रेडिंग हॉलिडेजना बंद राहतात.

या सदरामध्ये 2024 मधील एनएसई मधील हॉलिडेजची सूची दिलेली आहे, जी तुम्ही 2024 मध्ये एनएसईच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी नोट करावी.

2024 मधील एनएसई मधील हॉलिडेजची सूची

खालील तक्त्यामध्ये 2024 मधील एनएसई मधील हॉलिडेज दिलेले आहेत. काही अपवाद वगळता प्रत्येक सेगमेंट साठी एकसारखेच हॉलिडेज आहेत.

तारीख आणि वार हॉलिडे सेगमेंट्स
26 जानेवारी, शुक्रवार प्रजासत्ताक दिन सर्व
19 फेब्रुवारी, सोमवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती कॅपिटल मार्केट्स, इक्विटी डेरिव्हेटिव्हस आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
8 मार्च, शुक्रवार महाशिवरात्री कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
25 मार्च, सोमवार होळी कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
29 मार्च, शुक्रवार गुड फ्रायडे सर्व
1 एप्रिल, सोमवार एन्युअल बँक क्लोजिंग कॅपिटल मार्केट्स, इक्विटी डेरिव्हेटिव्हस आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
9 एप्रिल, मंगळवार गुढीपाडवा कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
11 एप्रिल, गुरुवार ईद-उल-फितर कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
17 एप्रिल, बुधवार राम नवमी कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
1 मे, बुधवार महाराष्ट्र दिन कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
23 मे, गुरुवार बुद्ध पौर्णिमा कॅपिटल मार्केट्स, इक्विटी डेरिव्हेटिव्हस आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
17 जून, सोमवार बकरी ईद / ईद अल-अज़हा कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
17 जुलै, बुधवार मोहर्रम कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
15 ऑगस्ट, गुरुवार स्वातंत्र्य दिवस सर्व
16 सप्टेंबर, सोमवार ईद-ए-मिलाद कॅपिटल मार्केट्स, इक्विटी डेरिव्हेटिव्हस आणि कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
2 ऑक्टोबर, बुधवार महात्मा गांधी जयंती सर्व
1 नोव्हेंबर, शुक्रवार दीपावली सर्व
15 नोव्हेंबर, शुक्रवार गुरुनानक जयंती कमोडिटी डेरिव्हेटिव्हस सोडून इतर सर्व
25 डिसेंबर, बुधवार क्रिसमस सर्व

*मुहूर्त ट्रेडिंग शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024, दिवाळी, लक्ष्मी पूजनाला असेल.* मुहूर्त ट्रेडिंगची वेळ नंतर एक्स्चेंज कडून कळविण्यात येईल.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधील 3 सेगमेंट्स कोणते आहेत?

एनएसईचे हे सेगमेंट्स आणि त्यांच्या प्रत्येकाच्या अंतर्गत येणारे इतर सब-सेगमेंट्स जाणून घेणे आवश्यक आहे:

1. कॅपिटल मार्केट

  • इक्विटी
  • म्युच्युअल फंड्स
  • सिक्युरिटीज लेंडिंग एंड बॉरोईंग स्कीम्स

2. डेरिव्हेटिव्ह मार्केट

  • इक्विटी
  • करन्सी
  • कमोडिटी
  • इंटरेस्ट रेट

3. डेब्ट मार्केट

  • कॉर्पोरेट बॉन्डस
  • न्यू डेब्ट सेगमेंट
  • नेगोशिएटेड ट्रेड रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म

एनएसई मध्ये कोणते दोन प्रकारचे हॉलिडेज आहेत?

यासोबतच, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मध्ये आणखीन दोन प्रकारचे हॉलिडेज आहेत -

ट्रेडिंग हॉलिडेज, जेव्हा ट्रेडिंग बंद असते, आणि परिणामी कोणतेही ट्रेडिंग ऑपरेशन देखील होत नाही.

क्लिअरिंग हॉलिडेज म्हणजे जेव्हा ट्रेडिंग मार्केट ऑपरेशन सुरु असतात; मार्केट सुरु असते. तरी, बाईंग आणि सेलिंग ऑर्डर्स सेटल होत नाहीत. या क्लिअरिंग हॉलिडेजच्या दिवशी बँकांनाही सुट्ट्या असतात. क्लिअरिंग हॉलिडेज हे नेगोशिएटेड ट्रेडिंग रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मला लागू होत नाहीत.

त्यामुळे, 2024 मध्ये इन्व्हेस्ट करताना एनएसई मधील 2024 मधील हॉलिडेज चेक करताय ना याची काळजी घ्या. मार्केटच्या ओपनिंग आणि क्लोजिंग वरील अपडेट्स साठी ऑफीशियल वेबसाईट चेक करत रहा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

2024च्या एनएसईच्या हॉलिडे कॅलेंडर मध्ये किती हॉलिडेज आहेत?

एनएसईच्या हॉलिडे कॅलेंडर प्रमाणे एकूण 19 हॉलिडेज आहेत.

क्लिअरिंग हॉलिडेज आणि सेटलमेंट हॉलिडेज एकच आहेत का?

होय, सेटलमेंट हॉलिडेज आणि क्लिअरिंग हॉलिडेज एकच आहेत.